मंगळवार, ६ सप्टेंबर, २०२२

विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी

 

विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी

अमरावती दि.6 (विमाका) : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने दि. 6 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 7 वाजता दिलेल्या माहितीनुसार अमरावती प्रादेशिक विभागातील मोठ्या व मध्यमप्रकल्पांतील दैनिक जलाशय पातळी व पाणीसाठा अहवाल खालीलप्रमाणे.

विभागातील मोठ्या प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये)

अमरावती जिल्ह्यातील उर्ध्ववर्धा (342.32), यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्प (398.78), अरुणावती (330.64), बेंबळा (267.40), अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा (347.63), वान (407.82), बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा (291.58), पेनटाकळी (558.00), खडकपूर्णा (520.10).

मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये)

अमरावती जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी शहानूर (448.24), चंद्रभागा (505.40), पूर्णा (450.46), सपन (511.65), पंढरी (426.70), गर्गा (344.40), बोर्डीनाला (362.00),यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस (305.35), सायखेडा (272.50), गोकी (315.70), वाघाडी (318.60), बोरगांव (319.00), नवरगांव (254.10), अकोला जिल्ह्यातील  निर्गुणा (391.40), मोर्णा (366.97), उमा (344.00), घुंगशीबॅरेज (254.10), वाशिम जिल्ह्यातील अडाण (381.51), सोनल (451.90), एकबुर्जी (151.94), बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा (403.20), पलढग (403.20), मस (324.50), कोराडी (545.25), मन (374.20), तोरणा (405.70), उतावळी (370.50) आहे.   

000000

 

 

 

 

 

 

 

 

 

सोमवार, ५ सप्टेंबर, २०२२

पाण्याची समस्या सोडविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कामे करावीत - खासदार डॉ. अनिल बोंडे

 




पाण्याची समस्या सोडविण्यासाठी

सर्व विभागांनी समन्वयाने कामे करावीत

                                                         -  खासदार डॉ. अनिल बोंडे

अमरावती, दि.5 (विमाका):- मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई गावात उद्भवलेली पाण्याची समस्या तातडीने सोडविण्यात यावी. तसेच महापालिका राबवित असलेल्या अमृत पाणी पुरवठा योजनेअंतर्गत अमरावती-नेर पिंगळाई-मोर्शी मार्गावरील पाणीपुरवठा करणारी नादुरूस्त जलवाहिनी बदलविण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला असून त्याचा पाठपुरावा करण्यात यावा. यासंदर्भात महापालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाने समन्वयाने काम करण्याच्या सुचना खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात विविध विषयांचा आढावा त्यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर, कार्यकारी अभियंता श्री थोटांगे, शहर अभियंता रवी पवार, चेतन गावंडे आदी यावेळी उपस्थित होते.

भुयारी गटार योजनेला गती देण्यासाठी आवश्यक निधी मिळविण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात यावे.  रस्त्यावरील अपघातांना आळा  बसावा तसेच  नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यावरील गटारींना झाकणे लावावी. शहरात फेरीवाल्यांचे प्रमाण बघता त्यांच्यासाठी असलेल्या नियमांची माहिती, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी व राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात यावे. फेरीवाल्यांना गणवेश, ओळखपत्र देण्याबाबत व त्यांचा विमा उतरविण्याबाबतची संपुर्ण माहिती त्यांना देण्यासाठी शिबिरांचे आयोजन करण्यात यावे. अशा सुचना श्री बोंडे यांनी यावेळी केल्या. नेहरू मैदान, लाल शाळा, शहीद स्मारकाचे नुतनीकरण व सौंदर्यीकरणाबाबत प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात यावा. सिटी मोबॅलिटी योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या विकासकामांची माहिती श्री बोंडे यांनी यावेळी घेतली. वास्तुशिल्प अभियंता संजय राऊत यांनी सादरीकरण केले.

            तुषार भारतीय, किरण पातुरकर, चेतन गावंडे, सुरेखा लुंगारे, राधा कुरील, सुनिल काळे. रश्मी नावंदर, आदी यावेळी उपस्थित होते.

00000

अमरावती विभागात 15.2 मि.मी. पाऊस, आजपर्यत 723.5 मि.मी. पावसाची नोंद

 

अमरावती विभागात 15.2 मि.मी. पाऊस

आजपर्यत 723.5 मि.मी. पावसाची नोंद

अमरावती, दि. 5 (विमाका) : अमरावती विभागातील 56 तालुक्यात पावसाची नोंद करण्यात आली.  विभागात 723.5 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली.

                विभागीय आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिलेल्या ‘महावेध’च्या नोंदीनुसार आज दुपारी बारापर्यंत अमरावती विभागात सरासरी 15.2 मि.मी. पाऊस झाला. 1 जून ते आजपर्यंत 723.5 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.

              विभागात नोंदला गेलेला आजचा तालुकानिहाय पाऊस असा असून (कंसातील आकडेवारी यंदा 1 जूनपासून आजवर झालेल्या पावसाची आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात. ही माहिती ‘महावेध’च्या नोंदीनुसार दुपारी बारा वाजेपर्यंतची असून बदलत्या पर्जन्यमानानुसार त्यात बदल होऊ शकतात.)

            अमरावती जिल्हा : धारणी 20.0 (734.1), चिखलदरा 6.1 (1151.7), अमरावती 28.2 (652.7), भातकुली 14.5 (499.3), नांदगाव खंडेश्वर 40.8 (765.5), चांदूर रेल्वे 31.6 (702.4), तिवसा 31.5 (916.2),  मोर्शी 21.9 (773.5) वरूड 17.4 (1008.8), दर्यापूर 3.8 (480.4), अंजनगाव 3.6 (563.3), अचलपूर 9.4 (611.2), चांदूरबाजार 12.5 (805.3), धामणगाव रेल्वे 38.8 (889.7) अमरावती जिल्ह्यात चोवीस तासांत सरासरी 20.8 मि.मी. पाऊस झाला. जिल्ह्यात यंदा आजवर सरासरी 739.5 मि.मी. पाऊस झाला.

अकोला जिल्हा : अकोट 5.4 (425.3), तेल्हारा 6.3 (560.1), बाळापूर 8.2 (626.4), पातूर 9.3 (546.9),  अकोला 4.4 (587.4), बार्शी टाकळी 1.3 (516.6), मुर्तिजापूर 9.9 (483.1), जिल्ह्यात 24 तासांत सरासरी 6.2 मि.मि. तर आजवर 536.3 मि.मी. पाऊस झाला आहे.

            बुलडाणा जिल्हा : जळगाव जामोद 7.6 (393.8), संग्रामपूर 14.1 (516.4), चिखली 13.0 (577.6), बुलडाणा 11.1 (750.9), देऊळगाव राजा 21.6 (583.0), मेहकर 15.6 (628.5), सिंदखेड राजा 19.2 (651.6), लोणार 11.9 (522.0), खामगाव 19.4 (488.0), शेगाव 8.1 (514.1), मलकापूर 32.2 (427.8), मोताळा 16.7 (469.0), नांदूरा 12.5 (473.8), जिल्ह्यात दिवसभरात 15.6 तर यंदाच्या हंगामात आजवर 547.6 मि.मी. पाऊस झाला.

            यवतमाळ जिल्हा : यवतमाळ 17.3 (849.8), बाभूळगाव 34.4(892.9), कळंब 11.6 (959.7), दारव्हा 44.1 (746.1), दिग्रस 31.4 (904.8), आर्णी 21.8 (1146.5), नेर 29.1 (800.3), पुसद 13.6 (665.7), उमरखेड 7.9 (769.6), महागाव 31.7 (937.4), वणी 1.1 (1157.4), मारेगाव 3.4 (1122.0), झरी जामणी 0.6 (1082.5), केळापूर 1.3 (1073.7), घाटंजी 1.1 (992.9), राळेगाव 5.5 (1095.5), जिल्ह्यात 24 तासांत सरासरी 15.3 तर यंदाच्या हंगामात आजवर सरासरी 938.0 मि.मी. पाऊस झालाआहे.

            वाशिम जिल्हा : वाशिम 3.7 (738.6), रिसोड 6.2 (706.5), मालेगाव 8.7 (804.7), मंगरूळपीर 12.3 (799.1), मानोरा 23.6 (824.1), कारंजा 29.4 (568.7),  जिल्ह्यात 24 तासात 13.4 तर 1 जूनपासून आजवर 735.4  मि.मी.पाऊस झाला.

000000

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षकांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 



गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षकांच्या

समस्या प्राधान्याने सोडविणार

-          मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

अमरावती, दि.5 (विमाका):- व्यक्ती आणि समाजाच्या विकासात शिक्षकांचा वाटा मोलाचा आहे. नवनवीन प्रयोग, प्रात्यक्षिके, अभिनव कल्पनांच्या माध्यमातून शिक्षक विद्यार्थ्यांचे जीवन घडवित असतो. हे शिक्षण अधिक आनंददायी, दर्जेदार व गुणवत्तापूर्ण होण्यासाठी शिक्षकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील. तसेच नवीन शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीतून शाळांचा दर्जा वाढविण्यावर भर देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले.

शिक्षकदिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून जिल्ह्यातील शिक्षकांशी संवाद साधला. मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, शिक्षण उपसंचालक शिवलिंग पटवे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रफुल्ल कचवे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रिया देशमुख, उपशिक्षणाधिकारी बुद्धभूषण सोनवणे आदी उपस्थित होते.

प्राथमिक शिक्षिका जयश्री गुल्हाने मुख्यमंत्र्यांशी संवाद साधतांना म्हणाल्या, रोजगारासाठी पालकांचे स्थलांतर होत असल्यामुळे शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती नियमित राहत नाही. त्यांच्या अभ्यासात खंड पडतो. पालकांच्या स्थलांतर काळात विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करू शकत नाही. याचा परिणाम म्हणजे विद्यार्थी शाळेपासून दुरावतात. या समस्येवर कायमस्वरुपी उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील मेळघाटसारख्या आदिवासी क्षेत्रातील शाळांमध्ये शिक्षक भरती करतांना स्थानिक बोलीभाषेतील प्रशिक्षित - अप्रशिक्षित तरुणांना संधी देण्यात यावी असे त्यांनी सुचविले.

अतुल ठाकरे यांनी गणित व विज्ञान विषयासाठी शिक्षक भरती करण्याबाबत सुचविले. गणित व विज्ञान विषयांबाबत विद्यार्थ्यांमध्ये उदासीनता राहु नये. कुतूहुल निर्माण करत,  शिकवितांना रोचक पद्धतीचा  अवलंब करून  विद्यार्थ्यांमध्ये या विषयांची आवड निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी वाचनालये, अद्ययावत प्रयोगशाळा, दर्जेदार शैक्षणिक साहित्याची उपलब्धता असावी असे श्री ठाकरे यांनी सांगितले.

शिक्षकांनी आजच्या संवादात उपस्थित केलेले प्रश्न सोडविण्याबाबत आपण प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले.

            शाळांच्या विकासासाठी विशेषतः सरकारी शाळांच्या सक्षमीकरणासाठी अनेक धोरणात्मक निर्णय शासनाने घेतले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पूर्व प्राथमिक शिक्षण आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्याचा प्रयत्न असून, नवीन शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षणावर ६ टक्के खर्च करण्याचे  नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षणामध्ये गळतीचे प्रमाण, शिक्षकांच्या मूल्यमापनाची प्रक्रिया या सर्वच बाबींचा नवीन शैक्षणिक धोरणात  समावेश  करण्यात येईल. शिक्षण घेण्यास पोषक वातावरण या माध्यमातून निर्माण करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

            पालकांचा व समाजाचा सरकारी शाळांवरचा विश्वास वाढला आहे. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली नवे प्रयोग विद्यार्थी करु लागले आहेत. शिक्षक, विद्यार्थी आणि समाज यांच्यातील सुसंवादाने शिक्षण अधिक आनंददायी होऊ लागले आहे, असे त्यांनी यावेळी सागितले.

निदा उर्दू हायस्कूलचे सुफी मजहर अली, मनीबाई गुजराती हायस्कूलच्या अंजली देव, न्यू हायस्कूलचे सहायक शिक्षक संजय रामावत, संत कंवरराम हायस्कूलच्या मंजू अडवाणी, मंगरुळ चवाळा, घटांग, सैदापूर, भिलखेडा, जैतादेवी येथील जिल्हा परिषदेचे सहायक शिक्षक वैजनाथ इप्पर, प्रकाश लिंगोट, गणेश जामुनकर आदी यावेळी उपस्थित होते.

00000

 

विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी

 

विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी

अमरावती दि.5 (विमाका) : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने दि. 5 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 7 वाजता दिलेल्या माहितीनुसार अमरावती प्रादेशिक विभागातील मोठ्या व मध्यमप्रकल्पांतील दैनिक जलाशय पातळी व पाणीसाठा अहवाल खालीलप्रमाणे.

विभागातील मोठ्या प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये)

अमरावती जिल्ह्यातील उर्ध्ववर्धा (342.25), यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्प (398.78), अरुणावती (330.42), बेंबळा (267.20), अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा (347.66), वान (407.72), बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा (291.51), पेनटाकळी (557.95), खडकपूर्णा (520.21).

मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये)

अमरावती जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी शहानूर (448.18), चंद्रभागा (505.30), पूर्णा (450.39), सपन (511.45), पंढरी (426.70), गर्गा (344.40), बोर्डीनाला (362.00),यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस (305.26), सायखेडा (272.50), गोकी (315.70), वाघाडी (318.60), बोरगांव (319.00), नवरगांव (254.10), अकोला जिल्ह्यातील  निर्गुणा (391.40), मोर्णा (366.97), उमा (344.00), घुंगशीबॅरेज (254.40), वाशिम जिल्ह्यातील अडाण (381.51), सोनल (451.90), एकबुर्जी (151.94), बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा (403.20), पलढग (403.20), मस (324.50), कोराडी (545.25), मन (374.10), तोरणा (405.65), उतावळी (370.50) आहे.   

000000

 

 

 

 

 

रविवार, ४ सप्टेंबर, २०२२

अमरावती विभागात 12.5 मि.मी. पाऊस आजपर्यत 708 मि.मी. पावसाची नोंद

 

अमरावती विभागात 12.5 मि.मी. पाऊस

आजपर्यत 708 मि.मी. पावसाची नोंद

अमरावती, दि. 4 (विमाका) : अमरावती विभागातील 56 तालुक्यांपैकी अकोला जिल्ह्यातील अकोट, पातूर, बार्शि टाकळी, मुर्तिजापूर व बुलडाणा जिल्ह्यातील  जळगांव जामोद, चिखली, व देऊळगांव राजा, मलकापूर , नांदुरा तालुके वगळता इतर तालुक्यात पावसाची नोंद करण्यात आली.  विभागात 708.4 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली.

 

                विभागीय आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिलेल्या ‘महावेध’च्या नोंदीनुसार आज दुपारी बारापर्यंत अमरावती विभागात सरासरी 12.5 मि.मी. पाऊस झाला. 1 जून ते आजपर्यंत 708.4 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.

              विभागात नोंदला गेलेला आजचा तालुकानिहाय पाऊस असा असून (कंसातील आकडेवारी यंदा 1 जूनपासून आजवर झालेल्या पावसाची आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात. ही माहिती ‘महावेध’च्या नोंदीनुसार दुपारी बारा वाजेपर्यंतची असून बदलत्या पर्जन्यमानानुसार त्यात बदल होऊ शकतात.)

 

 अमरावती जिल्हा : धारणी 5.5 (714.1), चिखलदरा 0.1 (1145.6), अमरावती 0.5 (624.5), भातकूली 4.7 (484.8), नांदगाव खंडेश्वर 3.8 (724.7), चांदूर रेल्वे 5.2 (670.8), तिवसा 27.5 (884.7),  मोर्शी 13.3 (751.6) वरूड 2.1 (991.4), दर्यापूर 0.9 (476.6), अंजनगाव 0.4 (559.7), अचलपूर 8.2 (601.8), चांदूरबाजार 10.3 (792.8), धामणगाव रेल्वे 11.3 (850.9) अमरावती जिल्ह्यात चोवीस तासांत सरासरी 6.4 मि.मी. पाऊस झाला. जिल्ह्यात यंदा आजवर सरासरी 719.0 मि.मी. पाऊस झाला.

 

 अकोला जिल्हा : अकोट 0.0 (419.9), तेल्हारा 2.9 (553.8), बाळापूर 2.4 (618.2), पातूर 0.0 (537.6),  अकोला 5.8 (583.0), बार्शी टाकळी 0.0 (515.3), मुर्तिजापूर 0.0 (473.2), जिल्ह्यात 24 तासांत सरासरी 2.0 मि.मि. तर आजवर 530.1 मि.मी. पाऊस झाला आहे.

 

 बुलडाणा जिल्हा : जळगाव जामोद 0.0 (386.0), संग्रामपूर 0.1 (502.3), चिखली 0.0 (565.6), बुलडाणा 2.6 (739.3), देऊळगाव राजा 0.0 (563.9), मेहकर 12.4 (612.9), सिंदखेड राजा 2.6 (632.4), लोणार 10.7 (511.3), खामगाव 0.7 (468.7), शेगाव 0.4 (507.1), मलकापूर 0.0 (395.4), मोताळा 1.3 (452.3), नांदूरा 0.0 (461.1), जिल्ह्यात दिवसभरात 2.7 तर यंदाच्या हंगामात आजवर 532.4 मि.मी. पाऊस झाला.

 

 यवतमाळ जिल्हा : यवतमाळ 10.1 (832.5), बाभूळगाव 16.2 (854.1), कळंब 14.2 (948.1), दारव्हा 32.9 (702.0), दिग्रस 34.7 (873.4), आर्णी 59.5 (1124.7), नेर 16.3 (771.2), पुसद 16.9 (652.1), उमरखेड 12.9 (761.7), महागाव 60.9 (905.7), वणी 59.8 (1156.3), मारेगाव 45.2 (1118.6), झरीजामणी 60.9 (1081.9), केळापूर 38.6 (1072.4), घाटंजी 61.6 (991.8), राळेगाव 13.8 (1090.0), जिल्ह्यात 24 तासांत सरासरी 33.5 तर यंदाच्या हंगामात आजवर सरासरी 922.6 मि.मी. पाऊस झालाआहे.

 

 वाशिम जिल्हा : वाशिम 1.0 (737.7), रिसोड 6.5 (699.1), मालेगाव 6.2 (797.0), मंगरूळपीर 3.5 (786.7), मानोरा 11.9 (800.5), कारंजा 2.6 (539.4),  जिल्ह्यात 24 तासात 4.9 तर 1 जूनपासून आजवर 722.5  मि.मी.पाऊस झाला.

000000

विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी

 

विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी

अमरावती दि.4 (विमाका) : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने दि. 4 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 7 वाजता दिलेल्या माहितीनुसार अमरावती प्रादेशिक विभागातील मोठ्या व मध्यमप्रकल्पांतील दैनिक जलाशय पातळी व पाणीसाठा अहवाल खालीलप्रमाणे.

विभागातील मोठ्या प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये)

अमरावती जिल्ह्यातील उर्ध्ववर्धा (342.25), यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्प (398.78), अरुणावती (330.33), बेंबळा (266.95), अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा (347.68), वान (407.59), बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा (291.44), पेनटाकळी (557.90), खडकपूर्णा (520.15).

मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये)

अमरावती जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी शहानूर (448.00), चंद्रभागा (505.15), पूर्णा (450.33), सपन (511.30), पंढरी (426.70), गर्गा (344.40), बोर्डीनाला (362.00),यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस (305.18), सायखेडा (272.50), गोकी (315.70), वाघाडी (318.60), बोरगांव (319.00), नवरगांव (254.10), अकोला जिल्ह्यातील  निर्गुणा (391.40), मोर्णा (366.97), उमा (344.00), घुंगशीबॅरेज (254.00), वाशिम जिल्ह्यातील अडाण (381.44), सोनल (451.90), एकबुर्जी (151.94), बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा (403.20), पलढग (403.20), मस (324.50), कोराडी (545.25), मन (374.00), तोरणा (405.55), उतावळी (370.50) आहे.   

000000

 

 

 

शुक्रवार, २ सप्टेंबर, २०२२

अमरावती विभागात 8.9 मि.मी. पाऊस, आजपर्यत 694.4 मि.मी. पावसाची नोंद

                      अमरावती विभागात 8.9 मि.मी. पाऊस

आजपर्यत 694.4 मि.मी. पावसाची नोंद

अमरावती, दि. 2 (विमाका) : अमरावती विभागातील 56 तालुक्यांपैकी अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी व यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस, आर्णी व झरीजामणी  तालुके वगळता इतर तालुक्यात पावसाची नोंद करण्यात आली.  विभागात 694.4 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली.

 

                विभागीय आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिलेल्या ‘महावेध’च्या नोंदीनुसार आज दुपारी बारापर्यंत अमरावती विभागात सरासरी 8.9 मि.मी. पाऊस झाला. 1 जून ते आजपर्यंत 694.4 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.

              विभागात नोंदला गेलेला आजचा तालुकानिहाय पाऊस असा असून (कंसातील आकडेवारी यंदा 1 जूनपासून आजवर झालेल्या पावसाची आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात. ही माहिती ‘महावेध’च्या नोंदीनुसार दुपारी बारा वाजेपर्यंतची असून बदलत्या पर्जन्यमानानुसार त्यात बदल होऊ शकतात.)

 

            अमरावती जिल्हा : धारणी 15.0 (709.2), चिखलदरा 0.3 (1144.1), अमरावती 1.9 (622.8), भातकूली 1.2 (480.1), नांदगाव खंडेश्वर 14.6 (720.9), चांदूर रेल्वे 31.0 (664.2), तिवसा 21.9 (857.2),  मोर्शी 1.4 (738.3) वरूड 0.3 (989.3), दर्यापूर 2.5 (473.7), अंजनगाव 0.2 (558.5), अचलपूर 0.3 (593.6), चांदूरबाजार 0.6 (782.5), धामणगाव रेल्वे 22.0 (839.6) अमरावती जिल्ह्यात चोवीस तासांत सरासरी 7.5 मि.मी. पाऊस झाला. जिल्ह्यात यंदा आजवर सरासरी 712.1 मि.मी. पाऊस झाला.

 

            अकोला जिल्हा : अकोट 6.1 (419.9), तेल्हारा 24.2 (548.0), बाळापूर 5.1 (614.7), पातूर 7.0 (535.1),  अकोला 2.6 (577.2), बार्शी टाकळी 0.0 (515.3), मुर्तिजापूर 0.3 (473.2), जिल्ह्यात 24 तासांत सरासरी 5.7 मि.मि. तर आजवर 527.4 मि.मी. पाऊस झाला आहे.

 

            बुलडाणा जिल्हा : जळगाव जामोद 8.9 (386.0), संग्रामपूर 8.9 (502.0), चिखली 16.9 (554.0), बुलडाणा 54.7 (726.5), देऊळगाव राजा 12.2 (564.7), मेहकर 3.3 (595.6), सिंदखेड राजा 8.3 (629.8), लोणार 1.3 (501.6), खामगाव 22.2 (466.4), शेगाव 22.9 (506.7), मलकापूर 7.8 (395.8), मोताळा 26.4 (447.6), नांदूरा 28.4 (460.9), जिल्ह्यात दिवसभरात 17.5 तर यंदाच्या हंगामात आजवर 526.6 मि.मी. पाऊस झाला.

 

            यवतमाळ जिल्हा : यवतमाळ 5.9 (823.2), बाभूळगाव 8.5 (845.2), कळंब 9.7 (934.0), दारव्हा 9.2 (666.2), दिग्रस 0.0 (838.7), आर्णी 0.0 (1065.1), नेर 33.5 (754.8), पुसद 1.6 (635.2), उमरखेड 0.5 (748.6), महागाव 0.7 (843.0), वणी 6.6 (1096.5), मारेगाव 4.8 (1072.5), झरीजामणी 0.0 (1021.2), केळापूर 10.1 (1033.3), घाटंजी 12.6 (932.7), राळेगाव 11.9 (1074.9), जिल्ह्यात 24 तासांत सरासरी 7.0 तर यंदाच्या हंगामात आजवर सरासरी 889.1 मि.मी. पाऊस झाला आहे.

 

            वाशिम जिल्हा : वाशिम 6.3 (732.7), रिसोड 2.9 (692.4), मालेगाव 2.4 (782.7), मंगरूळपीर 6.1 (774.4), मानोरा 0.8 (788.6), कारंजा 0.7 (536.6),  जिल्ह्यात 24 तासात 3.3 तर 1 जूनपासून आजवर 714.0  मि.मी.पाऊस झाला.

000000

जिल्‍ह्यात कलम 144 लागू

 जिल्‍ह्यात कलम 144 लागू

 

अमरावतीदि. 2 (विमाका): जिल्ह्यात गणेशोत्सवास सुरूवात झाली असुन 26 सप्टेंबर पासुन नवरात्री उत्सव, 5 ऑक्टोबर रोजी दसरा व 9 ऑक्टोबर रोजी ईद निमित्त सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम, देखावे, शोभायात्रांचे आयोजन केले जाते. उत्सवाच्या या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी जिल्ह्यात 3 सप्टेंबर ते 12 ऑक्टोबर पर्यंत कलम 144 लागु केले आहे. सण उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरीता प्रतिबंधित आदेश लागु करण्यात येत असल्याचे डॉ. सिंह यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी

 

विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी

अमरावती दि.2 (विमाका) : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने दि. 2 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 7 वाजता दिलेल्या माहितीनुसार अमरावती प्रादेशिक विभागातील मोठ्या व मध्यमप्रकल्पांतील दैनिक जलाशय पातळी व पाणीसाठा अहवाल खालीलप्रमाणे.

विभागातील मोठ्या प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये)

अमरावती जिल्ह्यातील उर्ध्ववर्धा (342.19), यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्प (398.78), अरुणावती (330.28), बेंबळा (266.85), अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा (347.61), वान (407.44), बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा (291.40), पेनटाकळी (557.45), खडकपूर्णा (520.30).

मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये)

अमरावती जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी शहानूर (447.88), चंद्रभागा (505.00), पूर्णा (450.22), सपन (511.00), पंढरी (426.70), गर्गा (344.40), बोर्डीनाला (362.00),यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस (305.15), सायखेडा (272.50), गोकी (315.70), वाघाडी (318.60), बोरगांव (319.00), नवरगांव (254.10), अकोला जिल्ह्यातील  निर्गुणा (391.40), मोर्णा (366.97), उमा (344.00), घुंगशीबॅरेज (254.10), वाशिम जिल्ह्यातील अडाण (381.25), सोनल (451.90), एकबुर्जी (151.94), बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा (403.00), पलढग (403.20), मस (324.50), कोराडी (545.25), मन (374.00), तोरणा (405.45), उतावळी (370.50) आहे.   

000000