रविवार, ३० जून, २०१९

अमरावती विभागात सर्वदूर पाऊस !


अमरावती विभागात सर्वदूर पाऊस !

अमरावती, दि.30: अमरावती विभागात आज सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात सर्वच तालुक्यात पाऊस झाला. या कालावधीत विभागात बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक सरासरी 26 मिलीमिटर तर वाशिम जिल्ह्यात सर्वात कमी 20.7 मि.मि. पाऊस झाला.
विभागात नोंदला गेलेला तालुकानिहाय पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी यंदा 1 जून पासून आजवर झालेल्या पवसाची आहे. सर्व आकडेवारी मिलीमिटर परिमाणात आहे.
अमरावती जिल्हा : अमरावती 42.2 (104.1), भातकूली 6.8 (68), नांदगाव खंडेश्वर 32 (91), चांदूर रेल्वे 36.4 (104.5), धामणगाव रेल्वे 32 (112.5), तिवसा 37.5 (49.8), मोर्शी 13.8 (55.4), वरुड 17 (55.1), अचलपूर 6.9 (65.2), चांदूर बाजार 5.1 (63.7), दर्यापूर 17.4 (71.1), अंजनगाव 10.2 (47.6), धारणी 10.8 (126.6), चिखलदरा 27.2 (121), अमरावती जिल्ह्यात चोवीस तासात सरासरी 21.1 मि.मि पाऊस झाला. जिल्ह्यात यंदा आजवर सरासरी 81.1 मि.मि. पाऊस झाला. पावसाचे  हे प्रमाण 1 ते 30 जून या कालावधीत अपेक्षित पाऊसमानाच्या 55.6 टक्के तर वार्षिक सरासरीच्या 10 टक्के आहे.
अकोला जिल्हा :- अकोल 10.2 (62), बार्शी टाकळी 0.8 (73.9), अकोट 55.3 (120.8), तेल्हारा 46.1 (153.2), बाळापूर 27.4 (117.1), पातूर 6 (116.5),मुर्तीजापूर 21.3 (62.9), जिल्ह्यात 24 तासात सरासरी 23.9 मि.मि तर आजवर 100.9 मि.मि पाऊस झाला आहे. पावसाचे हे प्रमाण 1 ते 30 जून या कालावधीत अपेक्षित पावसाच्या 74.6 टक्के तर वार्षिक सरासरीच्या 14.5 टक्के आहे.
यवतमाळ जिल्हा : यवतमाळ 12 (45.9), बाभूळगाव 18.2 (63.9),कळंब 17.3 (42.6), आर्णी 23.7 (99.8), दारव्हा 29.6 (77.9), दिग्रस 21.5 (71.3), नेर 44.8 (91.3), पुसद 16.8 (53.1), उमरखेड 15.3 (49.1), महागाव 15.5 (51.8), केळापूर 18.4 (47.2), घाटंजी 10.1 (63.7), राळेगाव 27.8 (72.1), वणी 36.2 (75), मारेगाव 44.6 (80.9), झरी जामणी 29 (69.2) जिल्ह्यात 24 तासात सरासरी 23.8 तर यंदाच्या हंगामात आजवर सरासरी 65.9 मि.मि पाऊस झाला आहे. पावसाचे हे प्रमाण 1 ते 30 जून या कालावधीत अपेक्षित सरासरीच्या 37.5 टक्के तर वार्षिक सरासरीच्या तुलनेत 7.2 टक्के एवढे आहे.
बुलडाणा जिल्हा :- बुलडाणा 54.4 (225.1), चिखली 33 (150), देऊळगाव राजा 15.2 (56.4), मेहकर 9.8 (133.1), लोणार 11.3 (109.5), सिंदखेड राजा 20.9 (110.6), मलकापूर 10.2 (83.2), नांदूरा 24.3 (95.1), मोताळा 16 (92), खामगाव 20.4 (107.5), शेगाव 23.4 (180.2), जळगाव जामोद 39.6 (161) संग्रामपूर 59 (181). जिल्ह्यात दिवसभरात 26 तर यंदाच्या हंगामात आजवर 129.6 मि.मि. पाऊस झाला. पावसाचे हे प्रमाण 1 ते 30 जून कालावधीत अपेक्षित सरासरीच्या 91.5 टक्के तर वार्षिक सरासरीच्या 19.4 टक्के एवढा आहे.
वाशिम जिल्हा : - वाशिम 24.8 (100.7), मालेगाव 4.3 (93.5), रिसोड 27.6 (88), मंगरुळपिर 14.6 (91.8), मानोरा 13.9 (70.2), कारंजा 39 (104.4), जिल्ह्यात 24 तासात 20.7 तर 1 जून पासून आजवर 91.4 मि.मि. पाऊस झाला. पावसाचे हे प्रमाण 1 ते 30 जून या कालावधीतील अपेक्षित सरासरीच्या 55.8 टक्के तर वार्षिक सरासरीच्या 11.4  टक्के इतके आहे.
****

शनिवार, २९ जून, २०१९

अमरावती विभागातील 51 तालुक्यात पाऊस !



अमरावती विभागातील 51 तालुक्यात पाऊस !

अमरावती, दि.29: अमरावती विभागात आज सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात 56 पैकी 51 तालुक्यात पाऊस झाला. या कालावधीत विभागात वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक सरासरी 15 मिलीमिटर तर अमरावती जिल्ह्यात सर्वात कमी 5 मि.मि. पाऊस झाला.
विभागात नोंदला गेलेला तालुकानिहाय पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी यंदा 1 जून पासून आजवर झालेल्या पवसाची आहे. सर्व आकडेवारी मिलीमिटर परिमाणात आहे.
अमरावती जिल्हा : अमरावती निरंक (61.9), भातकूली 8 (61.2), नांदगाव खडेश्वर 3 (59), चांदूर रेल्वे 6.7 (68.1), धामणगाव रेल्वे 17.6 (80.5), तिवसा निरंक (12.3), मोर्शी निरंक (41.6), वरुड निरंक (38.1), अचलपूर 1.2 (58.3), चांदूर बाजार निरंक (58.6), दर्यापूर 13.6 (53.7), अंजनगाव 1.9 (37.4), धारणी 13.8 (115.8), चिखलदरा 4.6 (93.8), अमरावती जिल्ह्यात चोवीस तासात सरासरी 5 मि.मि पाऊस झाला. जिल्ह्यात यंदा आजवर सरासरी 60 मि.मि. पाऊस झाला. पावसाचे  हे प्रमाण 1 ते 29 जून या कालावधीत अपेक्षित पाऊसमानाच्या 42.5 टक्के तर वार्षिक सरासरीच्या 7.4 टक्के आहे.
अकोला जिल्हा :- अकोल 6.1 (51.8), बार्शी टाकळी 2.5 (73.1), अकोट 14.9 (65.5), तेल्हारा 24.1 (107.1), बाळापूर 6.1 (89.7), पातूर 8.8 (110.5),मुर्तीजापूर 2.6 (41.6), जिल्ह्यात 24 तासात सरासरी 9.3 मि.मि तर आजवर 77 मि.मि पाऊस झाला आहे. पावसाचे हे प्रमाण 1 ते 29 जून या कालावधीत अपेक्षित पावसाच्या 58.9 टक्के तर वार्षिक सरासरीच्या 11 टक्के आहे.
यवतमाळ जिल्हा : यवतमाळ 2 (33.9), बाभूळगाव 13.6 (45.7),कळंब 1.5 (25.3), आर्णी 5.7 (76.2), दारव्हा 4.7 (48.3), दिग्रस 16 (49.8), नेर 2.3 (46.5), पुसद 13.4 (36.4), उमरखेड 5.6 (33.9), महागाव 11.5 (36.3), केळापूर 3.3 (28.7), घाटंजी 2.6 (56.6), राळेगाव 4.1 (44.3), वणी 3.8 (38.8), मारेगाव 1.1 (36.3), झरी जामणी 3.5 (40.2) जिल्ह्यात 24 तासात सरासरी 5.9 तर यंदाच्या हंगामात आजवर सरासरी 42.1 मि.मि पाऊस झाला आहे. पावसाचे हे प्रमाण 1 ते 29 जून या कालावधीत अपेक्षित सरासरीच्या 24.8 टक्के तर वार्षिक सरासरीच्या तुलनेत 4.6 टक्के एवढे आहे.
बुलडाणा जिल्हा :- बुलडाणा 18.4 (170.7), चिखली 14.9 (117), देऊळगाव राजा 4.2 (41.2), मेहकर 11.2 (123.3), लोणार 10.5 (98.2), सिंदखेड राजा 8.6 (89.7), मलकापूर 9 (73), नांदूरा 8.2 (70.8), मोताळा 10.4 (76), खामगाव 6.7 (87.1), शेगाव 6 (156.8), जळगाव जामोद 12.2 (121.4) संग्रामपूर 18.4 (122). जिल्ह्यात दिवसभरात 10.7 तर यंदा च्या हंगामात आजवर 103.6 मि.मि. पाऊस झाला. पावसाचे हे प्रमाण 1 ते 29 जून कालावधीत अपेक्षित सरासरीच्या 75.7 टक्के तर वार्षिक सरासरीच्या 15.5 टक्के एवढा आहे.

वाशिम जिल्हा : - वाशिम 9.6 (75.9), मालेगाव 18 (89.2), रिसोड 20.4 (60.4), मंगरुळपिर 18.1 (77.2), मानोरा 16.2 (56.3), कारंजा 7.9 (65.4), जिल्ह्यात 24 तासात 15 तर 1 जून पासून आजवर 70.7 मि.मि. पाऊस झाला. पावसाचे हे प्रमाण 1 ते 29 जून या कालावधीतील अपेक्षित सरासरीच्या 44.6 टक्के तर वार्षिक सरासरीच्या 8.9  टक्के इतके आहे.
****

शुक्रवार, २८ जून, २०१९

तलाठी संवर्गाची पदभरती 2 ते 26 जुलैपर्यंत


तलाठी संवर्गाची पदभरती 2 ते 26 जुलैपर्यंत
अमरावती, दि.27: राज्यातील सर्व शासकीय विभागातील मोठ्या प्रमाणावर असणारी रिक्त पदे भरण्याबाबत निश्चित करण्यात आलेल्या धोरणानूसार महा-आयटी (माहिती तंत्रज्ञान) विभाग  ह्या शासकीय विभागाच्या माध्यमातुन ई-महा परिक्षा या पोर्टलवरुन भरती प्रक्रिया करण्यात येत आहे. त्यानुसार महसूल विभागाच्या अखत्यारित असलेल्या तलाठी संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया  दि. 2 जुलै ते 26 जुलै, 2019 या कालावधीत महा-आयटीच्या माध्यमातुन ई-महापरीक्षेमार्फत करण्यात येत आहे.
उमेदवारांच्या पसंतीच्या जिल्ह्यात परीक्षा देण्यासाठी संगणक विषयक पायाभुत सोयी असणाऱ्या शाळा/कॉलेजची निवड महा-आयटीकडून करण्यात आलीअसून राज्यभरात एकुण 122 परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. प्रत्येक परीक्षा केंद्रावर उमेदवाराने खालील सहापैकी एक मुळ फोटो ओळखपत्र (Original Photo Id) आणणे अत्यावश्यक आहे. पॅन कार्ड/पासपोर्ट/वाहन अनुज्ञप्ती (Driving Licence)/मतदान ओळखपत्र/मुळ फोटोसह राष्ट्रीयकृत बँक पासबुक/आधार कार्ड ओळखपत्र फेरफार करुन तोतया उमेदवार येऊ नये यासाठी फोटो ओळखपत्राची रंगीत झेरॉक्स, e-Aadhar Card आणि फोटो ओळखपत्राची सॉफ्ट कॉपी वैध ओळखपत्र पुरावा म्हणून स्विकारली जाणार नाही, अशा सुचना उमेदवारांच्या हॉल तिकीटवर देण्यात आल्या आहेत.
महापरीक्षा पोर्टलवरुन घेतल्या जाणाऱ्या परीक्षा चालु असतांना नियमांचे पालन केले जात आहे ना, काही गैरप्रकार होत नाही ना, यावर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर निरिक्षक (Observer) म्हणून व महा-आयटीच्या मुंबई येथील कमांड रुममध्ये परीक्षा नियंत्रक (Exam Controller) म्हणून प्रत्येकी एका अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.
महापरीक्षा पोर्टलवरील तसेच हॉल तिकीटवरील सुचनांचे उमेदवारांनी तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. ह्या संदर्भात अधिक माहिती/तक्रार नोंदविण्यासाठी महापरीक्षाचा टोल फ्री क्र. 180030007766 व enquiry@mahapariksha.gov.in ह्या मेलवर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमरावती यांनी केले आहे.
000000

गुरुवार, २७ जून, २०१९

शेतकरी बांधवांनी खरिप हंगामाचे योग्य नियोजन करावे


शेतकरी बांधवांनी खरिप हंगामाचे योग्य नियोजन करावे

अमरावती, दि.27: यंदा मान्सुनचे आगमन लांबणीवर झाल्याने शेतकऱ्यांनी योग्य रित्या पिकाचे नियोजन करावे. शेतकऱ्यांना सर्व प्रकारची पारंपारिक पिके 30 जुन पर्यंत घेता येतील त्यामुळे 75 ते 100 मिली मिटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. पिकांच्या अदलाबदलीवर भर देण्याबरोबर जास्तीतजास्त क्षेत्रावर आंतरपिक पध्दती राबवावी सोयाबीन व कापूस पिकांमध्ये तूर हे आंतरपिक घ्यावे. तुरीचे पिक ऊशीरा पर्यंत घेता येईल. प्रामुख्याने प्रमाणीत बियाण्यांचा वापर करावा. सोयाबीनचे सुधारीत जातीचे दोन वर्षापासून वापरलेले घरचे बियाणेही वापरण्यास योग्य ठरते. मात्र बियाण्यांची उगवण क्षमता तपासून त्याप्रमाणे बियाणे मात्रा पेरणीसाठी वाढवावी. बियाण्यास पीएसबी व रॉयजोबीएक या सारख्या जैवीक खताची तसेच ट्रायकोडर्मा बुरशीनाशकाची प्रक्रीया करुनच पेरणी करावी. जनावरांसाठी चारा पिकांना स्थान द्यावे.ज्वारी, बाजरी व मक्याचा त्यात समावेश करावा.
शेतकऱ्यांनी वर्षानुवर्षापासून चालत आलेल्या मुलभूत तत्वांवर भर देण्याची गरज आहे. यात एकात्मीक अन्नद्रव्य व्यवस्थापन, सेंद्रीय खताचा वापर,जैवीक खतांचा वापर व व्यवस्थापन या महत्वाच्या बाबींचे नियोजन करण्याची गरज आहे. रासायनिक खतावर भर देण्याऐवजी त्यांचा तंतोतत व काटेकोरपणे वापर करावा. दिवसेंदिवस जमिनीतील लोह व गंधकाचे प्रमाण कमी होऊ लागले आहे तेव्हा या घटकांची शिफारस गरजेनुसार करावी. किड व रोगांसाठी प्रतिबंधक उपाय योजना करीता निबोंळी अर्काचा वापर करावा.पावसाच्या पाण्याचा थेंब अन थेंब जमिनीत जिरवण्याची गरज आहे, त्यासाठी जलसंधारण कामाअंतर्गत विहीर पुर्नभरण, नाल्याची कामे, बांधबंदिस्ती व चर खोदण्याची गरज आहे. त्यामुळे पाणी शेतातच मुरेल.
फळबागा व्यवस्थापनातर्गत संत्रा, मोंसबी, डाळींब बागेस नत्र, स्फुरद, पालाश व शेणखत प्रत्येक झाडास 5 टोपले देवून पाणी टाकावे. शेतकऱ्यांनी शेतातील बांधावरील,रस्तेच्या कडेवर व इतर ठिकाणी असलेल्या कडुनिंबाच्या वृक्षांखाली पडलेल्या निंबोळया त्वरीत गोळा करुन  स्वच्छ करुन वाळवून साठवणूक करावी व त्यांचा हंगामामध्ये फवारणीसाठी उपयोग करावा.
विभागात कृषि यांत्रिकीकरण याजनेअंतर्गत विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्रम आणि कोरडवाहू शेती विकास योजना इत्यादी योजनांच्या माध्यमातून व्यक्तिगत शेतकरी त्याचप्रमाणे शेतकरी गटांनी रुंद सरी वरंबा पध्दतीने लागवड करण्याकरीता बीबीएफ प्लँटर या सुधारीत कृषि अवजारांचा वापर करावा. बीबीएफ प्लँटर द्वारे रुंद सरी वरंबा पध्दतीने सोयाबीन लागवड केलेल्या क्षेत्रात एकरी सरासरी 4 ते 5 क्विंटल अतिरिक्त उत्पादन घेता येणे शक्य आहे. बीबीएफ प्लँटर द्वारे सोयाबीन पिकाची लागवड केल्यास हेक्टरी 20 किलो किमान बियाण्याची बचत होते. शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणी करीता बीबीएफ प्लॅटर वापरण्यास प्राधान्य द्यावे.
शेतकरी बांधवानी कृषि कार्यालयाशी संपर्क साधून पिकांचे योग्य व्यवस्थापन व नियोजन करावे असे आवहन सुभाष नागरे, विभागीय कृषि सहसंचालक, यांनी केले आहे.
****

बुधवार, २६ जून, २०१९

कुष्ठरोग्यांचे आर्थिक व सामाजिक पुनवर्सन


कुष्ठरोग्यांचे आर्थिक व सामाजिक पुनवर्सन

Ø  इयत्ता 10 वी 12 वी च्या  गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

अमरावती,दि. 26:  कुष्ठरोग या सामाजिक समस्येबाबत लोकांच्या मनात असलेली भिती, गैरसमज, अंधश्रध्दा (Social Stigma) दुर करण्याकरिता कुष्ठरोगग्रस्त व्यक्ती व त्यांच्या कुटूंबातील सदस्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचे समाजात पूर्विप्रमाणे स्थान मिळवून देण्यासाठी शासकीय सामाजिक पुनर्वसन (Social Rehabilitation)  हा नाविण्यपूर्ण व स्तृत्य उपक्रम राबविण्यात येतो.
राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या 150 व्या जयंतीनिमीत्त संपूर्ण देशात कुष्ठरोग निवारणार्थ विविध जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येतात.  अमरावतीच्या सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) यांचेकडून मागील पाच वर्षापासून जिल्ह्यातील कुष्ठरोगाचे प्रमाण व प्रसार कमी करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. समाजातील लोकांच्या मनात कुष्ठरोगाविषयी असलेले गैरसमज, अंधश्रध्दा व भिती दुर व्हावी व  कुष्ठरुगणांना  तात्काळ नि:शुल्क व नियमित औषधोपचार मिळावा त्यांचा विकृतीपासून बचाव करणे ही उपक्रमांची  मुख्य उद्दिष्टये आहेत. या विविध उपक्रमांसोबतच एक आगळा वेगळा व नावण्यिपूर्ण उपक्रम  21 जून रोजी  आरोग्य विभागाचे  सहा.संचालक (कुष्ठरोग) रुग्णालय,  येथे घेण्यात आला.
संपूर्ण अमरावती जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील कुष्ठरोगग्रस्त कुटूंबातील जे विद्यार्थी नुकत्याच झालेल्या इयत्ता 10 वी व 12 वी  परीक्षेमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेत, त्यांचा सत्कार या समारंभात करण्यात आला. या सोबतच कुष्ठरोगग्रस्त विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाकरीता कॉलेज बॅग, रजिस्टर व पेनाचे वाटप करण्यात आले. 32 विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उपस्थिती नोंदवली. तसेच या प्रसंगी दोन आर्थिकदुष्ट्या दुर्बल कुष्ठरुग्णांना शिलाई मशिन व आर्थिक मदत देण्यात आली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन जि.प.चे आरोग्य समिती, सभापती बळवंतराव वानखडे यांनी केले. कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी  जिल्हा शल्क चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम हे उपस्थित होते. तसेच विशेष अतिथी म्हणून आयुक्त म.न.पा अमरावती संजय निपाने, पाचार्य व्यवसायीक प्रशिक्षण केंद्र (व्हीटीसी) नाशिक, शैला फर्नांडीस, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. निकोसे व प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, एड्स नियंत्रण कार्यक्रम अमरावती अजय साखरे, जिल्हा लेखा व्यवस्थापक अशोक कोठारी उपस्थित होते.
कंत्राटी कुष्ठरोग कर्मचाऱ्याच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरावरुन अभिनंदन होत असून कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) अमरावती या कार्यालयाच्या संपूर्ण चमुने परिश्रम घेतले.

*****

शुक्रवार, २१ जून, २०१९

इयत्या 12 वी ऑनलाईन आवेदनपत्रे 24 जून पर्यंत सादर करावे


इयत्या 12 वी
ऑनलाईन आवेदनपत्रे 24 जून पर्यंत सादर करावे

अमरावती,दि. 21:  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत नियमित, पुनर्परिक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजने अंतर्गत व तुरळक विषय घेवून प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यासाठी इ. 12 वी ची परीक्षा जुलै-ऑगस्ट 2019 मध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. त्यासाठी परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षेची आवेदनपत्र ऑनलाईन पध्दतीने www.mahahsscboard.maharashtra.gov.in  किंवा www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरावयाची आहे. आवेदनपत्र विलंब शुल्काने भरण्याची मुदत दिनांक 24 जून 2019 पर्यंत असून नियमित व विलंब शुल्कासह भरलेल्या आवेदनपत्रांचे शुल्क चलनाद्वारे भरण्याचा कालावधी दिनांक 24 ते 29 जून 2019 असा राहिल. असे  डॉ. अशोक भोसले, सचिव, राज्यमंडळ पुणे यांनी कळविले आहे.
***

शेतकऱ्यांना अनुदानावर शेती अवजारे वाटप जून अखेर अर्ज आमंत्रित


शेतकऱ्यांना अनुदानावर शेती अवजारे वाटप
जून अखेर अर्ज आमंत्रित

अमरावती,दि. 21:  ‘ उन्नत शेती, समृध्द शेतकरी’ मोहिमेअंतर्गत सन 2019-20 या वर्षांत विभागातील सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदानावर शेतीउपयोगी अवजारे उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी 25 ते 30 जून या कालावधीत कृषि विभागाकडे अर्ज सादर करावे.
ट्रॅक्टर, लहान ट्रॅक्टर, पॉवर टिलर, पेरणी यंत्र, बी.बी.एफ. प्लॉटर, स्वयंमचलित रिपर कम, बाईडर, रिपर, कल्टीव्हेटर, पल्टी नांगर, सर्वप्रकारचे मळणी यंत्र, मिनी दाल मिल इ. अनुदान प्राप्त अवजारे असून या वर्षात  ट्रॅक्टर व ट्रॅक्टर, चलीत अवजारे करिता शेतकऱ्यांना अर्ज करता येईल तसेच पेरणी यंत्र व बी.बी.एफ. प्लॉन्ट करिता प्राधान्याने अर्ज करुन लगेच खरेदी करता येईल. प्रत्येक अर्जासोबत त्यांचेकडे किंवा कुटूंबातील अन्य सदस्याचा नावे ट्रॅक्टर असल्यास अर्ज करता येईल. अवजारासाठी शेतकऱ्यांने स्वतंत्र अर्ज करावा. ज्या अवजारास जास्तीत जास्त अनुदान देय आहे. त्या एकच यंत्र किंवा अवजारास अनुदान दिल्या जाईल. लाभार्थिची निवड करतांना ज्येष्ठतेनूसार तालुकास्तरावरच सोडत निश्चित करण्यात येईल. शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज कृषि विभागाचे कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी कार्यालयात मुदतीच्या आत सादर करावे. अर्जाचा नमुना तालुका कृषि अधिकारी तथा कृषि विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अनुदानाची रक्कम लाभार्थ्याच्या आधार लिंक असलेल्या बॅक खात्यात थेट जमा केली जाईल. अधिक माहितीसाठी कृषि कार्यालयाशी संपर्क करावा असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक अमरावती, विभाग अमरावती   सुभाष नागरे यांनी कळविले आहे.
****

जिल्ह्यात ठिकठिकाणी योग प्रात्यक्षिके निरामय जीवनासाठी योग आवश्यक - जिल्हाधिकारी शैलेश नवाल








जिल्ह्यात ठिकठिकाणी योग प्रात्यक्षिके
निरामय जीवनासाठी योग आवश्यक
-          जिल्हाधिकारी शैलेश नवाल

अमरावती,दि. 21: शरीर आणि मन या दोन्ही बाबी संतुलित ठेवण्यासाठी योग हा उत्तम पर्याय आहे. योगशास्त्रातून आयुष्यात संयम व शिस्त येते. निरोगी व निरामय जीवन जगण्यासाठी योग कलेचा दैनंदिन आयुष्यात समावेश करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे सांगितले.
जिल्हा प्रशासन, क्रीडा विभाग, शिक्षण विभाग, भारत स्वाभिमान (न्यास) पतंजली योग समिती, आर्ट ऑफ लिव्हिंग, जेसीआय सेंच्युरियन व योग क्षेत्रात कार्यरत विविध संस्था यांच्या सहकार्याने विभागीय क्रिडा संकुलात आंतरराष्ट्रीय जागतिक योग दिनानिमित्त योग प्रात्यक्षिके व साधनेचा कार्यक्रम झाला, त्यावेळी ते बोलत होते.
विभागीय क्रीडा संकुलात आज योगदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी सकाळी साडेसहापासूनच शहरातील अनेक मान्यवर, व्यावसायिक, गृहिणी, विविध शाळा- महाविद्यालयांचे विद्यार्थी आदी विविध क्षेत्रातील व्यक्तींची मोठी उपस्थिती होती. सातच्या सुमारास संकुलातील सभागृहात योग प्रात्यक्षिकांना सुरुवात झाली.   आर्ट ऑफ लिव्हिंगचे जिल्हा समन्वयक व योगप्रशिक्षक निरज अग्रवाल व त्यांच्या सहका-यांनी योग प्रात्यक्षिकांबद्दल मार्गदर्शन केले.  योगाच्या अवलंबामुळे केवळ शारीरीकच नव्हे, तर मानसिक कणखरपणा प्राप्त होतो व शांततेची अनुभूती मिळते, असे प्रशिक्षकांनी यावेळी सांगितले. प्रात्यक्षिकांद्वारे शरीर व मन संतुलन, समूह साधनेतून निर्माण होणारा नाद यांचा एक वेगळा अनुभव यानिमित्ताने सर्वांना घेता आला. 
शहरात श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ परिसर, डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय,  श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, विद्याभारती महाविद्यालय,  महर्षी गुरुकुल योगसाधना केंद्र, जिजाऊ सभागृह, पतंजली योग केंद्र, मोझरी गुरुकुंज, पोलीस मुख्यालय, एसआरपी कँप, मध्यवर्ती कारागृह परिसर, श्री संत गाडगेबाबा समाधी मंदिर, भारतीय महाविद्यालय, समर्थ विद्यालय, सेंट फ्रान्सिस विद्यालय, एलआयसी कार्यालय आदी विविध ठिकाणी योगदिनाचे आयोजन करण्यात आले होते. तालुका मुख्यालयातही योगदिनाचे आयोजन करण्यात आले होते, असे जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी सांगितले.
क्रीडा उपसंचालक श्रीमती प्रतिभा देशमुख, माध्यमिक शिक्षणाधिकारी निलिमा टाके यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

मंगळवार, १८ जून, २०१९

मौजा-अकोली नगर भूमापन चौकशी 20 रोजी



मौजा-अकोली
नगर भूमापन चौकशी 20 रोजी
अमरावती,दि. 18: अमरावती शहर महानगर पालिके अंतर्गत वाढीव विस्तारीत क्षेत्राचे भूमापन नकाशे व अभिलेख तयार करण्याचे काम पुर्ण झाले असून मौजा अकोली ता, जि. अमरावती या गावा अंतर्गत असलेल्या सर्व मिळकतीची नगर भुमापन चौकशी दिनांक 20 जुन 2019 पासून करण्यात येणार आहे. मौजा-अकोली ता. अमरावती जि. अमरावती (जुने नझूल वगळून) हद्दीतील सर्व मिळकत धारक/भुखंड धारक/ अभिन्यासातील भुखंड मालक तथा मालमत्ता धारकांनी विशेष उपअधिक्षक भुमि अभिलेख तथा चौकशी अधिकारी (श.मा.) क्र.2 अमरावती यांनी नियमाप्रमाणे बजाविलेल्या नोटीस दिनांकास उपस्थित राहून आपल्या मिळकतीबाबत अधिकृत/ नोंदणीकृत दस्त ऐवज सादर करुन आपला हक्क साबित करावा. नेमून दिलेल्या दिनांकास आपल्या मिळकतीबाबत अधिकृत/नोंदणीकृत दस्तऐवज सादर न केल्यास मालकी हक्क साबित होणार नाही याची संबंधित सर्व मिळकत धारकांनी नोंद घ्यावी.
            असे विशेष उपअधिक्षक भूमि अभिलेख तथा चौकशी अधिकारी (श.मा.) क्र 2, अमरावती यांनी कळविले आहे.
****

10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क ॲक्सीस बँकेत जमा करावे


10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांनी
परीक्षा शुल्क ॲक्सीस बँकेत जमा करावे

अमरावती,दि. 18: अमरावती मंडळातील सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांनी इयत्या 10 वी व इयत्या 12 वी जुलै-ऑगस्ट 2019 करिता आपल्या माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाइन पध्दतीने सादर केल्यानंतर त्या माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाद्यिालयाचे परीक्षा शुल्काचे बँक ऑफ इंडियाचे चलन ऑनलाईन तयार होणार असून ते डाऊनलोड करुन घ्यावयाचे आहे. परीक्षा शुल्क प्रचलित पध्दतीने बँक ऑफ इंडिया मध्ये भरणा न करता ते ॲक्सीस बँकेत सुधारीत कार्यपध्दतीने भरणा करावयाचा आहे.
सर्व कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्याकडे विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्कापोटी जमा होणारी रक्कम माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांच्या बँक खात्यामध्ये जमा करावी आणि ऑनलाईन चलन डाऊनलोड केल्यानंतर चलनावर नमूद असलेली रक्कम विहित मुदतीत त्यांच्या त्याच बँकेच्या खात्यामधून एनईएफटी/ आरटीजीएस द्वारे चलनावरील नमूद बँक अकाऊंट नंबर व आयएफएससी कोड UTIBOCCH 274 प्रमाणे मंडळाकडे वर्ग करावयाची आहे.
माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी एनईएफटी/ आरटीजीएस केलेली रक्कम त्यांच्या खात्यातून वजा झाली आहे किंवा नाही तसेच अकाऊटं नंबर व आयएफएससी कोड चुकीचा नमूद केला गेल्यास ही रक्कम परत त्यांच्या खात्यात जमा झाली किंवा नाही याची खातरजमा संबंधित मुख्याध्यापक/ प्राचार्य यांनी करावी.
माध्यमकि शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांचे शुल्क मंडळाकडे जमा झाल्याशिवाय त्यावरील पुढील प्रक्रिया होणार नाही  असे  सचिव,  राज्य मंडळ, पुणे यांनी कळविले आहे.
00000

शनिवार, १५ जून, २०१९

गृहनिर्माण संस्थांवर प्रशासकांच्या नेमणूकीसाठी अर्ज आमंत्रित


गृहनिर्माण संस्थांवर प्रशासकांच्या नेमणूकीसाठी अर्ज आमंत्रित

अमरावती,दि. 15: गृहनिर्माण संस्थांवर प्राधिकृत अधिकारी (प्रशासक) यांचे पॅनल तयार करण्यासाठी सहकार विभागाव्दारे पात्र उमेदवारांनाकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सदर पदासाठी उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवीधर आणि सहकार व लेखा पदविका (जी.डी.सी.ॲड.ए)/उच्चतम सहकार पदविका (एच.डी.सी.) धारक असावा. तसेच चार्टर्ड अकाऊटंट (सि.ए)/इन्सिटटयुट ऑफ कॉस्ट अँड वर्कस अकाऊटंट (आय.सी.डल्ब्य.ए), कंपनी सेक्रेटरी (सी.ए), सहकार खात्यातील प्रशासक किंवा लेखापरीक्षण विभागातील सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी, नागरी/कर्मचारी सहकारी बँकांमध्ये व्यवस्थापक म्हणून काम केलेले उमेदवार सुध्दा प्रशासक पदासाठी पात्र आहे. 
अर्जाचे विहीत नमुने विभागीय सहनिबंधक सहकारी संसथा, अमरावती विभाग अमरावती येथे उपलब्ध असून कार्यालयाचा पत्ता सहकार संकुल कांता नगर, जुना बापपास रोड महसुल भवन कार्यालया समोर अमरावती (कार्या. दुरध्वनी क्र. 0721-2663246) असा आहे. तसेच जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था/उप-सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था तालुका कार्यालयात सुध्दा उपलब्ध आहे. अर्ज प्राप्त करण्याची व परीपूर्ण अर्ज स्वीकारण्याची अंतीम मुदत दि. 30 जून आहे. वरीलप्रमाणे जाहिरातीची जाहिर सुचना उपरोक्त नमुद कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात आली आहे. इच्छुकांनी आपले परीपूर्ण भरलेले अर्ज नमूद कार्यालयात सादर करावे, असे विभागीय सहनिबंधक(सहकारी संस्था) राजेंद्र दाभेराव यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
00000


शुक्रवार, १४ जून, २०१९

गृहनिर्माण संस्थांवर प्रशासकांची नेमणूकीसाठी अर्ज आमंत्रित


गृहनिर्माण संस्थांवर प्रशासकांची नेमणूकीसाठी अर्ज आमंत्रित

अमरावती,दि. 14: विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था अमरावती विभाग अमरावती यांचे कडुन कळविण्यात येते की, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 77अ/78/78अ अन्वये गृहनिर्माण संस्थांवर नेमण्यात येणाऱ्या प्राधिकृत अधिकारी (प्रशासक) यांचे पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी व सहकार व लेखा पदविका (जी.डी.सी.ॲड.ए)/उच्चतम सहकार पदविका (एच.डी.सी.) धारक, चार्टर्ड अकाऊटंट (सि.ए)/इन्सिटटयुट ऑफ कॉस्ट अँड वर्कस अकाऊटंट (आय.सी.डल्ब्य.ए)/कंपनी सेक्रेटरी (सी.ए), सहकार खात्यातील प्रशासक/लेखापरीक्षण विभागातील सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी, नागरी/कर्मचारी सहकारी बँकांमध्ये व्यवस्थापक यांचेकडुन मागविण्यात येत आहे.
अर्जाचे विहीत नमुने विभागीय सहनिबंधक सहकारी संसथा, अमरावती विभाग अमरावती, पत्ता सहकार संकुल कांता नगर, जुना बापपास रोड महसुल भवन कार्यालया समोर अमरावती (कार्या. दुरध्वनी क्र. 0721-2663246) तसेच जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था/उप-सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था तालुका कार्यालयात दि. 15 जून, 2019 ते दि. 30 जून,, 2019 या कालावधीत वेळेत मिळु शकतील, याबाबतची जाहिर सुचना उपरोक्त नमुद कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात आलेली आहे, असे विभागीय सहनिबंधक, राजेंद्र दाभेराव, सहकारी संस्था, अमरावती यांनी कळविले आहे.
00000

इयत्ता दहावीच्या पुनर्परिक्षार्थींना ऑनलाईन आवेदनपत्र सादर करावयाच्या तारखा जाहीर


इयत्ता दहावीच्या पुनर्परिक्षार्थींना
ऑनलाईन आवेदनपत्र सादर करावयाच्या तारखा जाहीर
Ø  जुलै-ऑगस्ट मध्ये परीक्षा
Ø  www.mahahsscboard.maharashtra.gov.in संकेतस्थळ उपलब्ध
        अमरावती, दि. 14 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेस नियमित, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजने अंतर्गत व तुरळक विषय घेवून प्रविष्ट होणा-या विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्ट, 2019 मध्ये परीक्षा आयोजीत करण्यात आली आहे. त्यासाठी या परीक्षेस प्रविष्ठ होऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे आवेदनपत्र ऑनलाईन पध्दतीने www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भरावयाची असून त्याच्या तारखा पुढीलप्रमाणे आहे.
            माध्यमिक शाळांनी ऑनलाईन आवेदनपत्रे नियमीत शुल्कासह शुक्रवार दि. 14 जून ते सोमवार दि. 24 जून, 2019 आणि विलंब शुल्कासह मंगळवार दि. 25 जून ते गुरुवार दि. 27 जून, 2019 सादर करणे अनिवार्य आहे. माध्यमिक शाळांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाच्या तारखा दि. 28 जून ते 1 जुलै, 2019 अशा असून माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या दि. 2 जुलै पर्यंत जमा करने बंधनकारक आहे.   
सदर परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे त्यांच्या माध्यमिक शाळांमार्फत भरावी. सर्व माध्यमिक शाळातील मुख्याध्यापकांनी ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी पुढीलप्रमाणे बाबी लक्षात घ्याव्यात.
श्रेणीसुधार करुन इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्ट 2019 व मार्च 2020 अशा लगतच्या दोनच संधी उपलब्ध राहतील याची नोंद घ्यावी. ऑनलाईन आवेदनपत्र भरतांना मार्च 2019 परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची या परीक्षेतील माहिती आवेदनपत्रात ऑनलाईन घेता येईल. नियमित शुल्कासह तसेच विलंब शुल्कासह आवेदनपत्रे सादर केलेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क दोन स्वतंत्र चलनाद्वारे भरण्यात यावे. आवेदनपत्रे नियमित शुल्काने भरावयाच्या तारखामध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही. परिक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असलयाने विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे त्यांच्या शाळांमार्फत भरावी, असे राज्यमंडळ, पुणे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी प्रकटनाव्दारे कळविले आहे.
0000000



इयत्ता दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षाचे वेळापत्रक जाहीर


इयत्ता दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षाचे वेळापत्रक जाहीर
Ø  अधिक माहितीसाठी www.mahahsscboard.maharashtra.gov.in संकेतस्थळ
        अमरावती, दि. 14 : शैक्षणिक सत्र जुलै- ऑगस्ट 2018 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) पुरवणी परीक्षा जुलै महिन्यात घेण्यात येणार आहे.  त्यानुसार लेखी परीक्षांच्या तारखा पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात येत आहे.
            माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) ची लेखी परीक्षा बुधवार दि. 17 जुलै ते मंगळवार दि. 30 जुलै, 2019 या कालावधीमध्ये असणार. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) सर्वसाधारण व द्विलक्षी विषयासाठीच्या परीक्षेचा बुधवार दि. 17 जुलै ते शनिवार दि. 3 ऑगस्ट 2019 पर्यंत असा कालावधी असून उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) व्यवसाय अभ्यासक्रमाकरीता परीक्षा बुधवार दि. 17 जुलै ते बुधवार दि. 31 जुलै, 2019 या कालावधीमध्ये होणार आहे. इयत्ता 10 वी व 12 वीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी व  तोंडी परीक्षा दि. 9 जुलै ते दि. 16 जुलै 2019 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात येणार आहेत.
            या कालावधीमध्ये आयोजित केलेले दिनांकनिहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.maharashtra.gov.in संकेतस्थळावर दिनांक 12 जुन, 2019 पासून उपलब्ध करुण देण्यात आले आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांचेकडे विभागीय मंडळामार्फत छापील स्वरुपात दिलेले वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरुनच परीक्षेच्या तारखांची खात्री करुन घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ठ व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉटॲप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरु नये असे राज्यमंडळ, पुण्याचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी एका प्रकटनाव्दारे कळविले आहे.
0000000






गुरुवार, १३ जून, २०१९

महाडीबीटी पोर्टल सुरु, विद्यार्थ्यांनी 25 जूनपर्यंत अर्ज सादर करावे


महाडीबीटी पोर्टल सुरु
विद्यार्थ्यांनी 25 जूनपर्यंत अर्ज सादर करावे

अमरावती,दि. 13: विद्यार्थ्यांना सन 2018-19 मध्ये शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्या करण्यासाठी शासनाने महाडीबीटी पोर्टल सुरु केले आहे. सन 2018-19 या शैक्षणिक वर्षातील महाडीबीटी पोर्टलवरील अनु. जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी दि. 11 जून, 2019 रोजी पुनश्च कार्यन्वीत झालेली असुन दि. 30 जून, 2019 पर्यंत महाडीबीटी पोर्टल सुरु राहील. या कालावधीत महाविद्यालयांनी 1st installment ची scrutiny करणे, विद्यार्थ्यांनी रद्द केलेले अर्ज भरणे व ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेलेच नाही अशा सर्वांकरिता लॉगीन सुरु आहे तसेच 30 जून, 2019 नंतर आपल्या लॉगीनमधुन अर्ज आयुक्तालयस्तरावरुन ऑटोडिलीट करण्यात येईल.
दि. 25 जून, 2019 पर्यंत ऑनलाईन अर्ज सहाय्यक आयुक्तांकडे फॉरवर्ड करावे व शिष्यवृत्तीपासुन विद्यार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता महाविद्यालयाने घ्यावी व याबाबतची सूचना महाविद्यालयाच्या सुचना फलकावर लावावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समजाकल्याण, अमरावती यांनी केले आहे.
00000


सोमवार, १० जून, २०१९

सन 2019 33 कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी


सन 2019
33 कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी
                30 जून पर्यंत स्थळाची ऑनलाईन नोंदणी करावी
Ø  वनविभागाचे पोर्टल कार्यान्वित
अमरावती,दि. 10 :  50 कोटी वृक्ष लागवड हा महाराष्ट्र सरकारचा अतिशय महत्वाकांक्षी असा कार्यक्रम आहे. सन 2019 मध्ये 33 कोटी वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टांअंतर्गत अमरावती जिल्ह्यास 111.68 लक्ष एवढे वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. लागवडीचा हा कार्यक्रम 1 जुलै 2019 ते 30 सप्टेंबर 2019 या तिन महिन्याच्या कालावधीत निर्धारित करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने वनविभाग, सामाजिक वनिकरण, मेळघाट व्याघ्र प्रकल्प व जिल्ह्यातील इतर सर्व शासकीय यंत्रणांना उदिष्याचे वाटप करण्यात आले आहे.
ज्या जागेवर वृक्ष लागवड करावयाची आहे त्या स्थळाची नोंद वनविभागाचे पोर्टल www.mahaforest.gov.in यावर करणे अनिवार्य आहे. त्याच प्रमाणे लावावयाच्या रोपांची आकडेवारी सुध्दा वनविभागाचे पोर्टलवर ऑनलाईन करावयाची आहे. वनविभागाचे पोर्टवर स्थळाची नोंदणी व खड्डयांची नोंदणी ऑनलाईन करण्याची मुदत 30 जून 2019 आहे. त्यांनतर हा पर्याय उपलब्ध राहणार नाही. जर स्थळांची माहिती ऑनलाईन केली गेली नाही अशा यंत्रणांना रोपांचा पुरवठा करण्यात येणार नाही. तेव्हा जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, सर्व शासकीय, निमशासकीय, अर्धशासकीय, खाजगी व्यक्ती, विद्यालये, महाविद्यालये, सामाजिक संघटना, अशासकीय संघटना, जिल्ह्यातील निरनिराळया संघटना, बांधकाम संघटना, औद्यागिक संघटना, वैद्यकिय संघटना व इतर संघटना तसेच खाजगी व्यक्ती व शेतकरी यांनी तात्काळ वनविभागाच्या पोर्टलवर ऑनलाईन स्थळाची माहिती अपलोड करावी व आपली रोपे मागणीची संख्या नोंदवावी, असे गजेंद्र नरवणे, उपसंचालक अमरावती वनविभाग, तथा सदस्य सचिव, जिल्हा नियोजन व समन्वयक समिती यांनी कळविले आहे.
*****


शुक्रवार, ७ जून, २०१९

प्रधानमंत्री पिक विमा योजना


प्रधानमंत्री पिक विमा योजना
मृग बहारासाठी पुनर्रचित हवामानवर आधारित फळपिक विमा योजना
अधिकाधिक शेतकऱ्यांनी योजनेत
सहभागी होण्याचे कृषी विभागाव्दारे आवाहन

अमरावती, दि. 7 : अमरावती विभागांतर्गत येणाऱ्या बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती व यवतमाळ या जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक योजना अंतर्गत पुनर्रचित हवामानवार आधारित विमा योजना सन 2019 या वर्षाकरीता मृग बहारातील अधिसुचित फळपिकांना लागु करण्यात आली आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होऊन फळपिक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागाव्दारे करण्यात आले आहे.
योजनेचा उद्देश :
नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकुल परिस्थतीमुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे. पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे. शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे. कृषी क्षेत्रासाठीच्या पत पुरवठ्यात सातत्य राखणे, जेणेकरुन उत्पादनातील जोखमींपासून शेतकऱ्यांच्या संरक्षणाबरोबरच अन्नसुरक्षा, पिकांचे विविधीकरण आणि कृषि क्षेत्राचा गतिमान विकास व स्पर्धात्पकतेत वाढ हे हेतु साध्य करणे आदी या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.
मृग बहारामध्ये समाविष्ट पिके :
संत्रा फळपिक - वाशिम, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ या जिल्ह्यासाठी, मोसंबी- बुलडाणा, अमरावती, डाळींब- बुलडाणा, अमरावती, वाशिम, लिंबु- बुलडाणा, वाशिम, अकोला जिल्ह्यासाठी अशाप्रकारे मृग बहारामध्ये जिल्हानिहाय फळपिके समाविष्ठ करण्यात आली आहे.
विमा संरक्षित रक्कम व शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विमा हप्ता :
पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजने अंतर्गत राज्यात सन 2018 साठी सर्वसाधारणपणे राज्यस्तरीय पिककर्ज दर समितीने निश्चीत केलेल्या पीककर्ज दराप्रमाणे पिकनिहाय विमा संरक्षित रक्कम निश्चित करण्यात आली आहे. या योजनेंअतर्गत विमा हप्ता दर हा वास्तवदर्शी दराने आकारला जाणार आहे. तथापि शेतकऱ्यांना फळपिक निहाय प्रति हेक्टरी विमा संरक्षित रक्कमेच्या 5 टक्के किंवा वास्तवदर्शी दर यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम विमा हप्ता म्हणुन शेतकऱ्यांना भरावी लागेल.
यवतमाळ, अमरावती व वाशिम या जिल्ह्यासाठी बजाज अलायन्झ इन्शुरन्स कंपनी लि. पुणे- 400013 (टोल फ्री क्र- 18002095959), तर अकोला व बुलडाणा जिल्ह्यासाठी एचडीएफसी एगों जनरल इन्शुरंस लि. पुणे 411001 (टोल फ्री क्र- 18002660700) या विमा कपंनींना नियुक्त करण्यात आले आहे.
योजनेचे वैशिष्ट्ये :
सदर योजना ही या आदेशान्वये अधिसुचित केलेल्या क्षेत्रातील फळपिकासाठी असेल. या पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना कर्जदार शेतकऱ्यांना अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित फळपिकांसाठी बंधनकारक असुन बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित फळपिकासाठी खातेदारांचे व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपटीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. या योजनेअंतर्गत वास्तवदर्शी दराने विमा हप्ता आकारण्यात येणार असुन शेतकऱ्यांवरील विमा हप्त्याचा भार कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता 5 टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला आहे.
जोखमीच्या बाबी -
योजनेत समाविष्ट अधिसुचित फळपिके, विमा संरक्षण प्रकार (हवामान धोके), विमा संरक्षण कालावधी, विमा संरक्षित रक्कम, प्रमाणके (ट्रिगर) व नुकसान भरपाई रक्कम सहपत्र-2 मध्ये नमुद केल्याप्रमाणे राहील. मृग बहार 2019 साठी अधिसुचित फळपिके, समाविष्ट हवामान धोके व विमा संरक्षण कालावधी खालील प्रमाणे निर्धारीत करण्यात आलेला असुन सदरचे निर्धारीत केलेले हवामान धोके लागु झाल्यानंतर संबंधित विमा धारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देय होईल.
प्रस्ताव सादर करण्याची मुदत -
कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी बँकेकडे विमा हप्त्यासह प्रस्ताव सादर करण्याबाबत पुढीलप्रमाणे तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.  शेतकऱ्यांनी (कर्जदार व बिगर कर्जदार) योजनेतील सहभागाचा अर्ज सादर करणे, विमा हप्ताची रक्कम कर्जदार किंवा बिगर कर्जदार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामधुन प्राथमिक सहकारी संस्था/बँक/आपले सरकार सेवा केंद्र/विमा प्रतिनिधी यांनी कपात करणे/शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक संत्रा व लिंबु फळपिकासाठी 14 जुन, मोसंबीसाठी 1 जुलै, तर डांळिब फळासाठी 15 जुलै आहे.  
शेतकऱ्यांनी  (कर्जदार व बिगर कर्जदार) विमा हप्त्याची रक्कम इलेक्ट्रॉनिक पध्दतीने संबंधीत विमा कंपनीस हस्तांतरीत करणे व एकत्रीत विमा घोषणापत्रे (डिक्लरेशन) आणि विमा प्रस्ताव व्यापारी बँक/ग्रामीण बँक/जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेकडून संबंधीत विमा कंपनीस सादर करण्याचा व पिकविमा योजनेच्या संकेतस्ळावर योजनेत सहभागी झालेल्या प्रत्येक शेतकऱ्यांची माहीती नोदविण्याचा दिनांक मोसंबी फळपिकासाठी दि. 16 जुलै, संत्रा व लिंबु फळासाठी दि. 29 जुन तर डाळिंब फळपिकासाठी दि. 31 जुलै आहे. (योजनेतील शेतकरी सहभागाच्या अंतिम दिनांकानंतर 15 दिवसांच्या आत सहभागी व्हावे.)
विमाक्षेत्र घटक:
अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत अधिसुचित फळपिकांखाली एकुण 20 हेक्टर व त्यापेक्षा जास्त क्षेत्र असणाऱ्या महसुल मंडळात योजना राबविण्यात येत आहे. संबंधित जिल्हा अधिक्षक कृषि अधिकाऱ्यांकडुन प्राप्त झालेल्या माहितीनुसार शासन निर्णयामध्ये अशी महसुल मंडळे समाविष्ट करण्यात आली आहेत.
यावर्षीच्या प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना राज्यात सन 2019 मध्ये मृग बहाराकरीता अधिसुचित फळपिकांना लागु करण्याकरीता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होऊन फळपिक विमा योजनेचा लाभ घ्यावा. यासंबंधीच्या अधिक माहितीकरीता जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागाचे विभागीय कृषि सहसंचालक सुभाष नागरे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
000000


तंत्रशिक्षण पदविका प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन मेळावा


तंत्रशिक्षण पदविका प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन मेळावा
अमरावती, दि. 7 : अमरावती जिल्ह्यातील माध्यमिक शाळेतून दहावी (एस.एस.सी.) उत्तीर्ण झाल्यानंतर शासकीय तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वर्ष 2019-2020 च्या सत्राच्या प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता यावे, यासाठी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांचा मेळावा नुकताच 4 जून रोजी शासकीय तंत्रनिकेतन, अमरावती येथे सपन्न झाला.
या मेळाव्यात शिक्षणाधिकारी सौ. निलिमा टाके, तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. डी. व्ही. जाधव, शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य पी. एम. भंसाली, गटशिक्षणाधिकारी गणेश बोपटे, मुख्याध्यापक महासंघाचे उपाध्यक्ष श्री. खंडागळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांचे समुपदेशन व मार्गदर्शन देण्यासाठी नागपूर अमरावती सहसंचालक तंत्र शिक्षण संचालनालय व शासकीय तंत्रनिकेतन यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. रोजगाराच्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी तंत्रशिक्षणाची कास धरणे अत्यंत आवश्यक असल्याचे अधिव्याख्याता हेमंत जोशी यांनी आपल्या प्रास्ताविकातून सांगितले. पदविका प्रवेश प्रक्रियेविषयी त्यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली. प्राचार्य डॉ. मोगरे यांनी तंत्र शिक्षणाकरीता लागणारा खर्च हा अत्यल्प असून तंत्रशिक्षण प्राप्त पदविकाधारकांसाठी नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध असल्याचे आपल्या भाषणात सांगितले.
सहसंचालक डॉ. जाधव म्हणाले की, शासनाच्या विविध योजनाद्वारे विद्यार्थ्यांना पदविका शिक्षण पूर्ण करता येऊ शकते. उद्याच्या भारत निर्मितीसाठी तंत्रशिक्षणाकडे विद्यार्थी वळावे, यासाठी शाळांच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले पाहिजे. मेळाव्यात जमलेल्या सर्व मुख्याध्यापकांना तंत्रशिक्षण घेण्याकरीता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व समुपदेशन करण्याचे शिक्षणाधिकारी श्रीमती टाके यांनी सुचविले. मेळाव्यास माध्यमिक शाळेचे 182 मुख्याध्यापक, निवासी आश्रमशाळेचे 19 मुख्याध्यापक असे एकूण 201 मुख्याध्यापक उपस्थित होते.
मुख्याध्यापकांनी विचारलेल्या शकांचे निरसन प्राचार्य मोगरे यांनी केले. आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या शाळेतच तंत्रनिकेतनच्या प्रवेशासाठी नोंदणी (रजिस्ट्रेशन) आदी आवश्यक सुविधा पुरविण्यात येईल. त्याचप्रमाणे शासकीय तंत्रनिकेतनमध्ये विनामुल्य सुविधा केंद्र उपलब्ध करुन देण्यात आले आहे त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
मेळाव्यास अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. कार्यक्रमामध्ये शासकीय तंत्रनिकेतन अमरावतीबाबत माहिती उत्तरवार यांनी दिली. अमरावती विभागातील शासकीय तंत्रनिकेतन अचलपूरचे ठळक वैशिष्टये प्राचार्य पी. एस. भंसाली आणि शासकीय तंत्रनिकेतन मूर्तिजापूरचे ठळक वैशिष्ट्ये चतुर मॅडम यांनी सांगितले. सागर पासेबंद यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. सुधीर बाजड, उपप्राचार्य तसेच निकोसे, गावंडे, प्रान्जले, परघने आदीं शिक्षकवृंदानी व कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.
00000