शुक्रवार, १५ फेब्रुवारी, २०१९

पोलीस शिपाई पदभरती प्रक्रियेत बदलासंबंधी सूचना


पोलीस शिपाई पदभरती प्रक्रियेत बदलासंबंधी सूचना
Ø  आता लेखी परीक्षा प्रथम, तद्नंतर शारिरीक चाचणी

अमरावती, दि.  15 :  महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामाच्या स्वरुपात बदल झाल्याने पेालीस शिपाई पदावर बुध्दीमान उमेदवारांची निवड होण्याची आवश्यता  आहे. तसेच पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेतील शारिरीक चाचणी दरम्यान होणाऱ्या दुर्घटना या बाबी विचारात घेऊन गृह विभागाने 18 जानेवारीच्या शासन निर्णयानुसार पोलीस शिपाई पदभरती प्रकियेत बदल केला आहे.
नवीन पध्दतीअनुसार पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत उमेदवारांची लेखी परीक्षा प्रथम घेण्यात येणार आहे. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांपैकी पोलीस घटक कार्यालयाच्या आस्थापनेवर रिक्त होणाऱ्या पदांच्या प्रमाणात आवश्यक तेवढयाच योग्य उमेदवारांना शारिरीक चाचणीसाठी बोलविण्यात येणार आहे. यामुळे भरती प्रक्रिया दीर्घकाळ सुरु न राहता जलद गतीने पार पडेल, आणि जिल्ह्यातील उमेदवारांना जास्त दिवस ताटकळत राहावे लागणार नाही.
भरती प्रक्रियेत केलेल्या बदलांचा उमेदवारांना निश्चितच फायदा होईल, असे वाशिमच्या पोलीस अधीक्षक, मोक्षदा पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

****

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा