शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०२२

विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करावे

 

विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर

ऑनलाईन अर्ज सादर करावे

अमरावती दि.30 (विमाका) :  अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणको भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क प्रतिपुर्ती योजनेचा लाभ मिळणेसाठी कार्यालय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणी अंतर्गत येत असलेल्या सर्व शासकिय, निमशासकिय अनुदानित, विनाअनुदानित, कायम विना अनुदानित महाविद्यालयांनी भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क व इतर योजनेचे शैक्षणिक सत्र 2022-23 या सत्राचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी https://mahaddimahat.gov.in ही प्रणाली दिनांक 21 सप्टेंबर पासुन कार्यान्वीत झाली असून अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्याच्या सुचना आहेत.

जिल्हातील विविध महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी भारत सरकार शिष्यवृत्ती शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क प्रतिपुर्ती व इतर योजनेचे सन 2022-23 या सत्रातील तथा नुतनीकरण अर्ज तात्काळ https://mahadbtmahait.gov.in  या ऑनलाईन प्रणालीवर भरण्यात यावे.

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी विहीत मुदतीत अर्ज मरुन महाविद्यालय स्तरावर सादर करावे. यासाठी महाविद्यालयांनी सुचना फलकावर सुचना लावून व वर्गामध्ये नोटीस फिरवून व जनजागृती करुन राये अनुसूचित जमातीचा विद्यार्थी भारत सरकार शिष्यवृत्ती व इतर योजनेपासून वंचित राहील्यास याची संपूर्ण जबाबदारी ही संबंधीत महाविद्यालयाची राहील याची नोंद घ्यावी. याबाबत 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळविण्याकरीता https://mahadbtmahait.gov.in या ऑनलाईन प्रणालीवर अर्ज सादर करण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी, सावन कुमार यांनी केले आहे.

0000000

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा