मंगळवार, २७ सप्टेंबर, २०२२

धर्मादाय सहआयुक्त कार्यालयासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध, सुसज्ज इमारत निर्माण होऊन नागरिकांच्या सुविधेत भर पडेल - विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे

 






धर्मादाय सहआयुक्त कार्यालयासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध

सुसज्ज इमारत निर्माण होऊन नागरिकांच्या सुविधेत भर पडेल

                                                  -विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे

अमरावती दि.27 (विमाका) : धर्मादाय सहआयुक्त कार्यालयात नोंदणी, दाव्यांची सुनावणी व इतर प्रशासकीय व न्यायिक स्वरुपाची महत्त्वाची कामे पार पडत असतात. कामे गतीने पार पाडण्यासाठी कार्यालयाची इमारत अद्ययावत व मुलभूत सुविधांनी परिपूर्ण असणे गरजेचे आहे. विद्यापीठ परिसरात या कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली असून, कामाला चालना द्यावी. स्वतंत्र जागेवर सुसज्ज इमारत निर्माण होऊन नागरिकांच्या सुविधेत भर पडेल. असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज येथे केले.

सेवा पंधरवड्यानिमित्त धर्मादाय सहआयुक्त कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. धर्मादाय सहआयुक्त संभाजी द. ठाकरे, अमरावती वकील संघाचे अध्यक्ष ॲड. प्रमोद बोथरा, उपजिल्हाधिकारी रणजीत भोसले व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यालयाला गतीने जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल महसूल व भूमी अभिलेख अधिकार्यांचा सत्कार यावेळी‍ करण्यात आला.

विभागीय आयुक्त श्री. पांढरपट्टे म्हणाले की, विश्वस्त संस्थांची नोंदणी व इतर बाबी आदी व्यापक स्वरुपाचे कामकाज पाहता या कार्यालयात सातत्याने वर्दळ असते. तथापि, अपुऱ्या जागेत कार्यालयीन कामकाज प्रभावीपणे होऊ शकत नाही. हे लक्षात घेऊन स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे काम गतीने पूर्ण व्हावे. स्वतंत्र इमारतीच्या निर्मितीनंतर नागरिकांसाठी चांगली सुविधा उपलब्ध होईल.

धर्मादाय आयुक्त श्री. ठाकरे यांनी कार्यालयाचे कामकाज व उपक्रम यांची माहिती मनोगतातून सांगितली, सेवा पंधरवड्यात नोंदणी, इतर न्यायिक कामकाज व कालमर्यादा असलेली कामे वेळेत पूर्ण करण्यात आली. असे त्यांनी सांगितले. यावेळी श्री.पांढरपट्टे यांनी कार्यालयाची पाहणी केली व अधिकारी-कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.

उपअधिक्षक भुमि अभिलेख अनिल फुलझेले, तहसीलदार संतोष काकडे, सहा. धर्मादाय आयुक्त रोहिणी पाठक, प्र. माहिती उपसंचालक हर्षवर्धन पवार, उपविभागीय अभियंता एन.प्रकाश रेड्डी, मनिषा खरैय्या, सार्वजनिक न्यास वकील संघाचे सदस्य, अधिक्षक राजश्री परांजपे, निलेश करलुके, सुरैय्या खान, निरीक्षक संतोष राऊत, विक्रम पवार, रविंद्र गुल्हाने, उमेश लुंगे, शालिनी गुल्हाने, अस्मिता पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अधिक्षक पिंकी रॉय यांनी केले. आभार लेखापाल सचिन बाकल यांनी मानले.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा