अंजनगाव तालुक्यात गुरुवारी ई- पीक पाहणी मोहिम
अमरावती, दि.13 (विमाका):- अंजनगाव
सुर्जी तालुक्यात गुरुवारी (१५ सप्टेंबर) ‘माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा
पीक पेरा’ अंतर्गत ई- पीक पाहणी मोहिम राबविण्यात येणार आहे. तालुक्यातील ३६ हजार ७२८
खातेदारांच्या ॲपमध्ये नोंदी घेण्याचे उद्दिष्ट आहे.
मोहिमेबाबत सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील,
तलाठी, कृषी सहायक, सेतू संचालक यांनी बांधाबांधांवर जाऊन जनजागृती करण्याचे व अधिकाधिक
शेतकरी बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन तहसीलदार अभिजीत जगताप यांनी केले आहे.
००००००
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा