सोमवार, २९ डिसेंबर, २०२५
विद्यापीठ तंत्रज्ञान संस्था (UATI) चे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पार पडले.
गडचिरोली जिल्ह्यातील अडपल्ली येथे गोंडवाना विद्यापीठ आणि लॉयड्स मेटल्स अँड
एनर्जी लिमिटेड यांच्या सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून (PPP) स्थापन करण्यात आलेल्या
विद्यापीठ तंत्रज्ञान संस्था (UATI) चे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते
पार पडले. #गडचिरोली जिल्हा आता केवळ राज्याचा शेवटचा जिल्हा उरला नसून, तो
महाराष्ट्राचे प्रगत 'प्रवेशद्वार' म्हणून ओळखला जाईल. जिल्ह्यातील खनिज संपत्ती
आणि तरुणांचे कौशल्य यांच्या जोरावर येथे ३ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक येत असून,
त्यातून सुमारे १ लाख रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा विश्वास मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. यावेळीराज्यमंत्री तथा गडचिरोलीचे सहपालकमंत्री
ॲङ आशिष जयस्वाल, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा