शेतकऱ्यांना अनुदानावर शेती अवजारे वाटप
जून अखेर अर्ज आमंत्रित
अमरावती,दि. 21:
‘ उन्नत शेती, समृध्द शेतकरी’ मोहिमेअंतर्गत
सन 2019-20 या वर्षांत विभागातील सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदानावर शेतीउपयोगी
अवजारे उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी 25 ते
30 जून या कालावधीत कृषि विभागाकडे अर्ज सादर करावे.
ट्रॅक्टर, लहान ट्रॅक्टर, पॉवर
टिलर, पेरणी यंत्र, बी.बी.एफ. प्लॉटर, स्वयंमचलित रिपर कम, बाईडर, रिपर, कल्टीव्हेटर,
पल्टी नांगर, सर्वप्रकारचे मळणी यंत्र, मिनी दाल मिल इ. अनुदान प्राप्त अवजारे असून
या वर्षात ट्रॅक्टर व ट्रॅक्टर, चलीत अवजारे
करिता शेतकऱ्यांना अर्ज करता येईल तसेच पेरणी यंत्र व बी.बी.एफ. प्लॉन्ट करिता प्राधान्याने
अर्ज करुन लगेच खरेदी करता येईल. प्रत्येक अर्जासोबत त्यांचेकडे किंवा कुटूंबातील अन्य
सदस्याचा नावे ट्रॅक्टर असल्यास अर्ज करता येईल. अवजारासाठी शेतकऱ्यांने स्वतंत्र अर्ज
करावा. ज्या अवजारास जास्तीत जास्त अनुदान देय आहे. त्या एकच यंत्र किंवा अवजारास अनुदान
दिल्या जाईल. लाभार्थिची निवड करतांना ज्येष्ठतेनूसार तालुकास्तरावरच सोडत निश्चित
करण्यात येईल. शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज कृषि विभागाचे कृषि सहाय्यक, कृषि
पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी कार्यालयात मुदतीच्या आत सादर
करावे. अर्जाचा नमुना तालुका कृषि अधिकारी तथा कृषि विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध
आहे. अनुदानाची रक्कम लाभार्थ्याच्या आधार लिंक असलेल्या बॅक खात्यात थेट जमा केली
जाईल. अधिक माहितीसाठी कृषि कार्यालयाशी संपर्क करावा असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक
अमरावती, विभाग अमरावती सुभाष नागरे यांनी
कळविले आहे.
****
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा