प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते
आज
पांढरकवड्यात विकासकामांचे लोकार्पण
अमरावती, दि.
15 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे शनिवारी (दि. 16 फेब्रुवारी)
सकाळी 10 वाजून 25 मिनीटांनी पांढरकवडा येथे आगमन होत आहे.
यावेळी त्यांच्या हस्ते केंद्रीय रस्ते
निधींतर्गत बांधण्यात येणाऱ्या विविध रस्त्यांच्या कामांची पायाभरणी होईल. नांदेड
जिल्ह्यातील किनवट येथील एकलव्य मॉडेल निवासी शाळेचे उद्घाटन, प्रधानमंत्री आवास
योजनेतील लाभार्थ्यांचा ई-गृहप्रवेश आणि लाभार्थ्यांना घरकुल वितरण, अजनी
(नागपूर)-पुणे रेल्वेला व्हीडीओच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखविणे, महाराष्ट्र
राज्य ग्रामीण जिवन्नोनती अभियानातील लाभार्थ्यांना प्रमाणपत्र तसेच धनादेशाचे
वितरण होईल. यावेळी प्रधानमंत्री यांचे भाषण होईल. या कार्यक्रमानंतर सकाळी 11.30
वाजता ते प्रयाण करतील.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा