शनिवार, २ फेब्रुवारी, २०१९


विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी समुपदेशकांची नियुक्ती

अमरावती, दि. 02 : उच्च माध्यमिक व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी- मार्च 2019 करिता अमरावती विभागीय मंडळस्तरावर 11 समुपदेशकांची नियुक्ती करण्यात येत असून त्यांच्यामार्फत विद्यार्थ्याना परीक्षेसंबंधी समस्याचे मार्गदर्शन, मदत करण्यासाठी सकाळी 8.00  ते सायंकाळी 8.00 हा वेळ  सुरु राहील.
ही सुविधा दिनांक 21 फेब्रुवारी  ते 22 मार्च 2019 या कालावधीपर्यंत सुरु राहील.
भ्रमणध्वनीवरुन विद्यार्थ्याचे समुपदेशन करणाऱ्या समुपदेशकांची नावे व भ्रमणध्वनी क्रमांक पुढील प्रमाणे आहेत. अमरावती जिल्ह्याकरीता- सी. एस. केाहळे,(9423649514) डी. एस .चौधरी, (9421785605) डी.जी.मेटांगे (9420187903),सुनिता दामले (9623490185) अकोला जिल्ह्यासाठी एच. आर. हिंगणकर, (9371641764)  एन.आर. गोंडचर (9922063636) यवतमाळ जिल्ह्यासाठी ए.जी. ठमके (9423625414)  पी.बी.सुरोशे, (9420895934), बुलडाणा जिल्ह्यासाठी व्ही.डी.भारसाकळे, (9422926325) एस.एस. लालवाणी (8275232316),  आणि वाशिम  पी.के.ठाकरे तसेच 0721-2662608 हेल्पलाईन दूरध्वनी सुरु राहील,  असे अमरावती विभागीय मंडळाचे सचिव अनिल पारधी यांनी कळविले आहे.
****

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा