बुधवार, २६ डिसेंबर, २०१८

उन्नत शेती-समृध्द शेतकरी मोहिमेंतर्गत कृषी यांत्रिकीकरण



उन्नत शेती-समृध्द शेतकरी
मोहिमेंतर्गत कृषी यांत्रिकीकरण
      संकेत स्थळावर अर्जाचा नमुना उपलब्ध

अमरावती, दि. 26 : ‘उन्नत शेती-समृध्द शेतकरी’ मोहीमअंतर्गत कृषि यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात चालना देण्याचे राज्य शासनाने ठरविले असुन त्याअंतर्गत पॉवर टिलर, रोटाव्हेटर, मोगडा (कल्टीव्हेटर), सर्वप्रकारचे प्लांटर (खत बी टोकन यंत्र), भात लावणी यंत्र (ट्रान्सप्लांटर), पॉवर विडर, रिपर कम बाईडर, भात मळणी यंत्र, मिनी भात मिल, दाल मिल व पुरक यंत्र संच (डी-स्टोनर, पॉलीशिंग, गेडींग, पॅकींग इत्यादी), कापूस पऱ्हाटी श्रेडर, ऊस पाचट कुट्टी, श्रेडर,मल्चर,ट्रॅक्टर चलीत फवारणी यंत्र (बुम स्प्रेअर), मिस्ट ब्लोअर, सबसॉईलर, ब्रश कटर तसेच सोबत सहपत्रित केलेल्या यादीतील औजारे घेण्याकरिता कृषि विभागामार्फत अनुदान दिले जाणार आहे. वर नमुद इतर औजारांकरिता अ.जमाती, अ.जाती,अल्प व अत्यल्प भुधारक शेतकरी व महिला लाभार्थ्यांसाठी उच्चतम अनुदान मर्यादेत किंमतीच्या 50 टक्के व इतर लाभार्थ्यांसाठी किंमतीच्या 40 टक्के अनुदान देय राहील. ट्रॅक्टर चलीत यंत्र, औजरांकरिता अर्ज करतांना अर्जासोबत ट्रॅक्टर असल्याबाबतचा पुरावा (आर.सी.बुक) सादर करणे अनिवार्य राहील.
पुर्वसंमती मिळालेल्या लाभार्थ्यांनी बाजारातील अधिकृत विक्रेत्याकडून यंत्र,औजारांची खरेदी करावी तसेच स्वत:च्या बँक खात्यातून इलेक्ट्रॅनिक पध्दतीने, धनादेश विक्रेत्यास रक्कम अदा करणे बंधणकारक राहील. केंद्र व राज्य शासनाच्या अधिकृत सक्षम तपासणी संस्थांनी ज्या यंत्र, अवजाराचे रीतसर परीक्षण (Testing) करुन ते BIS अथवा अन्य सक्षम संस्थांनी निश्चित केलेल्या प्रमाणकानुसार (Standards) तांत्रीक निकषानुसार असल्याचे प्रमाणीत केले असेल त्याच यंत्र, औजाराची पूर्वसंमती प्राप्त लाभार्थी शेतकऱ्यांनी खरेदी करावयाची आहे. अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या आधार सलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा केली जाईल.
कृषि यांत्रिकीकरण करिता विविध योजनेअंतर्गत जिल्ह्यास प्राप्त होणाऱ्या निधीच्या लक्षांकाच्या मर्यादेत लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल. प्रत्येक औजारासाठी शेतकऱ्यांनी विहित नमुन्यात स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक असून, ज्या औजारास जास्तीत जास्त अनुदान देय आहे त्या एकाच यंत्र, औजारास अनुदान दिले जाईल. शेतकऱ्यांनी विहीत नमुन्यातील अर्ज मार्च 2018 पर्यंत कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे जमा करावेत. अर्जाचा विहीत नमुना तालुका कृषि अधिकारी कार्यालय व कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. जिल्ह्यास प्राप्त आर्थिक लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लाभार्थ्यांची निवड तालुका हा घटक मानुन सोडत पध्दतीने करण्यात येईल. इच्छूक शेतकऱ्यांनी अर्ज सादर करुन योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, अमरावती यांनी केले आहे.


शुक्रवार, २१ डिसेंबर, २०१८

प्राधिकृत अधिकांऱ्यांच्या नामतालीकेसाठी 31 डिसेंबरपर्यंत अर्ज आंमत्रित


प्राधिकृत अधिकांऱ्यांच्या नामतालीकेसाठी
31 डिसेंबरपर्यंत अर्ज आंमत्रित
अमरावती, दि. 21 : विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था अमरावती विभागा यांच्याकडुन चौकशी अधिकारी/प्राधिकृत अधिकारी यांची नामतालीका पॅनल तयार करण्यासाठी सहकार खात्यातुन सेवा निवृत्त झालेले अधिकारी  (वयाची 65वर्ष पुर्ण न झालेल्या) निवृत्त न्यायाधिश, वकील,चार्टंड अकाउंटट यांच्याकडुन अर्ज मागविण्यात येत आहे. अर्जाचे विहीत नमुने 24 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत पुढील कार्यालयांमध्ये मिळतील. याबाबतची सुचना कार्यालयाच्या सुचना फलकावर प्रसि्दध करण्यात आलेली आहे. अर्ज प्राप्त करण्यासाठी अर्जदारांनी विभागीय सहनिबंध‍क सहकारी संस्था, दुरध्वनी क्रमांक 0721-2663246, जिल्हा उपनिबंध‍क सहकारी संस्था, दुरध्वनी क्रमांक 0721-2661633 पत्ता- सहकार संकुल कांता नगर, जुना बायपास रोड, महसुल भवन कार्यालयासमोर अमरावती. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, अकोला सहकार संकुल आदर्श कॉलनी, अकोला दु.क्र. 0724-2452730. जिल्हा उपपिबंधक सहकारी संस्था वाशिम, प्रशासकीय इमारत खोली क्र.103 जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम दु.क्र.07152-231173. जिल्हा उपपिबंधक सहकारी संस्था बुलढाणा, प्रशासकीय सहकार संकुल बोथा रोड, बुलढाणा दु.क्र.07262-242336. जिल्हा उपपिबंधक सहकारी संस्था यवतमाळ दगडी इमारत, सहकार भवन, तहसिल चौक यवतमाळ दु.क्र.07232-244460 असे विभागीय सहनिबंध‍क यांनी कळविले आहे.
00000000
                                                      


गुरुवार, २० डिसेंबर, २०१८

इयता 10 वी 12 वीचे नावनोंदणी अर्ज स्विकारण्यास मुदतवाढ


इयता 10 वी 12 वीचे नावनोंदणी अर्ज
स्विकारण्यास मुदतवाढ
    
अमरावती, दि.20:    इयत्या 10 वी 12 वी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खाजगिरित्या फॉर्म नं. 17 भरुन परीक्षेस प्रविष्ट होण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
फेब्रुवारी-मार्च 2019 मध्ये होणाऱ्या इयत्या 12 वी परीक्षा व इयत्या 10 वी च्या परीक्षेस खाजगिरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नावनोंदणी अर्ज (फॉर्म नं.17) ऑनलाईन प्रक्रियेव्दारे स्विकारण्याचा यापूर्वीचा अंतिम कालावधीला मुदतवाढ देण्यात आली आहे.
माध्यमिक शाळांनी/कनिष्ठ महाविद्यालयांनी अतिविलंब शुल्क प्रति विद्यार्थी रुपये 20/-प्रतिदिन स्विकारुन विभागीय मंडळाकडे ऑफलाईन पध्दतीने नाव नोंदणी अर्ज भरावयाच्या वाढीव तारीख इयत्या 10 वी व 12 वी करीता शनिवार दिनांक 15 डिसेंबर 2018 ते सोमवार दिनांक 31 डिसेंबर 2018 ही आहे.          अधिक माहितीकरीता संकेतस्थळावर संपर्क साधावा. इ. 10 वी करिता http://form17.mh-ssc.ac.in  व इ. 12 वी करिता http://form17.mh-hsc.ac.in वर उपलब्ध आहे, असे डॉ. अशोक भोसले, सचिव, राज्य मंडळ, पुणे यांनी कळविले आहे.
0000000








मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांचे यंत्रणेला आवाहन
व्हीव्हीपॅट आणि मतदान यंत्रांच्या उपयोगाबाबत प्रभावी जनजागृती करा   

