बारावी परीक्षेची आवेदनपत्रे भरण्यास
मुदतवाढ
अमरावती, दि. 7 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक
शिक्षण मंडळामार्फत सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेच्या
शास्त्र, कला व वाणिज्य शाखांची फक्त नियमित विद्यार्थ्याची आवेदनपत्रे सरल
डेटाबेसवरुन ऑनलाईन पध्दतीने, तसेच व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचे नियमित विद्यार्थी व
पुनर्परिक्षार्थी आदींसाठी आवेदनपत्रे नियमित शुल्कासह ऑनलाईन पध्दतीने भरण्यास
मुदतवाढ देण्यात आली आहे.
पूर्वी जाहीर केलेल्या
वेळापत्रकानुसार आवेदनपत्रे दि. 3 डिसेंबर ते 11 डिसेंबर या कालावधीत व विलंब शुल्कांसह दि. 13 डिसेंबर ते
20 डिसेंबर या कालावधीत भरावयाची होती. मात्र, महाविद्यालयांना तांत्रिक व इतर
अडचणी येत असल्याने मुदतवाढ देण्यात आली.
आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरावयाची
आहेत.
माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत
शास्त्र, कला व वाणिज्य शाखांची नियमित विद्यार्थ्यांची आणि व्यवसाय अभ्यास शाखेचे
नियमित विद्यार्थी व सर्व पुनर्परिक्षार्थी, खाजगी विद्यार्थी, श्रेणी सुधार
योजनेअंतर्गत तुरळक विषय घेऊन परिक्षेस बसणारे विद्यार्थी आदींची आवेदनपत्रे नियमित
शुल्कासह दि. 12 डिसेंबर 2021 पर्यंत भरता येतील. विलंब शुल्कासह सोमवार, दि 13
डिसेंबर 2021 ते सोमवार, दि. 20 डिसेंबर 2021 पर्यंत मुदत आहे. उच्च माध्यमिक शाळा
व कनिष्ठ महाविद्यालयांनी चलन डाऊनलोड करुन बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाची मुदत शुक्रवार
दि. 12 नोव्हेंबर ते शनिवार दि. 25 डिसेंबर 2021 पर्यंत आहे.
आवेदनपत्रे भरावयाच्या कालावधीत
महाविद्यालयाने विद्यार्थ्यांमार्फत आवेदनपत्रात नमूद केलेली माहिती आपल्या
रजिस्टरच्या माहितीनुसार पडताळून अचूक असल्याची खात्री करावी व त्याबाबत आपल्या
लॉगिनमधून प्रिलिस्ट डाऊनलोड करून त्यावर विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घ्यावी.
त्यानंतर प्रिलिस्ट चलनासोबत विभागीय मंडळात जमा करावी, असे आवाहन करण्यात आले
आहे.
उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी
विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रिलिस्ट दि.27
डिसेंबर पूर्वी जमा करावी.
महाविद्यालयांनी नियमित विद्यार्थ्यांची
विज्ञान, कला व वाणिज्य शाखांची ऑनलाईन आवेदनपत्रे स्विकारण्यासाठी सरल डेटाबेसमध्ये
अद्ययावत नोंद ठेवणे आवश्यक आहे, असे डॉ. अशोक भोसले, सचिव, राज्य मंडळ पुणे यांनी
कळविले आहे.
000000