अपात्र
शिधापत्रिकाधारकांनी ‘अन्नधान्य अनुदानातून बाहेर पडा’
या
योजनेत समाविष्ट व्हावे
अमरावती
दि. 15 (विमाका): अंजनगांव सुर्जी तालुक्यातील अंत्योदय व
बीपीएल शिधापत्रिकाधारक या योजनेचा लाभ घेण्यास अपात्र ठरत असतील त्यांनी आपले ‘अन्नधान्य
अनुदानापासून बाहेर पडा’ (Opt Out of foodgrains) या योजनेत समाविष्ठ होऊन देशास
बळकट करण्याकरिता सहभाग घ्यावा असे आवाहन तहसिलदार तथा पुरवठा अधिकारी यांनी केले
आहे.
गीव्ह इट अप साठी निकष - उत्पन्नाची मर्यादा
शहरी भागातील कुटूंबाचे 59,000 रुपये
व ग्रामीण भागातील कुटूंबाचे उत्पन्न 44,000 रुपये असल्यास कुटूंबातील कोणी ही
व्यक्ती डॉक्टर, वकील, स्थापत्य विशारद, चार्टड अकाऊन्टट असेल, कुटूंबातील कोणीही
व्यक्ती व्यवसाय कर, विक्रीकर किंवा आयकर भरत असल्यास किंवा भरण्यास पात्र
असल्यास, कुटूंबातील सर्व व्यक्तींच्या नावे एकूण दोन हेक्टर जिरायत किंवा एक
हेक्टर हंगामी बागायत किंवा अर्धा हेक्टर बारमाही बागायत जमीन असल्यास, शासकीय,
निमशासकीय सर्व प्रकारचे नोकरदार वर्ग, शासकीय पेन्शन धारक कुटूंबे
शिधापत्रिकेसाठी अपात्र ठरतील.
केशरी शिधापत्रिकासाठी निकष
कुटूंबाचे एकत्रित
वार्षिक उत्पन्न रुपये 1 लक्ष किंवा त्यापेक्षा जास्त नसावे, कुटूंबातील कोणीही
व्यक्तीकडे चारचाकी यांत्रिक वाहन नसावे (टॅक्सी चालक वगळून), कुटूंबातील सर्व व्यक्तीच्या
नावे मिळून चार हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त बारमाही बागायती शेत जमीन असू नये.
शुभ्र शिधापत्रिकांसाठी निकष
ज्या
कुटूंबातील सर्व व्यक्तीचे मिळून एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपये 1 लक्ष किंवा त्या
पेक्षा जास्त असेल किंवा त्या कुटूंबातील कोणीही व्यक्तीकडे चारचाकी यांत्रिक वाहन
असेल किंवा त्या कुटूंबातील सर्व व्यक्तीच्या नावे मिळून चार हेक्टर पेक्षा जास्त
बारमाही बागायती शेत जमीन असेलेल्या कुटूंबानी शुभ्र शिधापत्रिकेचा लाभ घ्यावा.
अंत्योदय व बी. पी. एल. गटात
समाविष्ठ असलेले व या निकषानुसार अपात्र ठरत असलेल्या सर्व शिधापत्रिकाधारकांनी
सदर योजनेतून बाहेर पडून देशास बळकट करण्याकरीता तहसिलदार तथा पुरवठा अधिकारी यांनी
आवाहन केले आहे.
00000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा