रस्ता
बांधकामामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल
अमरावती, दि. 02 : रस्ता शहरातील गांधी चौक ते इस्माईल कटपीस
पर्यंत रस्त्याचे कॉक्रीट बांधकाम सावजनिक बांधकाम विभाग मार्फत सुरु करावयाचे
आहे. या लांबीमधील गांधी चौक ते जवाहर गेट पर्यंत कॉक्रीट रस्ता बांधकाम हाती
घ्यावयाचे आहे. या लांबीचे सद्यस्थितीत अर्ध्यां रुंदीमध्ये बांधकाम सुरु राहणार
आहे, आणि अर्ध्यां रुंदीत हलकी वाहतुक सुरु राहिल. तरी या रस्त्यावरील वाहतुक बंद
राहणार आहे. सदर रस्ता हा दि. 1 फेब्रुवारी 2019 ते 15 फेब्रुवारी 2019 पर्यंत बंद
राहिल.
अमरावती शहरातील पठाण चौक ते तवक्कल किराणा पर्यंत
रस्त्याचे कॉक्रीट बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभाग, अमरावती मार्फत सुरु करावयाचे
आहे. त्यातील प्रथम टप्याचे पठाण चौक ते चार खंबापर्यंत कॉक्रीट रस्ता पुर्ण झाले
आहे. त्या पुढील लांबीत चार खंबा चौक ते ताज नगर चौक कॉक्रीट रस्ता बांधकाम हाती
घ्यावयाचे आहे. तरी या रस्त्यावरील वाहतूक बंद राहणार आहे. सदर रस्ता हा 1
फेब्रुवारी 2019 ते 15 मार्च 2019 पर्यंत बंद राहील.
तरी नागरिकांनी पर्यांयी मार्गचा वापर करुन सहकार्य करावे,
असे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती यांनी कळविले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा