बुधवार, २७ फेब्रुवारी, २०१९

पोलिस दलातर्फे नागरिकांच्या सुविधेसाठी महाराष्ट्र पोलिस सिटीझन पोर्टल कार्यान्वित


पोलिस दलातर्फे नागरिकांच्या सुविधेसाठी
महाराष्ट्र पोलिस सिटीझन पोर्टल कार्यान्वित

            अमरावती, दि. 27:  महाराष्ट्र पोलीस दलातर्फे नागरीकांना पोलीस विभागाशी संबंधित विविध सेवा व  परवाण्याकरीता ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा सीसीटीएनएस कार्यप्रणालीशी संबंधीत असलेल्या सिटीझन पोर्टलद्वारे (www.mhpolice.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
            सिटीझन पोर्टल चा उपयोग करुन नागरिकांना सभा, मिरवणुका, लाऊडस्पीकर, चारित्र्य पळताळणी, सुरक्षा रक्षक पडताळणी, गणपती व नवदुर्गा मंडळाची परवानगी इत्यादी ऑनलाईन सेवा उपलब्ध होणार आहे. तसेच या पोर्टलवर दाखल झालेल्या गुन्ह्याची प्रथम खबर (FIR) पाहणे, अटक आरोपीची माहिती, बेवारस व अनोळखी प्रेतदेहाचे तपशील, चोरीस गेलेल्या वाहनांची माहिती, हरविलेल्या इसमांची माहीती इत्यादी ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
            राज्याच्या पोलीस महासंचालक यांनी राज्यातील सर्व पोलीस आयुक्तालयातंर्गत येणाऱ्या शहरी भागामध्ये भाड्याने राहणारे भाडेकरु, पेइंग गेस्ट यांची संपूर्ण माहिती सिटीझन पोर्टलवर सादर करण्याची जबाबदारी घर मालकाची असल्यामुळे परिपत्रकाद्वारे माहिती भरण्यासाठी राज्यातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे.
            सिटीझन पोर्टलवर भाडेकरुची माहिती सादर करण्याची घरमालकांना नमुद संकेतस्थळावर युजर आयडी तयार करुन त्याद्वारे भाडेकरुचा मुळ पत्ता, व्यवसाय, ओळखपत्र तसेच फोटोसह माहीती द्यावी लागणार आहे. उपलब्ध करुन देण्यात आलेल्या माहितीची संबंधीत पोलीस ठाणेकडून तपासणी करण्यात येणार आहे.
            आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांच्या अनुषंगाने दक्षतेचा उपाय म्हणून ही कार्यवाही होणार असल्याने अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी अमरावती शहरामध्ये ज्यांच्या घरामध्ये भाडेकरी ठेवले आहेत त्यांची माहीती सिटीझन पोर्टलवर सादर करण्याचे जाहीर आवाहन केले आहे.
            नागरिकांना माहिती भरतांना अडचण आल्यास संबंधीत पोलीस ठाणेतील खुपीया पोलीस कर्मचारी किंवा पोलीस आयुक्त कार्यालयातील सीसीटीएनएस कक्षाशी संपर्क करण्याबाबत व पोलीस उपायुक्त (मुख्यालय), प्रदीप चव्हाण सहायक पोलीस निरिक्षक, अतुलवर प्रभारी अधिकारी सीसीटीएनएस कक्ष यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
000000

मंगळवार, २६ फेब्रुवारी, २०१९

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अमरावती विभागात पावणेदहा लाख कुटुंबांना लाभ


प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना


अमरावती विभागात पावणेदहा लाख कुटुंबांना लाभ


            अमरावती, दि. 26 :  प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या शुभारंभानंतर लाभ वितरणाच्या कार्यवाहीने गती घेतली असून, अमरावती महसूल विभागातील पाचही जिल्ह्यातील एकूण 9 लाख 71 हजार 953 शेतकरी कुटुंबे योजनेसाठी पात्र ठरली आहेत. 
            विभागातील 7 हजार 312 गावांत 16 लाख 98 हजार 397 खातेदार शेतकरी आहेत. योजनेच्या गतिमान अंमलबजावणीसाठी महसूल, कृषी व विविध विभाग अहोरात्र परिश्रम घेत आहेत. या गतिमान कार्यवाहीनुसार विभागातील 7 हजार 298 गावांची माहिती संकलित झाली आहे. त्यानुसार पात्र शेतकरी कुटुंबाची संख्या 9 लाख 71 हजार 953 आहे.
संकलित माहिती पोर्टलवर अपलोड करण्याच्या कामानेही वेग घेतला असून, 7 हजार 53 गावांतील  7 लाख 60 हजार 89 पात्र कुटुंबाची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली आहे.
अशी आहे जिल्हानिहाय संख्या
पात्र लाभार्थी कुटुंबांची अमरावती जिल्ह्यातील 2 लाख 37 हजार 18, अकोल्यातील 1 लाख 15 हजार 762, यवतमाळमधील 2 लाख 11 हजार 29, बुलडाणा जिल्ह्यातील 2 लाख 78 हजार 13 आणि वाशिम जिल्ह्यातील 1 लाख 30 हजार 131 अशी संख्या आहे. 
कार्यवाहीसाठी प्रत्येक स्तरावर समित्या
            या योजनेच्या कार्यवाहीसाठी अमरावती विभागात विभागस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुका व ग्रामस्तरीय संनियंत्रण समित्या गठित करून ग्रामपातळीवर माहिती संकलित करण्याची प्रमुख जबाबदारी तलाठ्यांवर  सोपविण्यात आली आहे. त्यांना सहकार्याची जबाबदारी ग्रामसेवक आणि कृषीसेवकांवर आहे. त्यानुसार गत दोन आठवड्यात तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, मंडळ अधिकारी, कृषी अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, सूचना केंद्राचे अधिकारी समन्वयाने माहिती संकलनाचे व ती वेळेत अपलोड करण्याचे काम करत आहेत.  शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक ही माहिती प्राप्त करुन विहित नमुन्यात नोंद करुन पोर्टलवर माहिती अपलोड करण्यात येते.   
        योजनेत अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांना प्रति शेतकरी कुटुंबाला प्रतिवर्ष सहा हजार रुपये आर्थिक सहाय्य तीन टप्प्यांत मिळणार असून, पहिल्या टप्प्यातील दोन हजार रुपये पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याच्या कार्यवाहीने वेग घेतला आहे.  
00000

27 फेब्रुवारीला शासकीय तंत्रनिकेतनचा पदविका प्रदान समारंभ


27 फेब्रुवारीला शासकीय तंत्रनिकेतनचा
पदविका प्रदान समारंभ

·        542 विद्यार्थ्यांना पदविका प्रदान करण्यात येणार

            अमरावती, दि. 25: शासकीय तंत्रनिकेतन अमरावती या स्वायत्त संस्थेच्या 18 व्या पदविका प्रदान समारंभाचे बुधवार दि. 27 फेब्रुवारी रोजी दुपारी 3.00 वाजता आयोजन करण्यात आले आहे. या समारंभात उन्हाळी 2018 व हिवाळी 2018 या परीक्षांमधील अभियांत्रिकी पदविकेच्या विविध विद्या शाखांमधील एकूण 542 विद्यार्थी-विद्यार्थीनींना पदविका प्रदान करण्यात येणार आहे.
            सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, अमरावती तथा नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. दत्तात्रय जाधव यांचे अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या पदविका प्रदान समारंभात स्थापत्य अभियांत्रिकी, यंत्र अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी, अणुविद्युत अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान व प्लॉस्टिक व पॉलीमार अभियांत्रिकी या शाखांच्या एकूण 542 विद्यार्थी-विद्यार्थीनींना मान्यवरांच्या हस्ते पदविका प्रदान करण्यात येणार आहे.
या पदविका प्रदान समारंभात प्रथम व दिव्तीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना पारितोषिके वितरीत करण्यात येणार आहे. यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी या शाखेतून तावरे रोहीत प्रकाशराव 93.38 टक्केवारीने प्रथम, चौधरी अंबिका धनराज (92.63) द्वितीय.
 व्दितीय पाळीमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी : पारसकर मंजिरी विजय (96.88) प्रथम, सोनार आदीत्य चंद्रशेख्रर (95.13) व्दितीय,
यंत्र अभियांत्रिकी : पारतवार ऋषिकेश किशोर (97.56), तिडके रोहीत गणेशराव (97.56) हे दोघेही प्रथम, देशमुख कपिल अशोकराव (97.19) व्दितीय,
व्दितीय पाळीमध्ये यंत्र अभियांत्रिकी : वर्धेकर संकेत (97.69) प्रथम, यादगिरे राहुल नंदकिशोर  (95.63) द्वितीय,

विद्युत अभियांत्रिकी :  चौधरी आकांक्षा मनोज (93.06) प्रथम, तायडे शिवम प्रकाशराव (90.56) व्दितीय
अणु विद्युत अभियांत्रिकी : गुल्हाने अनुजा अजाबराव (95.63) प्रथम, बोबडे सुजित सुरेन्द्र (94.44) द्वितीय.
व्दितीय पाळीमध्ये अणु विद्युत अभियांत्रिकी : शेख अल्फीया सासिफ (94.25) प्रथम, ढगे राणी सोनाजी (94.13) द्वितीय.
 संगणक अभियांत्रिकी : ताजी इंशिराह मुरान खान (95.38) प्रथम, उपाध्ये हर्षल मनोज (93.94) विधाले पियुष सतिष (93.94) व्दितीय.
माहीती तंत्रज्ञान :  गौर खुशबु संजिवकुमार (88.56) व शर्मा विप्रा विजय (88.56) प्रथम, निचत सुष्टी प्रकाश (85.81) द्वितीय,  प्लॅस्टिक व पॉलीमर अभियांत्रिकी : जिभकाटे विशाल रामभाऊ (81.14) प्रथम, गायकवाड स्वरुपा प्रल्हाद (79.81) द्वितीय आहे.
पदविका प्रदान समारंभाला संस्थेच्या सर्व विद्यार्थी -विद्यार्थीनींनी बुधवार दि. 27 फेब्रुवारी रोजी दुपारी 2.00 वाजता संस्थेच्या परिसरातील मुख्य इमारतीमध्ये उपस्थित रहावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. आर. पी. मोगरे, शैक्षणिक समन्वयक पी. बी. उत्तरवार आणि परिक्षा नियंत्रक एस. जे. गायकवाड यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे. 
000000


शनिवार, २३ फेब्रुवारी, २०१९








मेळघाट अॅक्शन प्लान राबवून बालमृत्यूचे प्रमाण रोखणार
-अमरावतीत झालेल्या सर्व विभागीय बैठकीनंतर आरोग्यमंत्र्यांची ग्वाही
* दुर्गम ठिकाणी तज्ज्ञांचे शिबीर घेणार
*आरोग्य सेवेच्या पायाभूत सुविधांवर भर
* संपर्क यंत्रणा, दळणवळण बळकट करणार
अमरावती, दि. २३ : मेळघाटातील दुर्गम भागातील आरोग्य यंत्रणेपर्यंत पोहोचण्यास रस्ते, संपर्क यंत्रणा आणि वीज सहाय्यभूत ठरणार आहे. त्यामुळे या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन कुपोषण, मातामृत्यू आणि बालमृत्यू रोखण्यासाठी सर्व विभागांची मदत घेण्यात येईल. यासाठी मेळघाट अॅक्शन प्लान राबवून मृत्यूचे प्रमाण रोखण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
मेळघाट परिसराचा दौरा आटोपून आज येथील विभागीय आयुक्त कार्यालयात श्री. शिंदे यांनी सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली. यावेळी खासदार आनंदराव अडसूळ, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर प्रदीप व्यास विभागीय आयुक्त पियूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा खत्री, आरोग्य अतिरिक्त संचालक डॉ. सतीश पवार, सहसंचालक डॉ. अर्चना पाटील, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी राहुल कर्डीले आदिंसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 
आरोग्यमंत्री श्री. शिदे म्हणाले, मेळघाटात आरोग्य यंत्रणा पोहोचली आहे. मात्र पायाभूत सुविधांचा विकास होणे गरजेचे आहे. तसेच रुग्ण आणि आरोग्य यंत्रणेतील संपर्क हा देखिल मोठा प्रश्न आहे. संपर्क होत नसल्याने कमी अंतरावरील रुग्णांना देखिल आरोग्य सुविधा पूरविण्यात अडचणी येत आहे. यावर मोबाईल किंवा वायरलेस यंत्रणा उभारण्याबाबत विचार व्हावा. दुर्गम भागात तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा मिळावी यासाठी ग्रामीण रुग्णालयस्तरावर शिबीर घेण्यात येतील. पावसाळ्याच्या काळात शिबिराचा लाभ होत असत्याने त्या ठिकाणी डॉक्टरांच्या राहण्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. 
मेळघाटात आवश्यक तेवढ्या रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच महिला आणि बालकांना कुपोषणापासून रोखण्यासाठी पूरक आहार देण्यात यावा. आदिवासी भागातील रुग्ण बिगर आदिवासी भागात उपचारासाठी गेल्यास त्याला आदिवासी भागातील लाभ मिळण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात यावा. दुर्गम भागात जिथे संपर्क यंत्रणा नाही तेथे रुग्णवाहिकेला बोलावण्यासाठी वनविभागाच्या संपर्क यंत्रणेचा वापर करावा  अशा सूचनाही यावेळी आरोग्यमंत्र्यांनी दिल्या. या भागातील नागरिकांचे हिमोग्लोबीन प्रमाण व्यवस्थित ठेवण्यासाठी डोस देण्यात यावेत. दुर्गम भागातील आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी नेब्युलायझर, वार्मर आदींचे वाटप करण्यात आले आहे. आदिवासी रुग्ण आरोग्य यंत्रणेपर्यंत पोहोचावा यासाठी प्रमुख आदिवासी व्यक्तींची मदत घेतली जाणार आहे. तसेच आदिवासी कक्ष उभारून रुग्णांना संपूर्ण सहकार्य करण्यात येत असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.
मेळघाटातील मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी श्री. शिंदे यांनी सुक्ष्म आढावा घेतला. आदिवासी, वन, आरोग्य, बांधकाम आदी विभागांच्या सहकार्याने दुर्गम भागात पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात याव्यात अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. सर्व विभागांनी समन्वयाने कार्य केल्यास कुपोषण, माता आणि बाल मृत्यू रोखण्यास निश्चितच मदत होईल. धोरणांची अंमलबजावणी करतांना येणाऱ्या अडचणी मांडून त्या सोडविण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्यात येतील. चांगले कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहू असा विश्वास आरोग्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिला.
मेळघाटात 82 आरोग्यवर्धिनी केंद्र निर्माण करण्यात आले आहे. यातून त्याठिकाणी डॉक्टरांची सुविधा उपलब्ध होईल. पहिल्या टप्प्यात 60 आणि दुसऱ्या टप्प्यात 22 डॉक्टर उपलब्ध होतील. मेळघाटतील नागरिकांना उपलब्ध आरोग्यविषयक सुविधा माहिती व्हाव्यात यासाठी व्यापक जनजागृतीची मोहिम हाती घेण्यात यावी. यातून समाज प्रबोधनाचे कार्यक्रम हाती घेण्यात यावेत. यासाठी त्यांना समजेल अशा लोकभाषेत, सोप्या भाषेत पोस्टर, होर्डींग लावण्यात यावी. यासाठी एजन्सी नेमण्यात यावी.
          अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, आशा यांच्या मदतीने एकत्रित येऊन समन्वयाने कार्य केल्यास कुपोषण, बालमृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. मेळघाटात रस्त्यांचे जाळे कमी असल्याने याठिकाणी मोठी रुग्णवाहिकेपेक्षाबाईक ॲम्ब्युलंस प्रभावी ठरू शकतील. यासाठी आवश्यकत तेवढ्या बाईक ॲम्ब्युलंस उपलब्ध करून देण्यात येतील, असे श्री. शिंदे यांनी सांगितले.
00000


शुक्रवार, २२ फेब्रुवारी, २०१९

औद्योगिक क्षेत्रातून सर्वात जास्त रोजगार निर्मिती


औद्योगिक क्षेत्रातून सर्वात जास्त रोजगार निर्मिती
-पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील

अमरावती, दि. 22 : लोकांचे जीवनमान उंचावण्याची क्षमता औद्योगिक क्षेत्रात आहे. त्यामुळे या क्षेत्राचा विकास करण्याचे राज्याने ठरविले आहे. राज्याच्या प्रयत्नांमुळे आज सर्वाधिक रोजगार निर्मिती औद्योगिक क्षेत्रातून झाली असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील यांनी केले.

आज येथील औद्योगिक विकास महामंडळाच्या परिसरात नव्या उद्योग भवनाच्या इमारतीचे भूमिपूजन आणि कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. यावेळी आमदार रमेश बुंदिले, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषद सदस्य विजय काळमेघ, नगराध्यक्ष ॲड. कमलकांत लाडोळे, नगरसेवक राजेश शाहू, अजय गोंडाणे, औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य अभियंता राजेश जांजड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता श्री. नवघरे, उद्योजक संघटनेचे अध्यक्ष किरण पातूरकर, प्रकाश पुंड आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. पोटे-पाटील म्हणाले, राज्यात औद्योगिक विकास महामंडळाने दिड लाख हेक्टर जमिन संपादित केली आहे. या ठिकाणी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. सुमारे 364 औद्योगिक क्षेत्र कार्यरत आहे. महामंडळाकडे असणाऱ्या पाच धरणांमधून सुमारे दहा हजार कोटी रूपयांची ठेव जमा करण्यात आली आहे. समृद्धी महामार्ग, हायब्रीड ॲन्युटीच्या माध्यमातून होणारे रस्ते यामुळे विकासाचा वेग वाढला आहे. नांदगाव पेठ येथील वस्त्रोद्योग पार्कमध्ये 18 उद्योग सुरू झाले आहे. यातून सुमारे दहा हजार कोटींची गुंतवणुकीतून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष 50 हजार रोजगार उपलब्ध झाला आहे.
उद्योग सुरू करण्यासाठी महामंडळाकडून पुरक वातावरण तयार करण्यात आले आहे. जागा, पाणी, विविध परवानग्यांसाठी एक खिडकी आदी उपाययोजना करण्यात आल्या आहे. या प्रयत्नांमुळे पारदर्शकता येण्यास मदत झाली. औद्योगिक क्षेत्रात बदल घडविण्याचे काम राज्य शासनाने केले आहे. महामंडळाच्या पाठीशी शासन उभे राहिल्याने हा बदल घडला आहे. फुड पार्क, आयटी पार्क, वस्त्रोद्योग पार्क अशा विविध वसाहती उभ्या राहिल्याने औद्योगिक विकास झाला आहे. उद्योजकांना सर्वच सेवा एका ठिकाणी मिळावी, यासाठी उद्योग भवनाची इमारत उभी राहणार आहे. ही इमारती गतीने पूर्ण करण्यात येईल, असे श्री. पोटे-पाटील यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला पुलवामा येथील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. आमदार श्री. बुंदिले, श्री. पातूरकर यांनी मनोगत व्यक्त केले. श्री. जांजड यांनी प्रास्ताविक केले. सुधाकर फुके यांनी आभार मानले.
00000











शुक्रवार, १५ फेब्रुवारी, २०१९

जिल्‍ह्यात कलम 37 (1) व (3) लागू


जिल्‍ह्यात कलम 37 (1) (3)  लागू

अमरावती, दि. 15  : जिल्‍ह्यात शांतता व सुव्‍यवस्‍था अबाधित राहावी यासाठी अपर जिल्‍हा दंडाधिकारी यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37(1) व (3) लागू केली आहे. या कलमाचा अंमल दिनांक 14 फेब्रुवारी 2019 पासून लागू राहणार असून या कलमाचा भंग करणा-या व्‍यक्‍तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्‍यात येईल, असेही अपर  जिल्हा दंडाधिकारी  यांनी कळविले आहे.
000000

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पांढरकवड्यात विकासकामांचे लोकार्पण


प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज
पांढरकवड्यात विकासकामांचे लोकार्पण

अमरावती, दि. 15  : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे शनिवारी (दि. 16 फेब्रुवारी) सकाळी 10 वाजून 25 मिनीटांनी पांढरकवडा येथे आगमन होत आहे.
यावेळी त्यांच्या हस्ते केंद्रीय रस्ते निधींतर्गत बांधण्यात येणाऱ्या विविध रस्त्यांच्या कामांची पायाभरणी होईल. नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील एकलव्य मॉडेल निवासी शाळेचे उद्घाटन, प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांचा ई-गृहप्रवेश आणि लाभार्थ्यांना घरकुल वितरण, अजनी (नागपूर)-पुणे रेल्वेला व्हीडीओच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखविणे, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवन्नोनती अभियानातील लाभार्थ्यांना प्रमाणपत्र तसेच धनादेशाचे वितरण होईल. यावेळी प्रधानमंत्री यांचे भाषण होईल. या कार्यक्रमानंतर सकाळी 11.30 वाजता ते प्रयाण करतील.
00000



विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी समुपदेशकांची नियुक्ती


विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी समुपदेशकांची नियुक्ती

            अमरावती दि. 15 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीणे पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती,नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च 2019 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च्‍ माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इ.12 वी दिनांक 21 फेब्रुवारी 2019 ते दिनांक 20 मार्च 2019 व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा इ. 10 वी दिनांक 1 मार्च 2019 ते दिनांक 22 मार्च 2019 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.
परीक्षेच्या काळात अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भितीने मानसिक दडपणाखाली असतात. अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी ऑनलाईन समुपदेशन करण्याकरीता राज्यमंडळ स्तरावरुन समुपदेशकांची  नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक खालील प्रमाणे आहेत. 7767960804,7066475360,8668392232, 8459112133,9619643730,7796874474,9561220152,8530608947,7066128995,7387501892
            उपरोक्त भ्रमणध्वनी क्रमांक दिलेले समुपदेशक परीक्षा कालावधी सकाळी 8.00 ते रात्री 8.00 या कालावधीतच विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनीद्वारे नि:शुल्क आवश्यक ते समुपदेशन करतील. मात्र विद्यार्थी, पालक यांनी परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्था व प्रश्नपत्रिकेसंबधित प्रश्न इत्यादीबाबत समुपदेशकांना विचारणा करु नये याची नोंद घ्यावी. पुणे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले  यांनी केले आहे.

****

पोलीस शिपाई पदभरती प्रक्रियेत बदलासंबंधी सूचना


पोलीस शिपाई पदभरती प्रक्रियेत बदलासंबंधी सूचना
Ø  आता लेखी परीक्षा प्रथम, तद्नंतर शारिरीक चाचणी

अमरावती, दि.  15 :  महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामाच्या स्वरुपात बदल झाल्याने पेालीस शिपाई पदावर बुध्दीमान उमेदवारांची निवड होण्याची आवश्यता  आहे. तसेच पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेतील शारिरीक चाचणी दरम्यान होणाऱ्या दुर्घटना या बाबी विचारात घेऊन गृह विभागाने 18 जानेवारीच्या शासन निर्णयानुसार पोलीस शिपाई पदभरती प्रकियेत बदल केला आहे.
नवीन पध्दतीअनुसार पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत उमेदवारांची लेखी परीक्षा प्रथम घेण्यात येणार आहे. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांपैकी पोलीस घटक कार्यालयाच्या आस्थापनेवर रिक्त होणाऱ्या पदांच्या प्रमाणात आवश्यक तेवढयाच योग्य उमेदवारांना शारिरीक चाचणीसाठी बोलविण्यात येणार आहे. यामुळे भरती प्रक्रिया दीर्घकाळ सुरु न राहता जलद गतीने पार पडेल, आणि जिल्ह्यातील उमेदवारांना जास्त दिवस ताटकळत राहावे लागणार नाही.
भरती प्रक्रियेत केलेल्या बदलांचा उमेदवारांना निश्चितच फायदा होईल, असे वाशिमच्या पोलीस अधीक्षक, मोक्षदा पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

****

गुरुवार, १४ फेब्रुवारी, २०१९


विभागीय आयुक्त कार्यालयात

संत सेवालाल महाराज यांना अभिवादन

अमरावतीदि.  15 :   संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी  विदर्भ पाटबंधारे महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार सुनील देशमुख, महसूल उपायुक्त गजेंद्र बावणेपुरवठा उपायुक्त रमेश मावस्करतहसिलदार वैशाली पाथरे यांचेसह अन्य वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी उपस्थित होतेउपस्थितांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून आदरांजली वाहिली.
यावेळी जम्मू-काश्मिरच्या पुलवामा येथील दहशतवादी संघटनेच्या आत्मघातकी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना मौन पाळून श्रध्दाजंली वाहिली.





                                                      













                मोठया शहरांबरोबरच लहान शहरांच्‍या विकासावरही शासनाचा भर
-          मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस
  • देऊळगावराजा शहरातील नगर परिषदेच्‍या नवीन प्रशासकीय इमारतीचे थाटात लोकार्पण
  • देऊळगांव राजा शहराच्या विकासासाठी भरघोस निधी
बुलडाणा, दि. १४ –केंद्र सरकारच्‍या मदतीने छोटया शहरातील विविध विकास कामांसाठी मोठया प्रमाणात निधी उपलब्‍ध करुन देण्‍यात आला आहे. बालाजी नगरी म्‍हणून ओळखल्‍या जाणाऱ्या देऊळगावराजा शहरातही अनेक विकासाची कामे करण्‍यात आली असून या शहराच्‍या सर्वांगिण विकासासाठी यापुढेही निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. मागील चार वर्षांत राज्‍य शासनाने मोठया शहरांबरोबरच लहान शहरांच्‍या विकासावरही प्रामुख्‍याने भर दिला आहे, असे प्रतिपादन मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज देऊळगांव राजा येथे केले.
देऊळगावराजा येथील नगर परिषदेच्‍या नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण मुख्‍यमंत्री देवेन्द्र फडणवीस  यांच्‍याहस्‍ते आज करण्ययात आले. त्‍यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर पर्यटन मंत्री जयकुमार रावल, महसुल राज्‍यमंत्री संजय राठोड, नगर विकास राज्‍यमंत्री डॉ. रणजीत पाटील, खासदार प्रतापराव जाधव, जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा उमाताई तायडे, विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार चैनसुख संचेती, आमदार सर्वश्री डॉ संजय कुटे, डॉ. संजय रायमुलकर, डॉ. शशिकांत खेडेकर, देऊळगावराजा नगर परिषदेच्‍या अध्‍यक्षा सुनिता शिंदे, उपाध्‍यक्ष प्रविण झोरे आदींसह नगर परिषद पदाधिकारी उपस्थित होते.
       राज्‍यातील लहान शहरांचा विकास करीत असताना शासनाने या शहरांतील मुलभूत सुविधांसाठी भरघोस निधी उपलब्‍ध करुन दिला असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले,  सात हजार कोटींहून २१ हजार कोटी इतका निधी छोटया शहरांतील विकास कामांसाठी उपलब्‍ध करुन देण्‍यात आला आहे. केंद्र सरकारच्‍या मदतीनेही  नगर पालिका क्षेत्रात मोठया प्रमाणात विकास कामे करण्‍यात येत आहेत. रस्‍ते, वीज, पाणी या मुलभूत सुविधांसाठी अभूतपूर्व निधी देण्‍यात आला आहे. यापुढेही प्रस्‍तावित केलेल्‍या विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. बालाजीची नगरी म्‍हणून ओळखल्‍या जाणाऱ्या देऊळगाव राजाच्‍या सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबध्‍द आहे, अशी ग्‍वाहीही यावेळी मुख्‍यमंत्री यांनी दिली.
            पर्यटन मंत्री जयकुमार रावल यावेळी म्‍हणाले की, देऊळगाव राजाच्‍या सु‍शोभिकरणासाठी सव्‍वा कोटी इतका निधी मंजूर करण्‍यात आला आहे. या शहराच्‍या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. शहराच्‍या विकासाचे जे काही प्रस्‍ताव असतील तेही मान्‍य करण्‍यात येतील. कार्यक्रमाचे  प्रास्‍ताविक नगराध्‍यक्षा सुनिता शिंदे यांनी केले.
            देऊळगावराजा नगर परिषदेची नवीन प्रशासकीय इमारत सर्व सुविधांनीयुक्‍त सुसज्‍ज अशी बांधण्‍यात आली आहे. इमारत निर्माणासाठी 3 कोटी 20 लक्ष इतका निधी खर्च झाला आहे. वैशिष्‍टयपूर्ण निधी योजनेतून इमारतीचे बांधकाम करण्‍यात आले आहे. सर्व विभागांसाठी स्‍वतंत्र अशी व्‍यवस्‍था आहे. सुमारे 2308 चौ.मी. बांधकाम असून या भव्‍य इमारतीमुळे देऊळगावराजा शहराच्‍या वैभवात भर पडली आहे. कार्यक्रमाला नगर परिषद पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, संबंधित विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
****








वृतक्रमांक – 169                                                                                                                                           दि. 14 फेब्रुवारी 2019
मोठया शहरांबरोबरच लहान शहरांच्‍या विकासावरही शासनाचा भर
-          मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस
  • देऊळगावराजा शहरातील नगर परिषदेच्‍या नवीन प्रशासकीय इमारतीचे थाटात लोकार्पण
  • देऊळगांव राजा शहराच्या विकासासाठी भरघोस निधी
बुलडाणा, दि. १४ –केंद्र सरकारच्‍या मदतीने छोटया शहरातील विविध विकास कामांसाठी मोठया प्रमाणात निधी उपलब्‍ध करुन देण्‍यात आला आहे. बालाजी नगरी म्‍हणून ओळखल्‍या जाणाऱ्या देऊळगावराजा शहरातही अनेक विकासाची कामे करण्‍यात आली असून या शहराच्‍या सर्वांगिण विकासासाठी यापुढेही निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. मागील चार वर्षांत राज्‍य शासनाने मोठया शहरांबरोबरच लहान शहरांच्‍या विकासावरही प्रामुख्‍याने भर दिला आहे, असे प्रतिपादन मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज देऊळगांव राजा येथे केले.
देऊळगावराजा येथील नगर परिषदेच्‍या नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण मुख्‍यमंत्री देवेन्द्र फडणवीस  यांच्‍याहस्‍ते आज करण्ययात आले. त्‍यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर पर्यटन मंत्री जयकुमार रावल, महसुल राज्‍यमंत्री संजय राठोड, नगर विकास राज्‍यमंत्री डॉ. रणजीत पाटील, खासदार प्रतापराव जाधव, जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा उमाताई तायडे, विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार चैनसुख संचेती, आमदार सर्वश्री डॉ संजय कुटे, डॉ. संजय रायमुलकर, डॉ. शशिकांत खेडेकर, देऊळगावराजा नगर परिषदेच्‍या अध्‍यक्षा सुनिता शिंदे, उपाध्‍यक्ष प्रविण झोरे आदींसह नगर परिषद पदाधिकारी उपस्थित होते.
       राज्‍यातील लहान शहरांचा विकास करीत असताना शासनाने या शहरांतील मुलभूत सुविधांसाठी भरघोस निधी उपलब्‍ध करुन दिला असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले,  सात हजार कोटींहून २१ हजार कोटी इतका निधी छोटया शहरांतील विकास कामांसाठी उपलब्‍ध करुन देण्‍यात आला आहे. केंद्र सरकारच्‍या मदतीनेही  नगर पालिका क्षेत्रात मोठया प्रमाणात विकास कामे करण्‍यात येत आहेत. रस्‍ते, वीज, पाणी या मुलभूत सुविधांसाठी अभूतपूर्व निधी देण्‍यात आला आहे. यापुढेही प्रस्‍तावित केलेल्‍या विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. बालाजीची नगरी म्‍हणून ओळखल्‍या जाणाऱ्या देऊळगाव राजाच्‍या सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबध्‍द आहे, अशी ग्‍वाहीही यावेळी मुख्‍यमंत्री यांनी दिली.
            पर्यटन मंत्री जयकुमार रावल यावेळी म्‍हणाले की, देऊळगाव राजाच्‍या सु‍शोभिकरणासाठी सव्‍वा कोटी इतका निधी मंजूर करण्‍यात आला आहे. या शहराच्‍या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. शहराच्‍या विकासाचे जे काही प्रस्‍ताव असतील तेही मान्‍य करण्‍यात येतील. कार्यक्रमाचे  प्रास्‍ताविक नगराध्‍यक्षा सुनिता शिंदे यांनी केले.
            देऊळगावराजा नगर परिषदेची नवीन प्रशासकीय इमारत सर्व सुविधांनीयुक्‍त सुसज्‍ज अशी बांधण्‍यात आली आहे. इमारत निर्माणासाठी 3 कोटी 20 लक्ष इतका निधी खर्च झाला आहे. वैशिष्‍टयपूर्ण निधी योजनेतून इमारतीचे बांधकाम करण्‍यात आले आहे. सर्व विभागांसाठी स्‍वतंत्र अशी व्‍यवस्‍था आहे. सुमारे 2308 चौ.मी. बांधकाम असून या भव्‍य इमारतीमुळे देऊळगावराजा शहराच्‍या वैभवात भर पडली आहे. कार्यक्रमाला नगर परिषद पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, संबंधित विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
****















वृतक्रमांक – 170                                                                                                                                           दि. 14 फेब्रुवारी 2019

मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी श्रीसंत नरहरी संस्थानला भेट          
बुलडाणा, दि. १४ –देऊळगांव राजा शहराजवळ आमना नदी काठावरील श्रीसंत नरहरीनाथ महाराज पैठणकर यांच्या संस्थानला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी पर्यटन मंत्री जयकुमार रावल, खासदार प्रतापराव जाधव, विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष चैनसुख संचेती, आमदार डॉ शशिकांत खेडेकर, संस्थानचे अध्यक्ष मोहननाथ भानुनाथ पैठणकर, जि.प अध्यक्षा उमाताई तायडे, उद्बोधनाथ पैठणकर, माधव गिते, वसंत थिगळे, रवी सुरडकर, रोहीत सराफ आदी उपस्थित होते.
  यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते मोहननाथ महाराज पैठणकर  लिखीत ज्ञानेश्वर महाराज प्रणीत नाथ परंपरा पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीसंत नरहरी महाराज पैठणकर यांचे पूजन केले. संस्थानच्यावतीने मुख्यमंत्री यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मोहननाथ महाराज यांनी संस्थानची माहीती दिली.
                                                                                    ……… 
वृतक्रमांक – 171                                                                                                                                          दि. 14 फेब्रुवारी 2019
मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांचे सिंदखेड राजा हेलिपॅडवर स्वागत          
बुलडाणा, दि. १४ –राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज सिंदखेड राजा विकास आराखडा भूमीपुजन कार्यक्रमासाठी सिंदखेड राजा येथे हेलिकॉप्टरने माँ जिजाऊ सृष्टी येथील हेलिपॅडवर आगमन झाले. जिल्हा प्रशासनाच्यावतीने विभागीय आयुक्त पियुष सिंग, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी स्वागत केले. तसेच यावेळी गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, खासदार प्रतापराव जाधव, जि.प अध्यक्षा उमाताई तायडे, आमदार सर्वश्री चैनसुख संचेती, डॉ संजय कुटे, डॉ शशिकांत खेडेकर, डॉ. संजय रायमूलकर, माजी आमदार तोताराम कायंदे, धृपदराव सावळे, नगराध्यक्ष नाझेर काझी, उपनगराध्यक्ष सीमाताई शेवाळे, बुलडाणा कृउबास सभापती जालींधर बुधवत, सुरेश अप्पा खबुतरे, माजी नगराध्यक्ष छगन मेहेत्रे, नितीन बाप्पू देशमुख, विनोद वाघ, नगरसेवक दिपक बोरकर आदी उपस्थित होते.
                                                            ………..


बुधवार, १३ फेब्रुवारी, २०१९

कृषि खत विक्रेत्यांसाठी डेसी (DAESI) प्रशिक्षण


कृषि खत विक्रेत्यांसाठी डेसी (DAESI) प्रशिक्षण
Ø अर्ज htt://www.manage.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध

अमरावती, दि. 13 : अमरावती जिल्ह्यातील कृषि खत विक्रेत्यांसाठी DAESI (डिप्लोमा इन ॲग्रीकल्चर एक्सटेंशन सर्व्हीसेस फॉर इनपुट डीलर्स) हा एक वर्ष कालावधीचा (आठवड्यातुन 1 दिवस) प्रशिक्षण वर्ग प्राचार्य कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, अमरावती यांच्यामार्फत चालविण्यात येणार आहे. प्रशिक्षण प्रवेशासाठी इ. 10 वी पास व कृषि खत विक्रीचा परवाना असणे आवश्यक आहे. इ. 10 वी किंवा 12 वी पास प्रमाणपत्र व गुणपत्रक, आधार कार्ड, पार पासपोर्ट साईज फोटो, कृषि खत विक्रिचा परवाना आदी कागदपत्रे प्रवेश घेण्यासाठी आवश्यक आहे. कृषि खत विक्रेत्यांसाठी  प्रवेश क्षमता 80 उमेदवार असून 10 हजार रु. प्रवेश शुल्क आहे.
प्रवेश अर्जांचे वाटप व छायांकित कागदपत्रासह परिपूर्ण अर्ज दि.15 ते  16 फेब्रुवारी या कालावयधीत 11.00 ते 5.00 या वेळेत स्वीकारले जाईल. अर्ज सादर करतेवेळी मुळ कागदपत्रे असणे आवश्यक आहे. दि. 20 फेब्रुवारी  रोजी अंतीम 80 उमेदवारांची प्रवेश यादी निश्चित करुन प्रतीक्षा यादी  जाहिर करण्यात येईल. तसेच त्याच दिवशी मुळ कागदपत्रे तपासणी करण्यात येईल. दि. 22 फेब्रुवारी 2019 निवड झालेल्या उमेदवारांनी 10 हजार रु. रकमेचा प्रकल्प संचालक, आत्मा, अमरावती यांचे नावे काढलेला राष्ट्रीयकृत बँकेचा डी. डी जमा करणे व प्रवेश निश्चित करणे आवश्यक राहिल.
प्रवेश अर्ज मिळण्याचे व स्वीकारण्याचे ठिकाण प्रकल्प संचालक, आत्मा कार्यालय, विसावा कॉलनी, जुना बायपास रोड, अमरावती असे असून संपकासाठी दुरध्वनी क्र. 0721-2660012 हा आहे.  प्राप्त अर्जामधुन प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य पध्दतीने निवड करण्यात येईल. अर्ज दोन प्रतीत भरुन सादर करावे. प्रवेश अर्ज htt://www.manage.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. यापूर्वी अर्ज केलेल्या अर्जदारांनी नविन बॅचकरिता पुनश्च अर्ज करणे अनिवार्य राहील, असे आत्माचे प्रकल्प संचालक यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
****