अमरावती, दि. 20  : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांनी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील मतदार नोंदणी आणि मतदारयाद्यांच्या प्रकाशनाची पूर्वतयारी, मतदानयंत्र आणि त्यासोबत यावेळी प्रथमच उपयोगात आणली जाणारी व्हीव्हीपॅट यंत्राबाबतची जनजागृती मोहिम आणि निवडणूक पूर्वतयारीचा तपशिलवार आढावा घेतला.
येथील विभागीय आयुक्त कार्यालयात दिवसभर दोन सत्रात चाललेल्या या बैठकीला विभागीय आयुक्त पियूष सिंह, अमरावतीचे जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख, अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, बुलढाण्याच्या जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे, यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, वाशिमचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, राज्याचे सहमुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी आणि उपनिवडणूक अधिकारी शुभा बोरकर यांची मुख्य उपस्थिती होती. विभागातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी, निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त गजेंद्र बावणे, रमेश मावस्कर आदी यावेळी उपस्थित होते.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारयाद्यांचे व्यापक पुनर्निरीक्षण करण्यात आले असून या याद्या आगामी महिन्यात प्रकाशित होणार आहेत. या याद्या निर्दोष असणे आवश्यक असून त्यादृष्टीने सध्या सुरु असलेल्या कामाचा यावेळी सखोल आढावा घेण्यात आला. मतदारयादीतील मतदारांची नावे आणि छायाचित्रे, मतदारांकडील ओळखपत्रावरील माहिती व छायाचित्र यात कोणतीही विसंगती असू नये, यासाठी दक्षता घेण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या स्तरावर याबाबतीत वेळोवेळी आढावा घ्यावा, तसेच मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी संबंधित प्रभागाच्या अधिकाऱ्यांकडून होणारी कामे अचूक असतील याची दक्षता घ्यावी. मतदारयादीत प्रत्येक मतदाराचे छायाचित्र असावे, यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात यावेत आणि या प्रयत्नात गावपातळीवरील यंत्रणेचा सहभाग घ्यावा, अशा सुचना यावेळी देण्यात आल्या.
येत्या निवडणुकीत मतदानयंत्रासोबत प्रथमच व्हीव्हीपॅट यंत्रांचा उपयोग केला जाणार आहे. या यंत्रांचा उपयोग आणि विश्वासार्हतेबाबत विभागात व्यापक जनजागृती केली जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या जनजागृती अभियानाचा दैनंदिन आढावा घ्यावा, त्याची प्रात्यक्षिके सर्वत्र दाखवली जात आहेत. प्रात्यक्षिकांच्यावेळी नागरिकांच्या शंकांची उत्तरे दिली जात आहेत, याची दक्षता घेण्यात यावी, असेही अश्वनी कुमार यांनी सांगितले. गावपातळीवरील प्रात्यक्षिकांची पुरेशी पूर्वप्रसिध्दी करण्यात यावी. या यंत्रात बाह्यहस्तक्षेप अशक्य आहे, ही बाब नागरिकांना स्पष्टपणे समजावून सांगितली जावी, असे ते म्हणाले.
दिव्यांग मतदारांसह सर्व मतदारांच्या दृष्टीने मतदानकेंद्रे सोयीची असल्याची खात्री करुन घेण्यात यावी, असे सांगून अश्वनी कुमार म्हणाले की, प्रत्येक मतदार महत्वाचा आहे, ‘वंचित न राहो मतदार कोणी’ ही भूमिका घेऊन निवडणूक आयोग काम करत आहे, याची जाणीव सर्वांनी ठेवावी आणि अत्यंत गांभीर्यपूर्वक काम करावे. मतदानकेंद्रावर मतदानाच्या दिवशी कार्यरत असणारे मतदान केंद्राध्यक्ष आणि त्यांचे सहकारी यांच्यादृष्टीनेही मतदानकेंद्रात आवश्यक सुविधा असणे गरजेचे आहे. त्यांच्या सुविधांकडे दुर्लक्ष केले जाऊ नये, असेही त्यांनी सांगितले. मतदारांमुळेच सर्वात मोठा, स्वतंत्र आणि लोकशाही असणारा देश असा आपला लौकीक आहे, याची आपण सर्वांनी जाणीव ठेवली पाहिजे, असे ते म्हणाले.
यंत्रणेतीलअधिकाऱ्‍यांना निवडणूकांचा अनुभव आहे. मात्र केवळ अनुभव आहे पण केवळ त्या बळावर पुढे जाता येणार नाही. बदलते तंत्रज्ञान, समाजमाध्यमांचा उपयोग अशा बाबी आत्मसात कराव्या लागतील. त्यादुष्टीने सर्व अधिकाऱ्यांनी नेहमी अद्यावत माहिती जाणून घेतली पाहिजे. तसेच माहिती तंत्रज्ञानाच्या प्रभावी उपयोगाचे कौशल्य त्यांनी वेळोवेळी अद्यावत करावे, असेही ते म्हणाले.
या बैठकीत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील निवडणूक पूर्वतयारीची तपशिलवार माहिती दिली. विभागीय आयुक्त पियूष सिंह, उपायुक्त् बावणे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तहसिलदार वैशाली पाथरे यांनी सुत्रसंचालन केले.
000000


बुधवार, १९ डिसेंबर, २०१८

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागासवर्गीय विकास महामंडळ योजना स्वयंरोजगारासाठी 13 कोटी 83 लक्ष कर्ज वितरीत


अण्णासाहेब पाटील आर्थिक मागासवर्गीय विकास महामंडळ योजना    स्वयंरोजगारासाठी 13 कोटी 83 लक्ष कर्ज वितरीत

अमरावती, दि. 19 : स्वयंरोजगाराकरीता समाजात अनुकूल बदल घडवून आणावयाचे असतील तर स्वयंरोजगार करणाऱ्यास त्याचे भविष्यकाळासाठी आर्थिक स्थैर्याची शाश्वती मिळवून देण्याची आवश्यकता आहे. या शासनाने बेरोजगार तरुणांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहीत करण्याच्या दृष्टीने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत स्वयंरोजगाराकरीता प्रोत्साहन तसेच सुलभ प्रक्रियेतून कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते. बेरोजगारीची तिव्रता कमी करण्यासाठी या योजना प्रभावी ठरत आहे.                                                      
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागासवर्गीय विकास महामंडळच्या छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानातंर्गत सन 2018-19 मध्ये विभागात नोव्हेंबर अखेर वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजनेतील 238 स्वयंरोजगारच्छूक तरुणांचे 13 कोटी 83 लक्ष 29 हजार रुपयांचे कर्ज मंजुर करण्यात आले आहे. त्यापैंकी 231 तरुणांना 13 कोटी 33 लक्ष 48 हजार रुपयांची कर्ज वितरणाची प्रकिया पुर्ण झाली आहे.                  
स्वयंरोगारासाठी आवश्यक असलेल्या भांडवलाची पूर्तता करणे शक्य व्हावे यासाठी कर्जप्राप्तीकरीता बुलडाणा येथिल 2 हजार 250 युवकांनी ऑनलाईन अर्ज सादर केले. तर अमरावती येथील 259, अकोला 363, वाशिम 263, यवतमाळ 225 असे अमरावती  विभागातील 3 हजार 360 अर्ज प्राप्त झाले. त्यातील 2 हजार 484 प्रकरणे पात्र ठरली. ही आकडेवारी महिनाभरापूर्वीची आहे.
          आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकापर्यंत विशेषकरून बेरोजगार तरुणांपर्यंत पोहोचून त्यांना सक्षम बनवणे. योजनेतंर्गत रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे आणि आर्थिकदृष्ट्या मागासघटकांचा सामाजिक विकास घडवून आणणे, ही या योजनेची उद्दीष्टये असून वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेसह गट कर्ज व्याज परतावा योजना आणि गट प्रकल्प योजना राबविण्यात येत आहे. बँकेच्या प्रमाणीकरणानुसार लाभार्थ्यांला व्याज परतावा होईल. वैयक्तिक योजनेअंतर्गत शासनाकडील प्रस्तावीत निधीपैकी चार टक्के निधी दिव्यांगासाठी राखीव आहे. या योजनांमध्ये कृषी संलग्न व पारंपारीक उपक्रमासंह लघू व मध्यम उद्योगांचा कर्ज योजनेत समावेश आहे.                                                                                         
 या योजनेअंतर्गत महामंडळ पात्र लाभार्थ्यांना पहीला हप्ता (मुद्दल व व्याज) अनुदान स्वरुपात लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करेल. लाभार्थ्यांला पहिला हप्ता अनुदानाव्यतिरिक्त जास्तीत जास्त 3 लाखांपर्यंत कर्ज व्याज परतावा करेल. म्हणजेच प्रत्येक लाभार्थ्यांला जास्तीत जास्त 3 लाखांपर्यंत व्याज परतावा अधिक प्रोत्साहनपर पहीला हप्ता देण्यात येईल व दुसऱ्या हप्त्यापासून लाभार्थ्यास फक्त व्याज परतावा अनुज्ञेय राहील.                                    
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत रोजगार व स्वयंरोजगाराकरीता प्रोत्साहन भेटत असल्यामुळे व्यवसाय व उद्योगाकडे  तरुणांची पावले वळत आहेत.
000000