आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांची
मिशन एवरेस्ट
करीता निवड
अमरावती, दि. 7 : आदिवासी
विकास विभाग अमरावती अंतर्गत असलेल्या आदिवासी आश्रमशाळेचे 12 विद्यार्थ्यांची
मिशन माउंट एवरेस्ट करीता निवड करण्यात आली आहे. या विभागातील 50 विद्यार्थ्यांची
वर्धा व हैद्राबाद येथे शारीरिक क्षमता कसोटी पार पाडल्यानंतर धारणी प्रकल्पातील
9, अकोला प्रकल्पातील 2 आणि पांढरकवडा प्रकल्पामधील 1 असे एकुण 12 विद्यार्थ्यांची
अंतिम निवड “शौर्य-2” अंतर्गत मिशन एवरेस्ट करीता निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना
दार्जीलिंग येथे 1 महीन्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
या विद्यार्थ्यांना अपर आयुक्त श्री. गिरीष सरोदे, प्रविण इंगळे
उपायुक्त, गजानन गणबावले सहायक आयुक्त, विजय पांडे, सहायक प्रकल्प अधिकारी, मनोहर
उके, सहायक प्रकल्प अधिकारी, माळकर, संजय सुरडकर, दत्ताआडे, विलास भरती व आर. डी.
शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा