कृषि खत विक्रेत्यांसाठी
एक वर्षीय पदविका प्रशिक्षण
अमरावती,
दि. 17:- अमरावती जिल्ह्यातील कृषि खत विक्रेत्यांसाठी एक वर्ष कालावधीचा (आठ्वड्यातुन 1 दिवस)
प्रशिक्षण वर्ग, श्री शिवाजी कृषि महाविद्यालय अमरावती यांच्यामार्फत चालविण्यात
येणार आहे. इच्छूक उमेद्वारांनी तात्काळ संपर्क साधण्याचे आत्मामार्फत आवाहन
करण्यात आले आहे.
इयत्या
10 वी उत्तीर्ण व कृषि खत विक्रीचा परवाना या पदविका प्रशिक्षणासाठी पात्रता आहे.
इयत्या 10 वी किंवा 12 वी पास प्रमाणपत्र व गुणपत्रक, आधार कार्ड, चार पासपोर्ट
साईज फोटो, कृषि खत विक्रीचा परवाना इ.आवश्यक कागदपत्रे प्रवेश घेण्यासाठी
उमेदवारांनी सादर करणे बंधनकारक आहे. प्रवेश क्षमता 40 असून 20 हजार रुपये प्रवेश
शुल्क आकारण्यात आले आहे.
प्रकल्प
संचालक आत्मा कार्यालय विसावा कॉलनी, जुना बायपास रोड, अमरावती या ठिकाणी प्रेवश
अर्ज मिळणार असून त्याच ठिकाणी अर्ज स्वीकारले जाईल. संपर्कासाठी 0271- 2660012 दूरध्वनी
क्रमांक असा आहे. तसेच या संदर्भात पुढीलप्रमाणे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
प्रवेश
अर्ज वाटप व भरलेले छायांकित कागदपत्रासह परीपूर्ण अर्ज दि. 24 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर 2018 पर्यंत कार्यालयान वेळेत सकाळी
11 ते 5.00 स्वीकारले जातील. चाळीस
उमेद्वारांची प्रवेश यादी व प्रतीक्षा यादी 27 सप्टेंबर, रोजी जाहीर करण्यात येईल.
व याच दिवशी मुळ कागदपत्र तपासणी करण्यात येईल दि. 28 सप्टेंबर रोजी अंतीम
प्रवेशीत उमेदवारांनी वीस हजार रुपये रकमेचा राष्ट्रीकृत बँकेचा डीमाड डॉफ्ट
प्रकल्प संचालक, आत्मा अमरावती यांचे काढून प्रवेश निश्चित करणे आवश्यक राहील.
प्रवेश अर्ज दोन प्रतीत भरणे आवश्यक असून http://www.manage.gov.in या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध करुन देण्यात आले
आहे. अर्ज दोन प्रतीत भरुन सादर करणे आवश्यक आहे, असे प्रकल्प उपसंचालक कृषि
तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ( आत्मा),अमरावती यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे
कळविले आहे.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा