लंपी प्रतिबंधक लसीच्या 2
लाख 60 हजार मात्रा उपलब्ध
अमरावती, दि. 21 (विमाका) : जिल्ह्यात गोवर्गीय जनावरांच्या लंपी या आजारावरील
प्रतिबंधक लसीच्या 2 लाख 60 हजार मात्रा उपलब्ध झाल्या असून, बाधित क्षेत्रातील 1 लाख 83 हजार 893 जनावरांचे
लसीकरण झाले आहे, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पुरुषोत्तम सोळंके
यांनी दिली.
पशुपालकांनी
घाबरुन जाण्याची गरज नसून योग्य दक्षतेने व उपचाराने हा रोग पूर्ण बरा होतो. पशुपालकांनी
या रोगाची लक्षणे आढळून आल्यास तात्काळ नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क
साधावा अथवा 1962 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. लसीकरण व औषधोपचार विनामूल्य
आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा