विभागीय आयुक्त कार्यालयात
संत सेवालाल महाराज यांना अभिवादन
अमरावती, दि. 15 : संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी विदर्भ पाटबंधारे महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार सुनील देशमुख, महसूल उपायुक्त गजेंद्र बावणे, पुरवठा उपायुक्त रमेश मावस्कर, तहसिलदार वैशाली पाथरे यांचेसह अन्य वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून आदरांजली वाहिली.
यावेळी जम्मू-काश्मिरच्या पुलवामा येथील दहशतवादी संघटनेच्या आत्मघातकी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना मौन पाळून श्रध्दाजंली वाहिली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा