बुधवार, २७ फेब्रुवारी, २०१९

पोलिस दलातर्फे नागरिकांच्या सुविधेसाठी महाराष्ट्र पोलिस सिटीझन पोर्टल कार्यान्वित


पोलिस दलातर्फे नागरिकांच्या सुविधेसाठी
महाराष्ट्र पोलिस सिटीझन पोर्टल कार्यान्वित

            अमरावती, दि. 27:  महाराष्ट्र पोलीस दलातर्फे नागरीकांना पोलीस विभागाशी संबंधित विविध सेवा व  परवाण्याकरीता ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा सीसीटीएनएस कार्यप्रणालीशी संबंधीत असलेल्या सिटीझन पोर्टलद्वारे (www.mhpolice.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
            सिटीझन पोर्टल चा उपयोग करुन नागरिकांना सभा, मिरवणुका, लाऊडस्पीकर, चारित्र्य पळताळणी, सुरक्षा रक्षक पडताळणी, गणपती व नवदुर्गा मंडळाची परवानगी इत्यादी ऑनलाईन सेवा उपलब्ध होणार आहे. तसेच या पोर्टलवर दाखल झालेल्या गुन्ह्याची प्रथम खबर (FIR) पाहणे, अटक आरोपीची माहिती, बेवारस व अनोळखी प्रेतदेहाचे तपशील, चोरीस गेलेल्या वाहनांची माहिती, हरविलेल्या इसमांची माहीती इत्यादी ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
            राज्याच्या पोलीस महासंचालक यांनी राज्यातील सर्व पोलीस आयुक्तालयातंर्गत येणाऱ्या शहरी भागामध्ये भाड्याने राहणारे भाडेकरु, पेइंग गेस्ट यांची संपूर्ण माहिती सिटीझन पोर्टलवर सादर करण्याची जबाबदारी घर मालकाची असल्यामुळे परिपत्रकाद्वारे माहिती भरण्यासाठी राज्यातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे.
            सिटीझन पोर्टलवर भाडेकरुची माहिती सादर करण्याची घरमालकांना नमुद संकेतस्थळावर युजर आयडी तयार करुन त्याद्वारे भाडेकरुचा मुळ पत्ता, व्यवसाय, ओळखपत्र तसेच फोटोसह माहीती द्यावी लागणार आहे. उपलब्ध करुन देण्यात आलेल्या माहितीची संबंधीत पोलीस ठाणेकडून तपासणी करण्यात येणार आहे.
            आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांच्या अनुषंगाने दक्षतेचा उपाय म्हणून ही कार्यवाही होणार असल्याने अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी अमरावती शहरामध्ये ज्यांच्या घरामध्ये भाडेकरी ठेवले आहेत त्यांची माहीती सिटीझन पोर्टलवर सादर करण्याचे जाहीर आवाहन केले आहे.
            नागरिकांना माहिती भरतांना अडचण आल्यास संबंधीत पोलीस ठाणेतील खुपीया पोलीस कर्मचारी किंवा पोलीस आयुक्त कार्यालयातील सीसीटीएनएस कक्षाशी संपर्क करण्याबाबत व पोलीस उपायुक्त (मुख्यालय), प्रदीप चव्हाण सहायक पोलीस निरिक्षक, अतुलवर प्रभारी अधिकारी सीसीटीएनएस कक्ष यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा