इयत्या 12 वी
ऑनलाईन आवेदनपत्रे 24 जून पर्यंत सादर करावे
अमरावती,दि. 21:
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक
शिक्षण मंडळामार्फत नियमित, पुनर्परिक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले
खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजने अंतर्गत व तुरळक विषय घेवून प्रविष्ट होणाऱ्या
विद्यार्थ्यासाठी इ. 12 वी ची परीक्षा जुलै-ऑगस्ट 2019 मध्ये आयोजित करण्यात आलेली
आहे. त्यासाठी परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षेची आवेदनपत्र
ऑनलाईन पध्दतीने www.mahahsscboard.maharashtra.gov.in किंवा www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरावयाची आहे. आवेदनपत्र विलंब शुल्काने भरण्याची मुदत दिनांक
24 जून 2019 पर्यंत असून नियमित व विलंब शुल्कासह भरलेल्या आवेदनपत्रांचे शुल्क चलनाद्वारे
भरण्याचा कालावधी दिनांक 24 ते 29 जून 2019 असा राहिल. असे डॉ. अशोक भोसले, सचिव, राज्यमंडळ पुणे यांनी कळविले
आहे.
***
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा