अण्णासाहेब पाटील आर्थिक
मागासवर्गीय विकास महामंडळ योजना स्वयंरोजगारासाठी 13 कोटी 83 लक्ष
कर्ज वितरीत
अमरावती, दि. 19 : स्वयंरोजगाराकरीता समाजात अनुकूल बदल घडवून आणावयाचे असतील तर स्वयंरोजगार करणाऱ्यास त्याचे भविष्यकाळासाठी आर्थिक स्थैर्याची शाश्वती मिळवून देण्याची आवश्यकता आहे.
या शासनाने बेरोजगार तरुणांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहीत करण्याच्या दृष्टीने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत स्वयंरोजगाराकरीता प्रोत्साहन तसेच सुलभ प्रक्रियेतून कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते. बेरोजगारीची तिव्रता कमी करण्यासाठी या योजना प्रभावी ठरत आहे.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागासवर्गीय विकास महामंडळच्या छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानातंर्गत सन 2018-19 मध्ये विभागात नोव्हेंबर अखेर वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजनेतील 238 स्वयंरोजगारच्छूक तरुणांचे 13 कोटी 83 लक्ष 29 हजार रुपयांचे कर्ज मंजुर करण्यात आले आहे. त्यापैंकी 231 तरुणांना 13 कोटी 33 लक्ष 48 हजार रुपयांची कर्ज वितरणाची प्रकिया पुर्ण झाली आहे.
स्वयंरोगारासाठी आवश्यक असलेल्या भांडवलाची पूर्तता करणे शक्य व्हावे यासाठी कर्जप्राप्तीकरीता बुलडाणा येथिल 2 हजार 250 युवकांनी ऑनलाईन अर्ज सादर केले.
तर अमरावती येथील 259, अकोला 363, वाशिम 263, यवतमाळ 225 असे अमरावती विभागातील 3 हजार 360 अर्ज प्राप्त झाले. त्यातील 2 हजार 484 प्रकरणे पात्र ठरली. ही आकडेवारी
महिनाभरापूर्वीची आहे.
आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकापर्यंत विशेषकरून बेरोजगार तरुणांपर्यंत पोहोचून त्यांना सक्षम बनवणे. योजनेतंर्गत रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे आणि आर्थिकदृष्ट्या मागासघटकांचा सामाजिक विकास घडवून आणणे,
ही या योजनेची उद्दीष्टये असून वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेसह गट कर्ज व्याज परतावा योजना आणि गट प्रकल्प योजना राबविण्यात येत आहे. बँकेच्या प्रमाणीकरणानुसार लाभार्थ्यांला व्याज परतावा होईल.
वैयक्तिक योजनेअंतर्गत शासनाकडील प्रस्तावीत निधीपैकी चार टक्के निधी दिव्यांगासाठी राखीव आहे.
या योजनांमध्ये कृषी संलग्न व पारंपारीक उपक्रमासंह लघू व मध्यम उद्योगांचा कर्ज योजनेत समावेश आहे.
या योजनेअंतर्गत महामंडळ पात्र लाभार्थ्यांना पहीला हप्ता (मुद्दल व व्याज) अनुदान स्वरुपात लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करेल. लाभार्थ्यांला पहिला हप्ता अनुदानाव्यतिरिक्त जास्तीत जास्त 3 लाखांपर्यंत कर्ज व्याज परतावा करेल. म्हणजेच प्रत्येक लाभार्थ्यांला जास्तीत जास्त 3 लाखांपर्यंत व्याज परतावा अधिक प्रोत्साहनपर पहीला हप्ता देण्यात येईल व दुसऱ्या हप्त्यापासून लाभार्थ्यास फक्त व्याज परतावा अनुज्ञेय राहील.
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत रोजगार व स्वयंरोजगाराकरीता प्रोत्साहन भेटत असल्यामुळे व्यवसाय व उद्योगाकडे
तरुणांची पावले वळत आहेत.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा