सुधारीत
बिगर मागास विद्यार्थ्यांकरीता
निर्वाह भत्ता योजनेसाठी अर्ज आमंत्रित
Ø आवेदन अर्ज सादर करावयाची अंतीम मूदत 15 सप्टेंबर
अमरावती,
दि. 7 : राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या 13 जुलै 2018 च्या शासन
निर्णयानुसार अमरावती येथे डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजने
अंतर्गत वसतीगृह सुरु करण्यात येत आहे.
सदर वसतीगृहात राज्यात
व्यावसायिक, बिगर व्यावसायिक अभ्याक्रमामध्ये प्रवेश घेणारे ज्या विद्यार्थी,
विद्यार्थीनीचे पालक अल्पभूधारक शेतकरी किंवा नोंदणीकृत मजूर किंवा ज्या
विद्यार्थी, विद्यार्थीनीचे पालकांचे उत्पन्न रु 8 लाखापेक्षा कमी आहे. अशा ‘बिगर मागास’ विद्यार्थी, विद्यार्थीनीना
प्रेवश घेता येईल.
शैक्षणिक वर्ष 2018-19
मधील प्रवेशीत इच्छूक विद्यार्थी-विद्यार्थीनी दिनांक 15 सप्टेंबर 2018 पर्यंत
प्राचार्य शासकीय तंत्रनिकेतन, अमरावती येथे विहीत नमुन्यात आवश्यक कागदपत्रासह
अर्ज सादर करावे. सदर अर्जाचा विहीत नमुना तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, अमरावती
यांचे वेबसाईट www.jdroamt.org वर तसेच शासकीय तंत्रनिकेतन, अमरावती येथे
कार्यालयात उपलब्ध असल्याचे प्राचार्य डॉ. आर.पी. मोगरे यांनी एका प्रसिध्दी
पत्रकाव्दारे कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा