सुपरस्पेशालीटी हॉस्पीटलात
पोषण-आहार सप्ताह निमित्त जनजागृती
अमरावती, दि. 6 : दिनांक 1
ते 7 सप्टेंबर कालावधी हा जागतिक पोषण आहार सप्ताह म्हणून पाळण्यात येतो. या
सप्ताहनिमित्त स्थानिक विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालीटी हॉस्पीटल)
येथे विशेष कार्य अधिकारी डॉ. टी. बी. भिलावेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जगजागृती
कार्यक्रमाचे आयोजन आज रोजी बाह्यरुग्ण विभागाच्या सभागृहात करण्यात आले.
या वर्षीचे जागतिक आरोग्य संघटनेनुसार आहार विषयक घोषवाक्य ‘पोषण
विषयक दिवस पहिले हजार, आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे फार ’ हे आहे. यावेळी
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्पना भागवत, बालरोग संघटना अमरावती शाखेच्या
अध्यक्षा डॉ. सोनाली शिरभाते, आहारतज्ञ श्रीमती अंजली दाहत, व्यवसायोपचार तज्ञ डॉ.
रिना खुरपडी, सांख्यिकी पर्यंवेक्षक राजु डांगे मंचावर उपस्थित होते.
पोषणआहार सप्ताह साजरा करण्याचे उद्देश आहारतज्ञ श्रीमती अंजली
दाहत यांनी प्रास्ताविकातून समजावून सांगितला. मातेचा आहार, बालकांचा आहार,
आहाराचे मातेला व बालकास होणारे फायदे याविषयी तर बालरोग तज्ञ डॉ. सोनाली शिरभाते यांनी
वयोगटानुसार आहार व आहारा संदर्भात सविस्तर माहिती दिली. व्यवसायोपचार तज्ञ डॉ.
रिना खुरपडीयांनी व्यायामाचे महत्व इत्यादीबाबत माहिती दिली. सांख्यिकी पर्यवेक्षक
यांनी आहारसंदर्भात गैरसमज, स्थानिक सकस आहार, आरोग्याचे महत्व, आरोग्य संवर्धानाकरीता
योगाचे महत्व इत्यादी विषयी सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रदर्शन समाजसेवा अधिक्षक नवनाथ सरवदे
यांनी केले. कार्यक्रमस्थळी पोषण आहर विषयक संदेश देणारी प्रदर्शनी तसेच आहार
विषयक डिशेस ठेवण्यात आल्या होत्या. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित रुग्णांनी
प्रदर्शनीचा लाभ घेतला.
कार्यक्रमास रुग्णालयाचे अधिकारी व कर्मचारी, रुग्ण व त्यांचे
नातेवाईक मोठ्या संख्येत उपस्थित होते. रुग्णालयाचे कर्मचारी सांख्यिकी
पर्यंवेक्षक राजु डांगे, समाजसेवा अधिक्षक नवनाथ सरवदे, सांख्यिकी पर्यंवेक्षक शाम
सेवाने, औषधनिर्माते अधिकारी भाग्यश्री महागांवकर, डॉ. सोनाली चौधरी, समाजसेवा
अधिक्षक प्रप्फुल निमकर, मिलींद, गिरीष आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता परिश्रम घेतले.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा