सह्याद्री अतिथीगृह, मुंबई
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ उपक्रमाच्या लोगोचे अनावरण झाले. मृद व जलसंधारण विभागाच्यावतीने जलसंधारण दिनानिमित्त २१ ऑगस्ट रोजी या राज्यव्यापी उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्यासह मंत्रिमंडळातील अन्य सदस्य उपस्थित होते.
२१ ऑगस्ट रोजी राज्यभर जलसंधारण दिन, १५ ते २१ ऑगस्टदरम्यान जलसंधारण सप्ताह आणि १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत जलसंधारण अभियान राबविण्यात येणार आहे. यानिमित्त राज्यव्यापी ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’, जलसंधारणाची शपथ, युवकांसाठी लघुचित्रफीत स्पर्धा, शाळा-महाविद्यालयांमध्ये विविध स्पर्धा असे विविध उपक्रम होणार आहेत.
#जलसंधारणदिन
#जलसंधारणसप्ताह
#शाश्वतविकास
#महावॉकेथॉन


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा