सोमवार, २२ डिसेंबर, २०२५

‘ज्वेल ऑफ एलआयटी अँड युथ आयकॉन’ पुरस्कार वितरण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एल.आय.टी.) माजी विद्यार्थी संघटनेतर्फे आयोजित ‘उडान’ संमेलनात
शेतीची उत्पादकता व गुणवत्ता वाढविण्यासाठी मिशन नैसर्गिक शेती राबविण्याचे राज्य शासनाने ठरविले असून येत्या २ वर्षात २५ लाख हेक्टर जमीन #नैसर्गिकशेती खाली येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी केले. आज सर्वच क्षेत्रात #एआय चा वापर होत असून ती काळाची गरज आहे. एल.आय.टी. सारख्या संस्थानी मोठ्या प्रमाणात एआयचा स्वीकार करावा, या आवाहनासह जागतिक स्तरावरील स्पर्धेसाठी आपण विद्यार्थी घडवू शकू, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला. या सोहळ्यात डॉ. आर. एल. सोनोलिकर, अरुण दांडेकर यांना जीवन गौरव प्रदान करण्यात आला. तसेच लाईफ टाईम अचिव्हमेंट दीपक लव्हाळा यांना, ज्वेल ऑफ एलआयटी डॉ. सुगंधा गारवे, कीर्ती गणोरकर, आर.जी. कृष्णन, अमित सिन्हा, नीरा चंदना यांना, तर युथ आयकॉन पुरस्कार चिंतन शाह यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमास सत्यनारायण नूवाल आणि पद्मश्री डॉ. डी. के. यादव प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा