शुक्रवार, १४ जून, २०१९

इयत्ता दहावीच्या पुनर्परिक्षार्थींना ऑनलाईन आवेदनपत्र सादर करावयाच्या तारखा जाहीर


इयत्ता दहावीच्या पुनर्परिक्षार्थींना
ऑनलाईन आवेदनपत्र सादर करावयाच्या तारखा जाहीर
Ø  जुलै-ऑगस्ट मध्ये परीक्षा
Ø  www.mahahsscboard.maharashtra.gov.in संकेतस्थळ उपलब्ध
        अमरावती, दि. 14 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेस नियमित, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजने अंतर्गत व तुरळक विषय घेवून प्रविष्ट होणा-या विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्ट, 2019 मध्ये परीक्षा आयोजीत करण्यात आली आहे. त्यासाठी या परीक्षेस प्रविष्ठ होऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे आवेदनपत्र ऑनलाईन पध्दतीने www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भरावयाची असून त्याच्या तारखा पुढीलप्रमाणे आहे.
            माध्यमिक शाळांनी ऑनलाईन आवेदनपत्रे नियमीत शुल्कासह शुक्रवार दि. 14 जून ते सोमवार दि. 24 जून, 2019 आणि विलंब शुल्कासह मंगळवार दि. 25 जून ते गुरुवार दि. 27 जून, 2019 सादर करणे अनिवार्य आहे. माध्यमिक शाळांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाच्या तारखा दि. 28 जून ते 1 जुलै, 2019 अशा असून माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या दि. 2 जुलै पर्यंत जमा करने बंधनकारक आहे.   
सदर परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे त्यांच्या माध्यमिक शाळांमार्फत भरावी. सर्व माध्यमिक शाळातील मुख्याध्यापकांनी ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी पुढीलप्रमाणे बाबी लक्षात घ्याव्यात.
श्रेणीसुधार करुन इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्ट 2019 व मार्च 2020 अशा लगतच्या दोनच संधी उपलब्ध राहतील याची नोंद घ्यावी. ऑनलाईन आवेदनपत्र भरतांना मार्च 2019 परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची या परीक्षेतील माहिती आवेदनपत्रात ऑनलाईन घेता येईल. नियमित शुल्कासह तसेच विलंब शुल्कासह आवेदनपत्रे सादर केलेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क दोन स्वतंत्र चलनाद्वारे भरण्यात यावे. आवेदनपत्रे नियमित शुल्काने भरावयाच्या तारखामध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही. परिक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असलयाने विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे त्यांच्या शाळांमार्फत भरावी, असे राज्यमंडळ, पुणे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी प्रकटनाव्दारे कळविले आहे.
0000000



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा