बुधवार, २६ जून, २०१९

कुष्ठरोग्यांचे आर्थिक व सामाजिक पुनवर्सन


कुष्ठरोग्यांचे आर्थिक व सामाजिक पुनवर्सन

Ø  इयत्ता 10 वी 12 वी च्या  गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

अमरावती,दि. 26:  कुष्ठरोग या सामाजिक समस्येबाबत लोकांच्या मनात असलेली भिती, गैरसमज, अंधश्रध्दा (Social Stigma) दुर करण्याकरिता कुष्ठरोगग्रस्त व्यक्ती व त्यांच्या कुटूंबातील सदस्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचे समाजात पूर्विप्रमाणे स्थान मिळवून देण्यासाठी शासकीय सामाजिक पुनर्वसन (Social Rehabilitation)  हा नाविण्यपूर्ण व स्तृत्य उपक्रम राबविण्यात येतो.
राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या 150 व्या जयंतीनिमीत्त संपूर्ण देशात कुष्ठरोग निवारणार्थ विविध जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येतात.  अमरावतीच्या सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) यांचेकडून मागील पाच वर्षापासून जिल्ह्यातील कुष्ठरोगाचे प्रमाण व प्रसार कमी करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. समाजातील लोकांच्या मनात कुष्ठरोगाविषयी असलेले गैरसमज, अंधश्रध्दा व भिती दुर व्हावी व  कुष्ठरुगणांना  तात्काळ नि:शुल्क व नियमित औषधोपचार मिळावा त्यांचा विकृतीपासून बचाव करणे ही उपक्रमांची  मुख्य उद्दिष्टये आहेत. या विविध उपक्रमांसोबतच एक आगळा वेगळा व नावण्यिपूर्ण उपक्रम  21 जून रोजी  आरोग्य विभागाचे  सहा.संचालक (कुष्ठरोग) रुग्णालय,  येथे घेण्यात आला.
संपूर्ण अमरावती जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील कुष्ठरोगग्रस्त कुटूंबातील जे विद्यार्थी नुकत्याच झालेल्या इयत्ता 10 वी व 12 वी  परीक्षेमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेत, त्यांचा सत्कार या समारंभात करण्यात आला. या सोबतच कुष्ठरोगग्रस्त विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाकरीता कॉलेज बॅग, रजिस्टर व पेनाचे वाटप करण्यात आले. 32 विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उपस्थिती नोंदवली. तसेच या प्रसंगी दोन आर्थिकदुष्ट्या दुर्बल कुष्ठरुग्णांना शिलाई मशिन व आर्थिक मदत देण्यात आली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन जि.प.चे आरोग्य समिती, सभापती बळवंतराव वानखडे यांनी केले. कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी  जिल्हा शल्क चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम हे उपस्थित होते. तसेच विशेष अतिथी म्हणून आयुक्त म.न.पा अमरावती संजय निपाने, पाचार्य व्यवसायीक प्रशिक्षण केंद्र (व्हीटीसी) नाशिक, शैला फर्नांडीस, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. निकोसे व प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, एड्स नियंत्रण कार्यक्रम अमरावती अजय साखरे, जिल्हा लेखा व्यवस्थापक अशोक कोठारी उपस्थित होते.
कंत्राटी कुष्ठरोग कर्मचाऱ्याच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरावरुन अभिनंदन होत असून कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) अमरावती या कार्यालयाच्या संपूर्ण चमुने परिश्रम घेतले.

*****

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा