10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांनी
परीक्षा शुल्क ॲक्सीस बँकेत जमा करावे
अमरावती,दि.
18: अमरावती मंडळातील सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांनी इयत्या
10 वी व इयत्या 12 वी जुलै-ऑगस्ट 2019 करिता आपल्या माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील
विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाइन पध्दतीने सादर केल्यानंतर त्या माध्यमिक शाळा व
कनिष्ठ महाद्यिालयाचे परीक्षा शुल्काचे बँक ऑफ इंडियाचे चलन ऑनलाईन तयार होणार असून
ते डाऊनलोड करुन घ्यावयाचे आहे. परीक्षा शुल्क प्रचलित पध्दतीने बँक ऑफ इंडिया मध्ये
भरणा न करता ते ॲक्सीस बँकेत सुधारीत कार्यपध्दतीने भरणा करावयाचा आहे.
सर्व कनिष्ठ महाविद्यालयांनी
त्यांच्याकडे विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्कापोटी जमा होणारी रक्कम माध्यमिक शाळा
व कनिष्ठ महाविद्यालयांच्या बँक खात्यामध्ये जमा करावी आणि ऑनलाईन चलन डाऊनलोड केल्यानंतर
चलनावर नमूद असलेली रक्कम विहित मुदतीत त्यांच्या त्याच बँकेच्या खात्यामधून एनईएफटी/
आरटीजीएस द्वारे चलनावरील नमूद बँक अकाऊंट नंबर व आयएफएससी कोड UTIBOCCH 274 प्रमाणे
मंडळाकडे वर्ग करावयाची आहे.
माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी
एनईएफटी/ आरटीजीएस केलेली रक्कम त्यांच्या खात्यातून वजा झाली आहे किंवा नाही तसेच
अकाऊटं नंबर व आयएफएससी कोड चुकीचा नमूद केला गेल्यास ही रक्कम परत त्यांच्या खात्यात
जमा झाली किंवा नाही याची खातरजमा संबंधित मुख्याध्यापक/ प्राचार्य यांनी करावी.
माध्यमकि शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांचे
शुल्क मंडळाकडे जमा झाल्याशिवाय त्यावरील पुढील प्रक्रिया होणार नाही असे सचिव,
राज्य मंडळ, पुणे यांनी कळविले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा