मौजा-अकोली
नगर भूमापन चौकशी
20 रोजी
अमरावती,दि.
18: अमरावती शहर महानगर पालिके अंतर्गत वाढीव विस्तारीत क्षेत्राचे भूमापन नकाशे व
अभिलेख तयार करण्याचे काम पुर्ण झाले असून मौजा अकोली ता, जि. अमरावती या गावा अंतर्गत
असलेल्या सर्व मिळकतीची नगर भुमापन चौकशी दिनांक 20 जुन 2019 पासून करण्यात येणार आहे.
मौजा-अकोली ता. अमरावती जि. अमरावती (जुने नझूल वगळून) हद्दीतील सर्व मिळकत धारक/भुखंड
धारक/ अभिन्यासातील भुखंड मालक तथा मालमत्ता धारकांनी विशेष उपअधिक्षक भुमि अभिलेख
तथा चौकशी अधिकारी (श.मा.) क्र.2 अमरावती यांनी नियमाप्रमाणे बजाविलेल्या नोटीस दिनांकास
उपस्थित राहून आपल्या मिळकतीबाबत अधिकृत/ नोंदणीकृत दस्त ऐवज सादर करुन आपला हक्क साबित
करावा. नेमून दिलेल्या दिनांकास आपल्या मिळकतीबाबत अधिकृत/नोंदणीकृत दस्तऐवज सादर न
केल्यास मालकी हक्क साबित होणार नाही याची संबंधित सर्व मिळकत धारकांनी नोंद घ्यावी.
असे
विशेष उपअधिक्षक भूमि अभिलेख तथा चौकशी अधिकारी (श.मा.) क्र 2, अमरावती यांनी कळविले
आहे.
****
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा