कृषि खत
विक्रेत्यांसाठी डेसी (DAESI) प्रशिक्षण
Ø अर्ज htt://www.manage.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध
अमरावती, दि. 13 : अमरावती जिल्ह्यातील कृषि खत विक्रेत्यांसाठी
DAESI (डिप्लोमा इन ॲग्रीकल्चर एक्सटेंशन सर्व्हीसेस फॉर इनपुट डीलर्स) हा एक वर्ष
कालावधीचा (आठवड्यातुन 1 दिवस) प्रशिक्षण वर्ग प्राचार्य कृषि विस्तार व्यवस्थापन
प्रशिक्षण संस्था, अमरावती यांच्यामार्फत चालविण्यात येणार आहे. प्रशिक्षण
प्रवेशासाठी इ. 10 वी पास व कृषि खत विक्रीचा परवाना असणे आवश्यक आहे. इ. 10 वी
किंवा 12 वी पास प्रमाणपत्र व गुणपत्रक, आधार कार्ड, पार पासपोर्ट साईज फोटो, कृषि
खत विक्रिचा परवाना आदी कागदपत्रे प्रवेश घेण्यासाठी आवश्यक आहे. कृषि खत
विक्रेत्यांसाठी प्रवेश क्षमता 80 उमेदवार
असून 10 हजार रु. प्रवेश शुल्क आहे.
प्रवेश अर्जांचे वाटप व छायांकित कागदपत्रासह परिपूर्ण अर्ज
दि.15 ते 16 फेब्रुवारी या कालावयधीत 11.00
ते 5.00 या वेळेत स्वीकारले जाईल. अर्ज सादर करतेवेळी मुळ कागदपत्रे असणे आवश्यक
आहे. दि. 20 फेब्रुवारी रोजी अंतीम 80
उमेदवारांची प्रवेश यादी निश्चित करुन प्रतीक्षा यादी जाहिर करण्यात येईल. तसेच त्याच दिवशी मुळ
कागदपत्रे तपासणी करण्यात येईल. दि. 22 फेब्रुवारी 2019 निवड झालेल्या उमेदवारांनी
10 हजार रु. रकमेचा प्रकल्प संचालक, आत्मा, अमरावती यांचे नावे काढलेला
राष्ट्रीयकृत बँकेचा डी. डी जमा करणे व प्रवेश निश्चित करणे आवश्यक राहिल.
प्रवेश अर्ज मिळण्याचे व स्वीकारण्याचे ठिकाण प्रकल्प
संचालक, आत्मा कार्यालय, विसावा कॉलनी, जुना बायपास रोड, अमरावती असे असून संपकासाठी
दुरध्वनी क्र. 0721-2660012 हा आहे. प्राप्त अर्जामधुन प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य
पध्दतीने निवड करण्यात येईल. अर्ज दोन प्रतीत भरुन सादर करावे. प्रवेश अर्ज htt://www.manage.gov.in
या वेबसाईटवर उपलब्ध आहे. यापूर्वी अर्ज केलेल्या अर्जदारांनी नविन बॅचकरिता पुनश्च
अर्ज करणे अनिवार्य राहील, असे आत्माचे प्रकल्प संचालक यांनी एका प्रसिध्दी
पत्रकाद्वारे कळविले आहे.
****
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा