अमरावती, दि. 25 : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त विभागीय
आयुक्त कार्यालयात आज सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे यांच्या हस्ते त्यांच्या
प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी तहसीलदार संतोष आठरे,
नायब तहसीलदार श्यामसुंदर देशमुख, संदीप संदीप टांक, मधुकर धुळे नाझर शरद लोणारे
यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही दिवंगत अटल बिहारी
वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा