इकोफ्रेंडली गणेशमूर्त्यांची विक्री
Ø
सिपना महाविद्यालयाचा इकोफ्रेंडली
उपक्रम
अमरावती,
दि. 10 : पर्यावरण पुरक इकोफ्रेंडली
गणेशमुर्त्यांची निमिर्ती व विक्री करण्याचा उपक्रम सिपना महाविद्यालयाच्या एमबीए
विद्यार्थ्यांनी सुरु केला आहे. सिपना कॉलेजच्या परिसरातच उभारण्यात आलेल्या
स्टॉल्समध्ये गणेश मुर्त्यांची विक्री सुरु आहे. या उपक्रमास नागरिकांची उत्सर्फुत
प्रतिसाद मिळत आहे.
आपली
संस्कृती पर्यावरण पुरक असून उत्सवाचे मुळ उद्देश बाजूला सारुन त्याला बीभत्स रुप
देणे आपले संस्कार नाही. कुठल्याही कार्याची सुरुवात आपण गणपती पुजनाने करतो. गणेशोत्सव
पर्यावरणपूरक करुन यावर्षी सर्वांनी मातीच्या मुर्तीचा अग्रह धरावा. नैसर्गिक मातीचे
मुर्ती तयार करावी, थर्माकोल वापरु नये. मंडळांनी खूप मोठ्या मूर्तीचा आग्रह करु
नये. समाजप्रबोधन होईल व संस्कृतीपूरक कार्यक्रम करावे.
उत्सव पर्यावरणपूरक
करण्याचा संकल्प करु. सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून अमरावती शहरात समाजपयोगी व
पर्यावरणसंवर्धक उपक्रम राबविण्यात सिपना महाविद्यालय अग्रेसर आहे. नागरिकांनी प्रामुख्याने
वृक्षदान, वृक्षारोपण, वृक्षदिंडी, औषधी वनस्पतीचे संवर्धन, प्लास्टिक निर्मूलन,
निर्माल्यापासून गांडूळखत याद्वारे सामाजिक जागृतीचे कार्य उत्सवाच्या
कार्यक्रमातून पार पाडावे.
शहराच्या
नामांकीत सिपना कॉलेजच्या एमबीए शाखेच्या विद्यार्थ्यांनी, प्राध्यापक तसेच
कॉलेजच्या कर्मचारी, विभागप्रमुख ढवले सर, शिक्षकवृंद आदींनी अथक परिश्रम घेऊन इकोफ्रेंडली
मुर्ती तयार करुन विक्री करण्याचा उपक्रम राबवित आहे.
नागरिकांनी
मातीच्या गणेश मुर्तींची स्थापना करावी. तसेच तुळशीचे झाडसुध्दा वितरीत करण्यात
येत आहे. दिनांक 5 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर पर्यंत शहरात कॉलेजमार्फत विविध ठिकाणी
स्टॉल लावण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी नागरिकांनी सौरव तिडके (7769947712),
सिध्दार्थ मैलमट्टी (8830694261), पियुष डहाळे (8007047335)यांच्याशी संपर्क
साधावे असे, उपक्रम प्रमुखाव्दारे आवाहन करण्यात येत आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा