पशुंमधील लंपी प्रादुर्भावाच्या
पार्श्वभूमीवर १० गावात नियंत्रित क्षेत्र जाहीर
-
जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी
अमरावती,
दि.9 (विमाका):- जनावरांमधील
लंपी चर्मरोगाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर धारणी, चिखलदरा व अचलपूर
या तीन तालुक्यातील एकूण दहा गावांमध्ये नियंत्रित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे.
तसा आदेश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी जारी केला.
धारणी तालुक्यातील
मौजे सावलीखेडा, सोनाबर्डी, बाबंदा, धुळघाट रोड, झिल्पी व पाडीदम,तसेच चिखलदरा तालुक्यातील
मौजे पिपादरी, अंबापाटी आणि अचलपूर तालुक्यातील मौजे धामणगाव गढी, व वडगाव फत्तेपुर
येथील पशुधनामध्ये गो व म्हैस या वर्गातील जनावरांना होणाऱ्या लंपी चर्मरोग या विषाणूजन्य
त्वचारोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. या आजारामुळे जनावरांची कार्यक्षमता कमी होते.
परिणामी दुध उत्पादन कमी होऊन पशुपालकांचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे प्रतिबंधात्मक
उपाययोजना होण्याबाबत जिल्हा पशूसंवर्धन उपायुक्तांनी
प्रस्ताव सादर केला त्यानुसार या दहा गावामध्ये नियंत्रित क्षेत्र जाहीर करण्यात
आले आहे.
प्राण्यांमधील
संक्रमण व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, २००९ मधील कलम १२ व १३ अन्वये या नियंत्रण क्षेत्राच्या १० किलोमीटर परिघात
जनावरांचे बाजार, वाहतुक, जत्रा व प्रदर्शन, बैलांच्या शर्यती आयोजित करण्यास पुढील
आदेशापर्यंत प्रतिबंध करण्यात आला आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा