गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी क्रॉपसॅप योजना प्रभावी
अमरावती, दि. 6 : गुलाबी
बोंड अळीच्या नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना संदर्भात अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख
कृषि विद्यापीठात एक दिवशीय कार्यशाळा मंगळवार, 3 सप्टेंबर रोजी घेण्यात आली. या
कार्यशाळेला कृषी शिक्षण परिषदेचे उपाध्यक्ष तथा खासदार संजय धोत्रे, डॉ. पंजाबराव
कृषि विद्यापीठाचे कुलगुरु विलास भाले, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे, कृषि
विद्यापीठाचे व कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ तसेच विभागातील सर्व जिल्हा
अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी आदी उपस्थित
होते.
या कार्यशाळेत विभाग प्रमुख किटक शास्त्रज्ञ डॉ. उंदिरवाडे यांनी
क्रॉपसॅप योजनाची सुरुवात कापूस बोंड अळीच्या आपल्या विभागात 2 वर्षांपासून होत
असलेला उद्रेक याविषयी प्रास्ताविकातून माहिती दिली. अमरावती विभागातील प्रमुख
पिके सोयाबीन, कापूस व तूर रब्बी हंगामामध्ये हरभरा पिकांचे सर्वेक्षण क्रॉपसॅप
मार्फत केले जाते व त्यावर आढळणाऱ्या किडीचे नियंत्रणासाठी विद्यापीठामार्फत सल्ला
शेतकऱ्यांना दिला जातो, असे त्यांनी सांगितले.
कार्यशाळेत अकोला जिल्ह्यासह अमरावती विभागाचे सादरीकरण करण्यात
आले. कापूसपिकांवर बोंड अळी येऊ नये म्हणून हंगामाच्या सुरुवातीपासून तसेच
हंगामाच्या अगोदर काळजी घेण्याबाबत शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन कृषि
विभागामार्फत करण्यात येते.
खासदार श्री. धोत्रे मागदर्शन करतांना म्हणाले की, कृषि विभागामार्फत
देण्यात येणारे प्रशिक्षण, शेतकऱ्यांना पुरवठा केलेले किटकनाशके, व फॅरोमन ट्रप्स आदी
चांगल्या बाबी असून सुरवातीपासूनच बोंड अळीचे नियंत्रण केल्यास शेतकऱ्यांचे कापूस
पिकाच्या उत्पादनात निश्चितच वाढ होईल अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.
विद्यापीठामार्फत लाल बोंड अळीच्या नियंत्रणासाठी कृषि महाविद्यालयाच्या
रावेचे विद्यार्थ्याच्या सहभाग असून ते सर्वेक्षण करीत असल्याची माहिती देण्यात
आली. तसेच विद्यापीठाचे शास्त्रज्ञाचा सहभाग तथा सनियंत्रण प्रभाविपणे होण्याकरीता
तालुका निहाय शास्त्रज्ञांची नेमणूक करण्यात आल्या असल्याचे सांगितले. सर्व
शास्त्रज्ञ, तालुका कृषि अधिकारी व कृषि विभाग यांचे समन्वयाने बोंड अळीचे
नियंत्रण करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
कार्यशाळा घेण्याकरीता अकोल्याचे जिल्हा कृषि अधिकारी अकोला
राजेंद्र निकम, किटकशास्त्रज्ञ विभाग प्रमुख श्री. उंदिरवाडे यांनी सहकार्य केले.
****
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा