शनिवार, २ फेब्रुवारी, २०१९

मुक्त विद्यालय मंडळासाठी इयत्ता 5 वी व 8 वीच्या ऑनलाईन नाव नोंदणी प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ


मुक्त विद्यालय मंडळासाठी
इयत्ता 5 वी  व 8 वीच्या ऑनलाईन
नाव नोंदणी प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ
Ø  अंतीम मुदतवाढ 15 फेब्रुवारी
Ø  http://msbos.mh-ssc.ac.in संकेतस्थळ उपलब्ध

अमरावती, दि. 02 : महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामध्ये इयत्ता 5 वी व इयत्या 8 वी साठी प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता ऑनलाईन पध्दतीने नावनोंदणी प्रवेश अर्ज स्विकारण्याचा कालावधी दिनांक 31 जानेवारी 2019 पर्यंत निश्चित करण्यात आला होता. उपरोक्त कालावधी संपुष्टात आल्यामुळे विद्यार्थ्यांच्या हितासाठी ऑनलाईन नावनोंदणी प्रवेश प्रक्रियेस 15 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रियेच्या तारखा पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार, दि. 1 ते 15 फेब्रुवारी पर्यत विद्यार्थ्यांनी नावनोंदणी करुन ऑनलाईन/ ऑफलाईन अर्ज भरावे. शनिवार, दि. 2 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी दरम्यान विद्यार्थ्यांनी मुळ अर्ज, विहित शुल्क अर्जावार नमूद संपर्क केंद्र शाळामध्ये जमा करावे. शुक्रवार दि. 22 फेब्रुवारी पर्यंत संपर्क केंद्र शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज विहित शुल्क, मुळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडहाकडे जमा करावी. प्रवेश प्रक्रियेस सामील होणाऱ्या विद्यार्थ्यांनी व शाळांनी http://msbos.mh-ssc.ac.in संकेतस्थळाचा उपयोग करावा. संकेतस्थळावर दिलेल्या सुंचनांचे वाचन करुन अर्ज भरावे, असे महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय, मंडळ पुण्याचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी एका प्रकटनाद्वारे कळविले आहे.
****

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा