सोमवार, ९ नोव्हेंबर, २०२०

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी दोन उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल

 

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी

दोन उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल

अमरावती, दि. 9 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज दोन उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले.

            आज विकास भास्करराव सावरकर (अपक्ष), प्रवीण ऊर्फ पांडुरंग नानाजी विधळे (अपक्ष)  यांनी निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र सादर केले.

00000

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज 6 नामनिर्देशन पत्राची उचल

 

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी

आज 6 नामनिर्देशन पत्राची उचल

अमरावती, दि. 9 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी 6 नामनिर्देशन पत्राची उचल करण्यात आली.

            आज अर्जाची उचल केलेल्यांमध्ये किरण रामराव नाईक, सतिश माधव काळे, डॉ. नितीन धांडे, रामदास गंगाराम इंगळे, भाऊराव सरकटे, डॉ. नितीन गणपत चवाळे यांचा समावेश आहे.

00000

शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २०२०

शेतकऱ्यांनी कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन करावे

 

शेतकऱ्यांनी कपाशीवरील गुलाबी

बोंडअळीचे व्यवस्थापन करावे

        अमरावती, दि. 6 : ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव 10 टक्क्यापर्यंत होता परंतू त्यात वाढ होऊन ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवाड्यात तो 15 ते 20 टक्के झाला. नोव्हेंबर महिन्यात वातावरण गुलाबी बोंडअळीच्या वाढीसाठी अत्यंत पोषक झाले आहे. त्यामुळे गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. नाकारता येत नाही. पिकाचे किडीपासून संरक्षणाकरीता विभागातील शेतकरी बांधवांनी उपाययोजना करण्यासाठी, असे डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला येथील किटकशास्त्रज्ञाच्या शेतकऱ्यांना उपाययोजना सांगीतल्या.

            प्रत्येक आठवड्यात 20 झाडे निवडून निवडलेल्या प्रत्येक झाडावरील मध्यम आकाराचे मध्यम पक्व झालेले बाहेरुन किडके नसलेले एक बोंड असे 20 बोंडे तोडून ते भुईमुंगाच्या शेंगाप्रमाणे दगडाने टिचवुन त्यामधील किडक बोंड व अळ्याची संख्या मोजून, ती दोन किडक बोंड किंवा पांढुरक्या रंगाच्या लहान अळ्या आढळल्यास आर्थिक नुकसान पातळी (5 ते 10 टक्के) समजून खालील सांगीतल्याप्रमाणे रासायनिक फवारणी करावी.

जेथे प्रादुर्भाव 5 ते 10 टक्क्यां दरम्यान आहे अशा ठिकाणी सायपरमेथ्रीन 10 टक्के ईसी 8 मि.ली किंवा  सायपरमेथ्रीन 25 ईसी 3.5 मि.ली. किंवा इंडोक्झाकार्ब 15.8 ईसी 10 मि.ली.  किंवा डेल्टामेथ्रीन 2.8 ईसी 12 मि.ली. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकता भासल्यास 15 दिवसांनी दुसरी फवारणी करावी.

जेथे प्रादुर्भाव 10 टक्केच्यावर आहे अशा ठिकाणी आवश्यकते अनुसार प्रादुर्भाव पुढे वाढू नये म्हणून खालील पैकी कोणत्याही एका मिश्र किटकनाशकाची 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ट्रायझोफॉस 35 टक्के+डेल्टामेथ्रीन 1 टक्के 17 मि.ली.  किंवा क्लोरोपायरीफॉस 50 टक्के+सायपरमेथ्रिन 5 टक्के 20 मि.ली. किंवा इंडोक्झकार्ब 14.5 टक्के+ॲसीटामिप्रीड 7.7 टक्के 10 दिवसांनी दुसरी फवारणी करावी, असे डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठातील किटकशास्त्र विभागाचे प्रमुख व कृषि सहसंचालक अमरावती विभाग यांनी कळविले आहे.

00000

शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारींची राज्यपालांना ग्रामीण भागांना भेट देण्याची विनंती

 


शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारींची

राज्यपालांना ग्रामीण भागांना भेट देण्याची विनंती 

        अमरावती, दि. 6 : कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची मुंबई येथील राजभवन येथे भेट घेतली. या भेटीत श्री. तिवारी यांनी राज्यपाल यांनी यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण भागाला भेट देण्याची विनंती केली.

          राज्यपाल यांनी विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर, पांढरकवडा, झरी जामनी आणि मारेगाव ग्रामीण भागात भेटीच्या कार्यक्रमासाठी वेळ द्यावा अशी विनंती श्री. तिवारी यांनी केली. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आणि आदिवासींचे प्रश्न आणि निर्माण झालेल्या अनुशेषाचा मुद्दा श्री. तिवारी यांनी एका सादरीकरण राज्यपाल यांना साद‍र केले.

आदिवासी आणि ग्रामीण भागाची स्थिती आणि जीवनशैली पाहून राज्यपाल यांना असलेल्या विशेष अधिकारांतर्गत उपाययोजना आखण्यात यावी, यासाठी श्री. तिवारींनी राज्यपाल यांची भेट घेतली. राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यातील मागासलेल्या भागातील समसमान संधी आणि खर्चासाठी समान रकमेचे वाटप निश्चित करण्यासाठी राज्यपालांना विशेष अधिकार प्राप्त आहेत. त्याचा वापर करणे क्रमप्राप्त असल्याचे तिवारी यांनी विशद केले. संपूर्ण राज्याच्या आवश्यकतांच्या अधीन असलेल्या तंत्रज्ञान शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण आणि राज्य सरकारच्या अखत्यारित असलेल्या सेवांमध्ये रोजगारासाठी पुरेशा संधी उपलब्ध करुन देण्यासाठी योग्य ती व्यवस्था करण्याचा घटनाप्रदत्त अधिकार राज्यपाल यांना असून या भागात राज्यपालांची भेट आदिवासी, शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या नैतिकतेला चालना देईल. तसेच होणाऱ्या दुर्दैवी घटना कमी होतील. त्यामुळे राज्यपाल यांनी या भागांना भेट देण्यासाठी वेळ द्यावा, यासाठी श्री. तिवारी यांनी राज्यपाल यांची भेट घेतली.

0000

 

 

 

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी दुसऱ्या 8 नामनिर्देशन पत्राची उचल

 

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी

दुसऱ्या 8 नामनिर्देशन पत्राची उचल

अमरावती, दि. 6 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी 8 नामनिर्देशन पत्राची उचल करण्यात आली.

            आज अर्जाची उचल केलेल्यांमध्ये तनवीर आलम सैयद मियाज अली, निशांत रविंद्र हरणे, प्रा. अरविंद माणिकराव तट्टे, प्रकाश बाबाराव काळबांडे, डॉ. मुस्ताक रहेमान शहा, सुनिल मोतीराम पवार, अविनाश मधुकर बोर्डे, विजय रामराव लुंगे यांचा समावेश आहे.

00000

 

 

गुरुवार, ५ नोव्हेंबर, २०२०

औद्योगिक सुरक्षा व आरोग्य कार्यालय नवसारी येथे स्थलांतरित

 

औद्योगिक सुरक्षा व आरोग्य कार्यालय

नवसारी येथे स्थलांतरित

        अमरावती, दि. 5 : अमरावती येथील उपसंचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, अमरावती कार्यालय विमको कॉम्प्लेक्स, गाडगेनगर, अमरावती येथून दि. 1 नोव्हेंबर 2020 पासून स्थलांतरित झाले असून या कार्यालयाचा नविन पत्ता उपसंचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, प्लॉट नं. 13 अ, निशीगंधा कॉलनी, जवाहर नगर, नवसारी, अमरावती  असा आहे, असे औद्योगिक सुरक्षा व आरोग्य अमरावतीचे उपसंचालक यांनी कळविले आहे.

00000

 

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज 19 नामनिर्देशन पत्राची उचल

 

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी

आज 19 नामनिर्देशन पत्राची उचल

अमरावती, दि. 5 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी 19 नामनिर्देशन पत्राची उचल करण्यात आली.

            आज अर्जाची उचल केलेल्यांमध्ये अनिल मधुकरराव काळे, प्रविण ऊर्फ पांडुरंग नानाजी विधळे, संगिता सचिंद्र शिंदे (बोंडे), राजकुमार श्रीराम बोनकीले, राजेंद्र तुळशिराम गुजरे, रमेश दत्तुजी चांदुरकर, नरेंद्र कौर, शेखर ऊर्फ चंद्रशेखर मनोहर भोयर, संजय वासुदेवराव आसोले, सुनिल नारायणराव जयसिंगपुरे, दिलीप आनंदराव निभोंरकर, अभिजीत मुरलीधर देशमुख, गणेश के. सानप, शरदचंद्र कृष्णराव हिंगे, विकास भास्करराव सावरकर, ॲड. राम बुरंगे, डॉ. संजय साळीवकर, डॉ. निलेश देशमुख, रविंद्र लाखोडे यांचा समावेश आहे.

00000

विलासनगर गोडाऊनची विभागीय आयुक्तांकडून पाहणी

 










विलासनगर गोडाऊनची विभागीय आयुक्तांकडून पाहणी

अमरावती, दि. 5 : शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी मतमोजणी केंद्र विलासनगर गोडाऊन येथे राहणार असून, मोजणी केंद्राच्या अनुषंगाने तिथे आवश्यक साधनसामग्री, मनुष्यबळ, सुरक्षितता उपाययोजना आदींची अंमलबजावणी करण्याचे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पीयुष सिंह यांनी आज येथे दिले.

शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने या जागेची पाहणी श्री. सिंह यांनी आज केली, त्यावेळी ते बोलत होते. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासह अनेक निवडणूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.    

मा. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतमोजणी केंद्रावर आवश्यक साधनसामग्री, मनुष्यबळ, सुरक्षिततेच्या दृष्टीने करावयाच्या सर्व उपाययोजना, आवश्यक सूचनाफलक आदी सर्व तजवीज ठेवावी. आयोगाच्या सर्व निर्देशांचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी श्री. सिंह यांनी दिले. गोडाऊनच्या सर्व परिसराची श्री. सिंह यांनी पाहणी करून सुरक्षिततेच्या दृष्टीने कडेकोट बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश दिले.

मतमोजणी तीन डिसेंबरला होणार आहे. या मतमोजणी केंद्रावर दोन हॉलमध्ये मोजणीची सुविधा असेल. एकूण 14 टेबल असतील. जिल्ह्यात 25 मतदान केंद्रे असून, एक डिसेंबरला मतदान होईल.

000000

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी विभागस्तरीय तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित

 

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी

विभागस्तरीय तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित

* आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी करता येणार तक्रार

अमरावती, दि. 5 : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. या निवडणुकीदरम्यान आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने कोणत्याही तक्रारीसाठी विभागस्तरीय तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या घोषित करण्यात आलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार आजपासून नामनिर्देशपत्र दाखल करण्यास सुरवात झाली आहे. त्यानुषंगाने अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात आचारसंहिता लागू झाली आहे. आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने कुठलीही तक्रार असल्यास अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातील मतदारांना आपली तक्रार विभागस्तरावरील तक्रार निवारण कक्षास करता येणार आहे. तक्रारदारांनी आपली तक्रार विभागीय आयुक्त कार्यालय, पहिला माळा, अमरावती, दुरध्वनी क्रमांक 0721-2661364 यावर संपर्क साधावा, असे आवाहन अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचा निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी केले आहे.

00000

बुधवार, ४ नोव्हेंबर, २०२०

दहावी, बारावीच्या खासगीरित्या परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यानी 28 नोव्हेंबरपर्यत अर्ज सादर करावे

 

 दहावी, बारावीच्या खासगीरित्या परिक्षा देणाऱ्या

विद्यार्थ्यानी 28 नोव्हेंबरपर्यत अर्ज सादर करावे

अमरावती, दि. 4 : शैक्षणिक सत्र 2021 मध्ये होणाऱ्या दहावी, बारावीच्या खासगीरित्या प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यानी नाव नोंदणी अर्ज (फॉर्म न. 10) 28 नोव्हेंबर पर्यत ऑनलाईन प्रक्रियेव्दारे सादर करावे अशी माहिती अमरावती विभागीय मंडळाचे विभागीय सहायक सचिव यांनी दिली. विद्यार्थ्यानी मुळ अर्ज, ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीच्या दोन छायाप्रती व मुळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संर्पक केंद्र शाळेत/ कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जमा करावे. विद्यार्थ्यानी शाळा सोडल्याचा दिनांक व दाखला दिल्याचा दिनांक याबाबत पात्रतेसाठी शाळा सोडल्याचा दिनांक ग्राहय धरण्यात येईल. विद्याथ्याने अर्ज भरण्याकरिता शाळा सोडल्याचा दाखला मूळ प्रत, नसल्यास व्दितीयप्रत व प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड, स्वत:चा पासपोर्ट आकारातील फोटो स्वत: जवळ ठेवावा. पात्र विद्यार्थ्यांना नोंदणी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी परिक्षेची आवेदपत्रे मंडळाने विहित केलेल्या कालावधीत परिक्षा शुल्कासह भरणे आवश्यक आहे. यांची नोंद विद्यार्थ्यानी घ्यावी   असे विभागीय राज्य मंडळाने कळविले आहे.

 ****