गृहनिर्माण
संस्थांवर प्रशासकांच्या नेमणूकीसाठी अर्ज आमंत्रित
अमरावती,दि.
15: गृहनिर्माण संस्थांवर प्राधिकृत अधिकारी (प्रशासक) यांचे पॅनल तयार करण्यासाठी
सहकार विभागाव्दारे पात्र उमेदवारांनाकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सदर पदासाठी उमेदवार
हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवीधर आणि सहकार व लेखा पदविका (जी.डी.सी.ॲड.ए)/उच्चतम
सहकार पदविका (एच.डी.सी.) धारक असावा. तसेच चार्टर्ड अकाऊटंट (सि.ए)/इन्सिटटयुट ऑफ
कॉस्ट अँड वर्कस अकाऊटंट (आय.सी.डल्ब्य.ए), कंपनी सेक्रेटरी (सी.ए), सहकार खात्यातील
प्रशासक किंवा लेखापरीक्षण विभागातील सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी, नागरी/कर्मचारी
सहकारी बँकांमध्ये व्यवस्थापक म्हणून काम केलेले उमेदवार सुध्दा प्रशासक पदासाठी पात्र
आहे.
अर्जाचे विहीत नमुने विभागीय
सहनिबंधक सहकारी संसथा, अमरावती विभाग अमरावती येथे उपलब्ध असून कार्यालयाचा पत्ता
सहकार संकुल कांता नगर, जुना बापपास रोड महसुल भवन कार्यालया समोर अमरावती (कार्या.
दुरध्वनी क्र. 0721-2663246) असा आहे. तसेच जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था/उप-सहाय्यक
निबंधक, सहकारी संस्था तालुका कार्यालयात सुध्दा उपलब्ध आहे. अर्ज प्राप्त करण्याची
व परीपूर्ण अर्ज स्वीकारण्याची अंतीम मुदत दि. 30 जून आहे. वरीलप्रमाणे जाहिरातीची
जाहिर सुचना उपरोक्त नमुद कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात आली आहे. इच्छुकांनी
आपले परीपूर्ण भरलेले अर्ज नमूद कार्यालयात सादर करावे, असे विभागीय सहनिबंधक(सहकारी
संस्था) राजेंद्र दाभेराव यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा