विद्यार्थ्यांच्या
मार्गदर्शनासाठी समुपदेशकांची नियुक्ती
अमरावती दि. 15 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च
माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीणे पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर,
अमरावती,नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च 2019
मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च् माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इ.12 वी दिनांक 21
फेब्रुवारी 2019 ते दिनांक 20 मार्च 2019 व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा
इ. 10 वी दिनांक 1 मार्च 2019 ते दिनांक 22 मार्च 2019 या कालावधीत आयोजित करण्यात
आली आहे.
परीक्षेच्या
काळात अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भितीने मानसिक
दडपणाखाली असतात. अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी
ऑनलाईन समुपदेशन करण्याकरीता राज्यमंडळ स्तरावरुन समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक
खालील प्रमाणे आहेत. 7767960804,7066475360,8668392232, 8459112133,9619643730,7796874474,9561220152,8530608947,7066128995,7387501892
उपरोक्त भ्रमणध्वनी क्रमांक दिलेले समुपदेशक परीक्षा
कालावधी सकाळी 8.00 ते रात्री 8.00 या कालावधीतच विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनीद्वारे
नि:शुल्क आवश्यक ते समुपदेशन करतील. मात्र विद्यार्थी, पालक यांनी परीक्षा केंद्र,
बैठक व्यवस्था व प्रश्नपत्रिकेसंबधित प्रश्न इत्यादीबाबत समुपदेशकांना विचारणा करु
नये याची नोंद घ्यावी. पुणे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.
****
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा