सोमवार, १० जून, २०१९

सन 2019 33 कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी


सन 2019
33 कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी
                30 जून पर्यंत स्थळाची ऑनलाईन नोंदणी करावी
Ø  वनविभागाचे पोर्टल कार्यान्वित
अमरावती,दि. 10 :  50 कोटी वृक्ष लागवड हा महाराष्ट्र सरकारचा अतिशय महत्वाकांक्षी असा कार्यक्रम आहे. सन 2019 मध्ये 33 कोटी वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टांअंतर्गत अमरावती जिल्ह्यास 111.68 लक्ष एवढे वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. लागवडीचा हा कार्यक्रम 1 जुलै 2019 ते 30 सप्टेंबर 2019 या तिन महिन्याच्या कालावधीत निर्धारित करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने वनविभाग, सामाजिक वनिकरण, मेळघाट व्याघ्र प्रकल्प व जिल्ह्यातील इतर सर्व शासकीय यंत्रणांना उदिष्याचे वाटप करण्यात आले आहे.
ज्या जागेवर वृक्ष लागवड करावयाची आहे त्या स्थळाची नोंद वनविभागाचे पोर्टल www.mahaforest.gov.in यावर करणे अनिवार्य आहे. त्याच प्रमाणे लावावयाच्या रोपांची आकडेवारी सुध्दा वनविभागाचे पोर्टलवर ऑनलाईन करावयाची आहे. वनविभागाचे पोर्टवर स्थळाची नोंदणी व खड्डयांची नोंदणी ऑनलाईन करण्याची मुदत 30 जून 2019 आहे. त्यांनतर हा पर्याय उपलब्ध राहणार नाही. जर स्थळांची माहिती ऑनलाईन केली गेली नाही अशा यंत्रणांना रोपांचा पुरवठा करण्यात येणार नाही. तेव्हा जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, सर्व शासकीय, निमशासकीय, अर्धशासकीय, खाजगी व्यक्ती, विद्यालये, महाविद्यालये, सामाजिक संघटना, अशासकीय संघटना, जिल्ह्यातील निरनिराळया संघटना, बांधकाम संघटना, औद्यागिक संघटना, वैद्यकिय संघटना व इतर संघटना तसेच खाजगी व्यक्ती व शेतकरी यांनी तात्काळ वनविभागाच्या पोर्टलवर ऑनलाईन स्थळाची माहिती अपलोड करावी व आपली रोपे मागणीची संख्या नोंदवावी, असे गजेंद्र नरवणे, उपसंचालक अमरावती वनविभाग, तथा सदस्य सचिव, जिल्हा नियोजन व समन्वयक समिती यांनी कळविले आहे.
*****


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा