शुक्रवार, ९ सप्टेंबर, २०२२

पशुंमधील लंपी प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर १० गावात नियंत्रित क्षेत्र जाहीर - जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी

 

पशुंमधील लंपी प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर १० गावात नियंत्रित क्षेत्र जाहीर

-          जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी

अमरावती, दि.9 (विमाका):-  जनावरांमधील  लंपी चर्मरोगाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर धारणी, चिखलदरा व अचलपूर या तीन तालुक्यातील एकूण दहा गावांमध्ये नियंत्रित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. तसा आदेश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी जारी केला.

  धारणी तालुक्यातील मौजे सावलीखेडा, सोनाबर्डी, बाबंदा, धुळघाट रोड, झिल्पी व पाडीदम,तसेच चिखलदरा तालुक्यातील मौजे पिपादरी, अंबापाटी आणि अचलपूर तालुक्यातील मौजे धामणगाव गढी, व वडगाव फत्तेपुर येथील पशुधनामध्ये गो व म्हैस या वर्गातील जनावरांना होणाऱ्या लंपी चर्मरोग या विषाणूजन्य त्वचारोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. या आजारामुळे जनावरांची कार्यक्षमता कमी होते. परिणामी दुध उत्पादन कमी होऊन पशुपालकांचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना होण्याबाबत  जिल्हा पशूसंवर्धन उपायुक्तांनी  प्रस्ताव सादर केला त्यानुसार  या दहा गावामध्ये नियंत्रित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे.

  प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, २००९ मधील कलम १२ व १३  अन्वये या नियंत्रण क्षेत्राच्या १० किलोमीटर परिघात जनावरांचे बाजार, वाहतुक, जत्रा व प्रदर्शन, बैलांच्या शर्यती आयोजित करण्यास पुढील आदेशापर्यंत प्रतिबंध करण्यात आला आहे.

00000

अमरावती विभागात 5.1 मि.मी. पाऊस यंदाच्या हंगामात एकूण 742.6 मि.मी.

 

अमरावती विभागात 5.1 मि.मी. पाऊस

यंदाच्या हंगामात एकूण 742.6 मि.मी.

अमरावती, दि. 9 (विमाका): अमरावती विभागात 5.1 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. विभागीय आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिलेल्या ‘महावेध’ च्या नोंदीनुसार आज दुपारी बारापर्यंत अमरावती विभागात सरासरी 5.1 मि. मी. पाऊस झाला. 1 जून ते आजपर्यंत 742.6 मि. मी. पावसाची  नोंद  करण्यात आली  आहे.

             विभागात नोंदला गेलेला आजचा तालुकानिहाय पाऊस असा असून (कंसातील आकडेवारी यंदा 1 जून पासून आजवर झालेल्या पावसाची आहे. सर्व आकडेवारी मिली मीटर परिमाणात. ही माहिती ‘महावेध’च्या नोंदीनुसार दुपारी बाराची असून बदलत्या पर्जन्यमानानुसार त्यात बदल होऊ शकतात.)

 

            अमरावती जिल्हा : धारणी 29.5 (785.5), चिखलदरा 5.4 (1175.2), अमरावती 8.4 (678.9), भातकुली 4.0 (522.4), नांदगाव खंडेश्वर 9.4 (800.6), चांदूररेल्वे 7.5 (759.7), तिवसा 2 (931.2), मोर्शी 0 (787.3) वरूड 0.7 (1039), दर्यापूर 0.3 (491.4), अंजनगाव 4.1 (582.1), अचलपूर 1.3 (638.9), चांदूरबाजार 0.3 (829.5), धामणगाव रेल्वे 2.4 (917.9) अमरावती जिल्ह्यात चोवीस तासांत सरासरी 5 मि.मी. पाऊस झाला. जिल्ह्यात यंदा आजवर सरासरी 766.2 मि.मी. पाऊस झाला.

 

अकोला जिल्हा : अकोट 2.3 (433.4), तेल्हारा 12 (576.8), बाळापूर 0.2 (629), पातूर 4.7 (556.6), अकोला 0.1 (593.3), बार्शी टाकळी 1 (517.8), मुर्तिजापूर 1.5 (495.8), जिल्ह्यात 24 तासांत सरासरी 2.6 मि.मी. तर आजवर 545.7 मि.मी. पाऊस झाला आहे.

 

बुलडाणा जिल्हा : जळगाव जामोद 6.4 (406.7), संग्रामपूर 12.7 (531.5), चिखली 2.8 (582.3), बुलडाणा 1.1(755.1), देऊळगाव राजा 0.9 (611.5), मेहकर 4.6 (646.7), सिंदखेड राजा 6 (673.7), लोणार 11.8 (543.6), खामगाव 2.1 (490.7), शेगाव 5.6 (521.7), मलकापूर 3.8 (437.8), मोताळा 5.1 (476.5), नांदूरा 11.3 (489.3), जिल्ह्यात दिवसभरात 5.2 मि.मी.तर यंदाच्या हंगामात आजवर 559.8 मि.मी. पाऊस झाला.

 

            यवतमाळ जिल्हा : यवतमाळ 1.1 (864.4), बाभूळगाव 0.1 (917.6), कळंब 0.2 (991.1), दारव्हा 6.2 (756.1), दिग्रस 9.5 (951.4), आर्णी 6.1 (1172.9), नेर 4.1 (825.5), पुसद 12.0 (716.3), उमरखेड 5.8 (783.3), महागाव 8 (970.9), वणी 0.7 (1166.8), मारेगाव 15.6 (1143.4), झरी जामणी 7.3 (1088.5), केळापूर  6.6 (1092.9), घाटंजी 6.7 (1003), राळेगाव 2.5 (1116.4), जिल्ह्यात 24 तासांत सरासरी 5.6 मि.मी.तर यंदाच्या हंगामात आजवर सरासरी 960.5 मि.मी. पाऊस झाला.

 

            वाशिम जिल्हा : वाशिम 19.5 (771.7), रिसोड 4.8 (742.3), मालेगाव 4.8 (815.4), मंगरूळपीर 1.4 (827), मानोरा 1.7 (834.4), कारंजा 4.2 (578.5), जिल्ह्यात 24 तासांत 6.7 मि.मी. तर 1 जून पासून आजवर 757.3 मि.मी.पाऊस झाला.

000000

 

विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी

 

विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी

अमरावती दि.9 (विमाका) : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने दि. 9 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 7 वाजता दिलेल्या माहितीनुसार अमरावती प्रादेशिक विभागातील मोठ्या व मध्यमप्रकल्पांतील दैनिक जलाशय पातळी व पाणीसाठा अहवाल खालीलप्रमाणे.

विभागातील मोठ्या प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये)

अमरावती जिल्ह्यातील उर्ध्ववर्धा (342.20), यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्प (398.78), अरुणावती (330.76), बेंबळा (267.20), अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा (347.62), वान (408.50), बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा (291.69), पेनटाकळी (557.95), खडकपूर्णा (520.13).

मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये)

अमरावती जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी शहानूर (448.44), चंद्रभागा (505.45), पूर्णा (450.49), सपन (512.05), पंढरी (426.70), गर्गा (345.00), बोर्डीनाला (361.60),यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस (305.41), सायखेडा (272.50), गोकी (315.70), वाघाडी (318.60), बोरगांव (319.00), नवरगांव (254.10), अकोला जिल्ह्यातील  निर्गुणा (391.40), मोर्णा (366.97), उमा (344.00), घुंगशीबॅरेज (254.00), वाशिम जिल्ह्यातील अडाण (381.50), सोनल (451.90), एकबुर्जी (151.94), बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा (403.20), पलढग (403.20), मस (324.50), कोराडी (545.25), मन (374.45), तोरणा (405.95), उतावळी (370.50) आहे.   

000000

 

 

 

 

 

गुरुवार, ८ सप्टेंबर, २०२२

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष) सुशासन नियमावलीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा सामान्य नागरिक केंद्रबिंदू ठेवून सुशासन नियमावली करावी.

 मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)

 

सुशासन नियमावलीचा  मुख्यमंत्र्यांकडून आढावा

 

सामान्य नागरिक केंद्रबिंदू ठेवून सुशासन नियमावली करावी

 

प्रशासनाचे व्हावे सुशासन...!

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

 

मुंबई, दि. 8: सामान्य नागरिक केंद्रबिंदू ठेऊन त्यांना शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ सुलभरित्या मिळावा यासाठी सामान्यांच्या समस्या आणि शासकीय कार्यपद्धती यांची सांगड घालत सुशासन नियमावली करावी, असे निर्देश मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. कृषी, आरोग्य, माहिती तंत्रज्ञान, शिक्षण आदिवासी विकास, रोजगार निर्मिती या क्षेत्रांना विशेष प्राधान्य देऊन अन्य राज्यांना आदर्श ठरेल अशी नियमावली तयार करावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 

सुशासन नियमावली तयार करण्याकरिता नियुक्त समितीची आज वर्षा निवासस्थानी बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या समितीचे अध्यक्ष निवृत्त तत्कालीन उपलोकायुक्त सुरेश कुमार, माजी मुख्य सचिव तथा समिती सदस्य जयंतकुमार बांठिया, स्वाधीन क्षत्रिय, के. पी. बक्षी, अजितकुमार जैन, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यावेळी उपस्थित होते.

 

शासनाच्या सेवा नागरिकांना अधिक सुलभ व पारदर्शी पध्दतीने मिळाव्यात  तसेच शासन व नागरिक यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी सुशासन नियमावलीमध्ये त्याचा अतर्भाव करावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. प्रशासनाचे सुशासन होण्यासाठी  सुशासन नियमावली उपयुक्त होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 

प्रशासन गतिमान करतानाच माहिती आणि तंत्रज्ञानाचा अधिक प्रभावीपणे वापर करण्याची गरज आहे.शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना, शेतकऱ्यांसाठी जोडधंदा, शेतीत आधुनिक तंत्रज्ञान यासाठी समितीने उपाययोजना सुचविताना त्या क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घ्यावी, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

 

अतिवृष्टीमुळे कोल्हापूर सारख्या भागात पूर येतो, लहरी हवामानामुळे अतिवृष्टी, दुष्काळ यासरख्या नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागते यासाठी शासनाकडून वेळोवेळी मदत केली जाते, मात्र अशा नैसर्गिक आपत्तींबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करून नागरिकांना दिलासा देण्यासाठी  या समितीने त्याचा सुशासन नियमावलीमध्ये समावेश करावा, अशी सूचनाही श्री. शिंदे यांनी यावेळी केली.

आदिवासी भागात कुपोषणासारखी समस्या कायमच भेडसावत असते अशा वेळी ज्या योजना आहेत त्यांच्या अंमलबजावणीतील त्रुटी शोधून त्यावर देखील समितीने उपाययोजना सुचवाव्यात असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शिक्षण, आरोग्य, रोजगार निर्मिती या क्षेत्रांना विशेष प्राधान्य देण्यात येत असून पायाभूत सुविधांच्या कामांची गुणवत्ता यासाठी संनियंत्रण करणारी यंत्रणा समितीने सुचवावी.

 

फायलींचा जलदगतीने निपटारा याविषयावर देखील समितीने अभ्यास करतानाच दप्तर दिरंगाई कायद्याची अमंलबजावणी अधिक प्रभावीपणे होण्यासाठी नियमावलीमध्ये त्याचा समावेश करावा, असे सांगत लोकांचे काम वेळेवर झाले तरच त्याला सुशासन म्हणता येईल, नागरिकांना कामांसाठी शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागू नये, त्यांची भटकंती थांबावी, क्षेत्रीयस्तरावरच त्यांच्या समस्यांचा निपटारा व्हावा मंत्रालयापर्यंत त्यांना यायची गरज भासू नये, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

विभागीय स्तरावर असलेल्या मुख्यमंत्री कार्यालयाचे कामकाज अधिक गतिमान करण्याच्या सूचना यावेळी श्री. शिंदे यांनी दिल्या.

 

शासनाविषयी लोकांच्या मनात सकारात्मक भावना निर्माण करण्यासाठी सुशासन नियमावली महत्वाची भूमिका बजावणार असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

मुख्य सचिवांनी यावेळी प्रस्ताविक केले. यावेळी समिती अध्यक्ष श्री. सुरेश कुमार व सदस्यांनी समितीने केलेल्या कार्याबाबतची माहिती दिली.

000000

--

मतदान नोंदणीला आधार जोडण्यासाठी सर्व मतदान केंद्रांवर रविवारी शिबिर - जिल्हाधिकारी पवनीत कौर

 मतदान नोंदणीला आधार जोडण्यासाठी सर्व मतदान केंद्रांवर रविवारी शिबिर

 

                                                                            - जिल्हाधिकारी पवनीत कौर

 

अमरावती, दि. 8 : मतदार नोंदणीला आधार क्रमांक जोडण्यासाठी मतदारांच्या सुविधेसाठी विशेष शिबिर रविवार, दि. 11 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर होणार आहे.

 

मतदान ओळखपत्राला आधार क्रमांक जोडण्यासाठी मोहीम दि.  एक ऑगस्टपासून राबविण्यात येत आहे. विद्यमान मतदारांकडून त्यांची ओळख प्रस्थापित करण्यासाठी मतदार यादीतील त्यांच्या नोंदीचे प्रमाणीकरण करण्यासाठी ही प्रक्रिया होणार आहे. त्याचप्रमाणे, एकापेक्षा जास्त मतदारसंघात किंवा त्याच मतदारसंघाचे नाव एकापेक्षा जास्त वेळा नोंदविले गेले किंवा कसे, याचा पडताळा करण्यासाठी याची मदत होणार आहे.

 

विद्यमान मतदारांनी नमुना अर्ज क्रमांक 'सहा ब'मध्ये आधार क्रमांक मतदार नोंदणी अधिकारी किंवा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे दाखल करावयाचा आहे. मतदारांना आधार क्रमांक भरण्यासाठी 'सुविधा पोर्टल' व ऍपद्वारे ऑनलाइन सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याद्वारे ही मतदार आपला आधार क्रमांक नोंदवू शकतात.

 

 

मतदारांना आधार क्रमांक मतदार ओळखपत्र सोबत संलग्न करण्यासाठी दि. 11 सप्टेंबर रोजी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) हजर असतील. सर्व मतदारांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.

--

अमरावती विभागात 2.8 मि.मी. पाऊस, यंदाच्या हंगामात एकूण 737 मि.मी.

 

अमरावती विभागात 2.8 मि.मी. पाऊस

यंदाच्या हंगामात एकूण 737 मि.मी.

अमरावती, दि. 8 (विमाका) :अमरावती विभागात 2.8 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. विभागीय आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिलेल्या ‘महावेध’ च्या नोंदी नुसार आज दुपारी बारापर्यंत अमरावती विभागात सरासरी 2.8 मि. मी. पाऊस झाला. 1 जून ते आजपर्यंत 737.6 मि. मी. पावसाची  नोंद   करण्यात आली  आहे.

             विभागात नोंदला गेलेला आजचा तालुका निहाय पाऊस असा असून (कंसातील आकडेवारी यंदा 1 जून पासून आजवर झालेल्या पावसाची आहे. सर्व आकडेवारी  मिली  मीटर परिमाणात. ही माहिती ‘महावेध’च्या नोंदीनुसार दुपारी बाराची असून बदलत्या पर्जन्यमानानुसार त्यात बदल होऊ शकतात.)

 

            अमरावती जिल्हा : धारणी 3.6 (756.2), चिखलदरा 6 (1169.8), अमरावती 6.6 (670.5), भातकुली 6.9 (518.4), नांदगाव खंडेश्वर 4 (791.2), चांदूर रेल्वे 0.2 (752.2), तिवसा 7.5 (929.2), मोर्शी 5.1 (787.3) वरूड 12.7 (1038.3), दर्यापूर 3.7 (491.1), अंजनगाव 4.1 (578), अचलपूर 11.8 (637.6), चांदूर बाजार 3.3 (829.2), धामणगाव रेल्वे 1.5 (915.5) अमरावती जिल्ह्यात चोवीस तासांत सरासरी 5.5 मि.मी. पाऊस झाला. जिल्ह्यात यंदा आजवर सरासरी 761.2 मि.मी. पाऊस झाला.

 

अकोला जिल्हा : अकोट 7.8 (441.1), तेल्हारा 1.5 (564.8), बाळापूर 0.8 (628.8), पातूर 0 (551.9), अकोला 0.1 (593.2), बार्शीटाकळी 0 (516.8), मुर्तिजापूर 5.3 (494.3), जिल्ह्यात 24 तासांत सरासरी 2.3 मि.मी. तर आजवर 543.1 मि.मी. पाऊस झाला आहे.

 

बुलडाणा जिल्हा : जळगाव जामोद 5.4 (400.3), संग्रामपूर 0.4 (518.8), चिखली 0 (579.8), बुलडाणा 4.2 (754), देऊळगाव राजा 0.4 (610), मेहकर 0.6 (643.3), सिंदखेड राजा 0.4 (667.7), लोणार 0 (532), खामगाव 0.2 (489.8), शेगाव 1.0 (516.1), मलकापूर 7.4 (434), मोताळा 0.3 (471.4), नांदूरा 1.7 (478), जिल्ह्यात दिवसभरात 1.4 मि.मी.तर यंदाच्या हंगामात आजवर 554.9 मि.मी. पाऊस झाला.

 

            यवतमाळ जिल्हा : यवतमाळ 0.1 (863.8), बाभूळगाव 0.5 (917.5), कळंब 1.6 (990.3), दारव्हा 0.6 (751.1), दिग्रस 0.1 (941.9), आर्णी 0.3 (1164.5), नेर 1.5 (821.4), पुसद 0.8 (701.7), उमरखेड 3.8 (778.3), महागाव 0.1 (961.6), वणी 8 (1166.1), मारेगाव 1.5 (1127.8), झरीजामणी 3 (1081), केळापूर  6.1 (1086.2), घाटंजी 5.8 (996.2), राळेगाव 8.5 (1113.7), जिल्ह्यात 24 तासांत सरासरी 2.8 मि.मी.तर यंदाच्या हंगामात आजवर सरासरी 954.6 मि.मी. पाऊस झाला.

 

            वाशिम जिल्हा : वाशिम 0 (751.6), रिसोड 2.6 (737.5), मालेगाव 0 (811.5), मंगरूळपीर 0 (826.4), मानोरा 0.1 (832.7), कारंजा 0.8 (576), जिल्ह्यात 24 तासांत 0.6 मि.मी.तर 1 जून पासून आजवर 751 मि.मी.पाऊस झाला.

000000

 

अमरावती विभागात 2.8 मि.मी. पाऊस यंदाच्या हंगामात एकूण 737 मि.मी.

 

अमरावती विभागात 2.8 मि.मी. पाऊस

यंदाच्या हंगामात एकूण 737 मि.मी.

अमरावती, दि. 7 (विमाका) :अमरावती विभागात 3 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. विभागीय आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिलेल्या ‘महावेध’ च्या नोंदी नुसार आज दुपारी बारापर्यंत अमरावती विभागात सरासरी 3 मि. मी. पाऊस झाला. 1 जून ते आजपर्यंत 737.6 मि. मी. पावसाची  नोंद   करण्यात आली  आहे.

             विभागात नोंदला गेलेला आजचा तालुका निहाय पाऊस असा असून (कंसातील आकडेवारी यंदा 1 जून पासून आजवर झालेल्या पावसाची आहे. सर्व आकडेवारी  मिली  मीटर परिमाणात. ही माहिती ‘महावेध’च्या नोंदीनुसार दुपारी बाराची असून बदलत्या पर्जन्यमानानुसार त्यात बदल होऊ शकतात.)

 

            अमरावती जिल्हा : धारणी 3.6 (756.2), चिखलदरा 6 (1169.8), अमरावती 6.6 (670.5), भातकुली 6.9 (518.4), नांदगाव खंडेश्वर 4 (791.2), चांदूररेल्वे 0.2 (752.2), तिवसा 7.5 (929.2), मोर्शी 5.1 (787.3) वरूड 12.7 (1038.3), दर्यापूर 3.7 (491.1), अंजनगाव 4.1 (578), अचलपूर 11.8 (637.6), चांदूरबाजार 3.3 (829.2), धामणगाव रेल्वे 1.5 (915.5) अमरावती जिल्ह्यात चोवीस तासांत सरासरी 5.5 मि.मी. पाऊस झाला. जिल्ह्यात यंदा आजवर सरासरी 761.2 मि.मी. पाऊस झाला.

 

अकोला जिल्हा : अकोट 7.8 (441.1), तेल्हारा 1.5 (564.8), बाळापूर 0.8 (628.8), पातूर 0 (551.9), अकोला 0.1 (593.2), बार्शीटाकळी 0 (516.8), मुर्तिजापूर 5.3 (494.3), जिल्ह्यात 24 तासांत सरासरी 2.3 मि.मी. तर आजवर 543.1 मि.मी. पाऊस झाला आहे.

 

बुलडाणा जिल्हा : जळगाव जामोद 5.4 (400.3), संग्रामपूर 0.4 (518.8), चिखली 0 (579.8), बुलडाणा 4.2 (754), देऊळगाव राजा 0.4 (610), मेहकर 0.6 (643.3), सिंदखेड राजा 0.4 (667.7), लोणार 0 (532), खामगाव 0.2 (489.8), शेगाव 1.0 (516.1), मलकापूर 7.4 (434), मोताळा 0.3 (471.4), नांदूरा 1.7 (478), जिल्ह्यात दिवसभरात 1.4 मि.मी.तर यंदाच्या हंगामात आजवर 554.9 मि.मी. पाऊस झाला.

 

            यवतमाळ जिल्हा : यवतमाळ 0.1 (863.8), बाभूळगाव 0.5 (917.5), कळंब 1.6 (990.3), दारव्हा 0.6 (751.1), दिग्रस 0.1 (941.9), आर्णी 0.3 (1164.5), नेर 1.5 (821.4), पुसद 0.8 (701.7), उमरखेड 3.8 (778.3), महागाव 0.1 (961.6), वणी 8 (1166.1), मारेगाव 1.5 (1127.8), झरीजामणी 3 (1081), केळापूर  6.1 (1086.2), घाटंजी 5.8 (996.2), राळेगाव 8.5 (1113.7), जिल्ह्यात 24 तासांत सरासरी 2.8 मि.मी.तर यंदाच्या हंगामात आजवर सरासरी 954.6 मि.मी. पाऊस झाला.

 

            वाशिम जिल्हा : वाशिम 0 (751.6), रिसोड 2.6 (737.5), मालेगाव 0 (811.5), मंगरूळपीर 0 (826.4), मानोरा 0.1 (832.7), कारंजा 0.8 (576), जिल्ह्यात 24 तासांत 0.6 मि.मी.तर 1 जून पासून आजवर 751 मि.मी.पाऊस झाला.

000000

 

बुधवार, ७ सप्टेंबर, २०२२

अमरावती विभागात 3 मि.मी. पाऊस आजपर्यत 735 मि.मी. पावसाची नोंद

 

अमरावती विभागात 3 मि.मी. पाऊस

आजपर्यत 735 मि.मी. पावसाची नोंद

 

अमरावती, दि. 7 (विमाका) : अमरावती विभागात 3 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. विभागीय आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिलेल्या ‘महावेध’च्या नोंदीनुसार आज दुपारी बारापर्यंत अमरावती विभागात सरासरी 3 मि.मी. पाऊस झाला. 1 जून ते आजपर्यंत 735.1 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.

              विभागात नोंदला गेलेला आजचा तालुकानिहाय पाऊस असा असून (कंसातील आकडेवारी यंदा 1 जूनपासून आजवर झालेल्या पावसाची आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात. ही माहिती ‘महावेध’च्या नोंदीनुसार दुपारी बाराची असून बदलत्या पर्जन्यमानानुसार त्यात बदल होऊ शकतात.)

 

            अमरावती जिल्हा : धारणी 1.3 (753.6), चिखलदरा 3.4 (1163.8), अमरावती 6.6 (663.9), भातकुली 5.1 (511.5), नांदगाव खंडेश्वर 8.2 (787.2), चांदूर रेल्वे 8.8 (752), तिवसा 2 (921.7), मोर्शी 2.8 (782.2) वरूड 7.8 (1025),   दर्यापूर 1.3 (487.5), अंजनगाव 1.9 (573.5), अचलपूर 2.5(625.8), चांदूर बाजार 1.3 (825.4), धामणगाव रेल्वे 4.5 (914) अमरावती जिल्ह्यात चोवीस तासांत सरासरी 4.2 मि.मी. पाऊस झाला. जिल्ह्यात यंदा आजवर सरासरी 755.6 मि.मी. पाऊस झाला.

 

अकोला जिल्हा : अकोट 2.8 (433.3), तेल्हारा 0.9 (563.3), बाळापूर 1.4 (628), पातूर 2.1 (551.9), अकोला 0.1 (593.1), बार्शी टाकळी 0 (516.8), मुर्तिजापूर 0.4 (489), जिल्ह्यात 24 तासांत सरासरी 1 मि.मी. तर आजवर 540.8 मि.मी. पाऊस झाला आहे.

 

बुलडाणा जिल्हा : जळगाव जामोद 0.1 (394.4), संग्रामपूर 1.3 (518.4), चिखली 2.2 (579), बुलडाणा 0 (749.9), देऊळगाव राजा 21.1 (607.9), मेहकर 0.2 (642.7), सिंदखेड राजा 13.3 (667.3), लोणार 0.8 (531.4), खामगाव 0.7 (493.1), शेगाव 0.3 (514.4), मलकापूर 0 (427.9), मोताळा 0 (470.8), नांदूरा 3.8 (478.2), जिल्ह्यात दिवसभरात 3 मि.मी. तर यंदाच्या हंगामात आजवर 553.8 मि.मी. पाऊस झाला.

 

            यवतमाळ जिल्हा : यवतमाळ 5.1 (864), बाभूळगाव 0 (917.4), कळंब 0 (989.4), दारव्हा 4.4 (753.2), दिग्रस 0.9 (941.8), आर्णी 0 (1167.6), नेर 4 (819.9), पुसद 11.2 (699.2), उमरखेड 4.9 (776.7), महागाव 0 (962.5), वणी 0 (1158.1), मारेगाव 0 (1126.4), झरी जामणी 0 (1078), केळापूर 0.6 (1080.1), घाटंजी 0 (990.4), राळेगाव 0.1 (1105.5), जिल्ह्यात 24 तासांत सरासरी 2.4 मि.मी. तर यंदाच्या हंगामात आजवर सरासरी 952.3 मि.मी. पाऊस झाला.

 

            वाशिम जिल्हा : वाशिम 4.1 (751.5), रिसोड 16.1 (734.4), मालेगाव 2.5 (811.6), मंगरूळपीर 2.8 (826.3), मानोरा 0.1 (832.6), कारंजा 1.3 (576.3), जिल्ह्यात 24 तासांत 4.7 मि.मी. तर 1 जूनपासून आजवर 750.5   मि.मी. पाऊस झाला.

000000

 

विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी

 

विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी

अमरावती दि.7 (विमाका) : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने दि. 7 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 7 वाजता दिलेल्या माहितीनुसार अमरावती प्रादेशिक विभागातील मोठ्या व मध्यमप्रकल्पांतील दैनिक जलाशय पातळी व पाणीसाठा अहवाल खालीलप्रमाणे.

विभागातील मोठ्या प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये)

अमरावती जिल्ह्यातील उर्ध्ववर्धा (342.29), यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्प (398.78), अरुणावती (330.68), बेंबळा (267.20), अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा (347.65), वान (407.89), बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा (291.66), पेनटाकळी (558.10), खडकपूर्णा (520.07).

मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये)

अमरावती जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी शहानूर (448.30), चंद्रभागा (505.50), पूर्णा (450.59), सपन (511.75), पंढरी (426.70), गर्गा (344.40), बोर्डीनाला (361.60),यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस (305.38), सायखेडा (272.50), गोकी (315.70), वाघाडी (318.60), बोरगांव (319.00), नवरगांव (254.10), अकोला जिल्ह्यातील  निर्गुणा (391.40), मोर्णा (366.97), उमा (344.00), घुंगशीबॅरेज (254.10), वाशिम जिल्ह्यातील अडाण (381.51), सोनल (451.90), एकबुर्जी (151.94), बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा (403.20), पलढग (403.20), मस (324.50), कोराडी (545.25), मन (374.30), तोरणा (405.80), उतावळी (370.50) आहे.   

000000

 

 

 

 

 

 

मंगळवार, ६ सप्टेंबर, २०२२

अमरावती विभागात 9.1 मि.मी. पाऊस आजपर्यत 732 मि.मी. पावसाची नोंद

 

अमरावती विभागात 9.1 मि.मी. पाऊस

आजपर्यत 732 मि.मी. पावसाची नोंद

 

अमरावती, दि. 6 (विमाका) : अमरावती विभागातील 56 तालुक्यांपैकी अकोला जिल्ह्यातील शेगाव वगळता सर्व तालुक्यात पावसाची नोंद करण्यात आली.  विभागात 732.5 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली.

 

                विभागीय आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिलेल्या ‘महावेध’च्या नोंदीनुसार आज दुपारी बारापर्यंत अमरावती विभागात सरासरी 9.1 मि.मी. पाऊस झाला. 1 जून ते आजपर्यंत 732.5 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.

              विभागात नोंदला गेलेला आजचा तालुकानिहाय पाऊस असा असून (कंसातील आकडेवारी यंदा 1 जूनपासून आजवर झालेल्या पावसाची आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात. ही माहिती ‘महावेध’च्या नोंदीनुसार दुपारी बारा वाजताची असून बदलत्या पर्जन्यमानानुसार त्यात बदल होऊ शकतात.)

 

 अमरावती जिल्हा : धारणी 18.1 (752.2), चिखलदरा 8.7 (1160.4), अमरावती 4.6 (657.3), भातकुली 7.1 (506.4), नांदगाव खंडेश्वर 13.5 (779.0), चांदूर रेल्वे 40.8 (743.2), तिवसा 3.5 (919.7), मोर्शी 6.1 (779.6) वरूड 4.8 (1017.2),   दर्यापूर 5.8 (486.2), अंजनगाव 8.3 (571.6), अचलपूर 12.1 (623.3), चांदूर बाजार 18.8 (824.1), धामणगाव रेल्वे 19.8 (909.5) अमरावती जिल्ह्यात चोवीस तासांत सरासरी 12.0 मि.मी. पाऊस झाला. जिल्ह्यात यंदा आजवर सरासरी 751.5 मि.मी. पाऊस झाला.

 

अकोला जिल्हा : अकोट 5.2 (430.5), तेल्हारा 2.3 (562.4), बाळापूर 0.2 (626.6), पातूर 2.9 (549.8), अकोला 5.6 (593.0), बार्शी टाकळी 0.2 (516.8), मुर्तिजापूर 5.5 (488.6), जिल्ह्यात 24 तासांत सरासरी 3.5 मि.मि. तर आजवर 539.8 मि.मी. पाऊस झाला आहे.

 

बुलडाणा जिल्हा : जळगाव जामोद 0.5 (394.3), संग्रामपूर 0.7 (517.1), चिखली 2.4 (576.8), बुलडाणा 0.3 (749.9), देऊळगाव राजा 3.8 (586.8), मेहकर 13.0 (641.5), सिंदखेड राजा 2.4 (654.0), लोणार 9.5 (531.5), खामगाव 4.4 (492.5), शेगाव 0.0 (514.1), मलकापूर 0.1 (427.9), मोताळा 1.8 (470.8), नांदूरा 0.6 (474.4), जिल्ह्यात दिवसभरात 3.6 तर यंदाच्या हंगामात आजवर 550.8 मि.मी. पाऊस झाला.

 

            यवतमाळ जिल्हा : यवतमाळ 7.2 (857.0), बाभूळगाव 25.6 (918.5), कळंब 30.7 (990.4), दारव्हा 12.2 (758.3), दिग्रस 36.1 (940.9), आर्णी 22.9 (1169.4), नेर 15.6 (815.9), पुसद 20.0 (685.7), उमरखेड 1.8 (771.4), महागाव 29.5 (966.9), वणी 0.7 (1158.1), मारेगाव 4.8 (1126.8), झरी जामणी 0.4 (1082.9), केळापूर 4.5 (1078.2), घाटंजी 0.5(993.5), राळेगाव 10.9 (1106.4), जिल्ह्यात 24 तासांत सरासरी 13.0 तर यंदाच्या हंगामात आजवर सरासरी 951.0 मि.मी. पाऊस झाला.

 

            वाशिम जिल्हा : वाशिम 8.5 (747.1), रिसोड 12.4 (717.9), मालेगाव 6.8 (811.8), मंगरूळपीर 24.3 (823.5), मानोरा 8.4 (832.5), कारंजा 6.1 (574.8), जिल्ह्यात 24 तासात 10.8 तर 1 जूनपासून आजवर 746.1   मि.मी. पाऊस झाला.

000000