नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा
अमरावती, दि. 21 : अमरावती चांदूर रेल्वे रस्ता राज्य मार्ग क्र.297 ते अंध विद्यालयापर्यंतचे काँक्रीट रस्त्याचे बांधकाम टप्प्या-टप्प्या मध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती मार्फत प्रगतीपथावर आहे. सद्यस्थितीत पोलीस मुख्यालय कार्यालयापासून सुंदरलाल चौकापर्यंत डाव्या बाजुने काँक्रीट रस्ता बांधकाम सुरु करावयाचे आहे. तरी ह्या लांबीमध्ये डाव्या बाजुने वाहतूक बंद राहणार आहे व विद्याभारती महाविद्यालयाकडे जाणारा रस्ता सुध्दा बंद राहणार आहे, तसेच उजव्या बाजुने वाहतूक सुरु राहणार आहे. तशी या विभागास पोलीस खात्याकडून दिनांक 18 ऑक्टोबर 2018 पर्यंत रस्ता बंद करण्याची परवानगी प्राप्त आहे.
तरी नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करुन सहकार्य करावे, असे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती यांनी कळविले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा