जिल्ह्यात कलम 144 लागू
अमरावती, दि. 2 (विमाका): जिल्ह्यात गणेशोत्सवास सुरूवात झाली असुन 26 सप्टेंबर पासुन नवरात्री उत्सव, 5 ऑक्टोबर रोजी दसरा व 9 ऑक्टोबर रोजी ईद निमित्त सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम, देखावे, शोभायात्रांचे आयोजन केले जाते. उत्सवाच्या या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी जिल्ह्यात 3 सप्टेंबर ते 12 ऑक्टोबर पर्यंत कलम 144 लागु केले आहे. सण उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरीता प्रतिबंधित आदेश लागु करण्यात येत असल्याचे डॉ. सिंह यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा