सामाजिक न्याय विभागामार्फत जागतिक ज्येष्ठ नागरिकदिन उत्साहात साजरा
विभागीय आयुक्ताच्या हस्ते
सामाजिक संस्थांचा गौरव
अमरावती दि.30 (विमाका) : जागतिक
ज्येष्ठ नागरिक दिवसाचे औचित्य साधून विशेष कार्य केलेल्या ज्येष्ठांचा व ज्येष्ठ
नागरिकांसाठी काम करणा-या सामाजिक संस्थांचा सत्कार विभागीय आयुक्त डॉ. दिलीप
पांढरपट्टे यांच्या हस्ते आज करण्यात आला.
साईनगरातील ज्येष्ठ
नागरिक संघाच्या परिसरात हा कार्यक्रम झाला. डॉ.स्वप्निल दुधाट, प्रादेशिक
उपायुक्त सुनिल वारे उपस्थित होते. अनेक वर्षापासून निराधार, निराश्रीत ज्येष्ठ
नागरीकांचा सांभाळ करणा-या अनुदानित वृध्दाश्रमांचे अध्यक्ष व सचिवांना गौरविण्यात
आले. विभागातील पाचही जिल्ह्यांच्या ज्येष्ठ नागरीक समन्वय समितीचे अध्यक्ष व सचिव
यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
ज्येष्ठ
नागरीक हे समाजाचे ख-या अर्थाने मार्गदर्शक आहेत. सर्वांनी सकारात्मकता बाळगून उत्साही
राहावे. सकारात्मकतेने आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते असे डॉ. पांढरपट्टे यांनी यावेळी
सांगितले. श्री. वारे यांनी ज्येष्ठ नागरीकांसाठी समाज कल्याण विभागामार्फत
राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली.
डॉ.
दुधाट यांनी वाढत्या वयामुळे ज्येष्ठ नागरीकांना उद्भवणाऱ्या शारीरिक व मानसिक
समस्यांवर मार्गदर्शन केले. जनसंपर्क अधिकारी मंगला देशमुख यांनी सूत्रसंचालन
केले. जिल्हा समालकल्याण अधिकारी राजेंद्र जाधवर यांनी आभार मानले.
सहायक आयुक्त
माया केदार, प. विदर्भ समन्वय समितीचे श्री. पिंपरकर, ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष
रामकृष्ण कवाने व सर्व पदाधिकारी, सदस्य, वृध्दाश्रमाचे पदाधिकारी, समाज कल्याण
कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा