बुधवार, ३१ जुलै, २०१९

शिक्षकांच्या समस्या पंधरा दिवसात निकाली काढा - डॉ. रणजित पाटील


शिक्षकांच्या समस्या पंधरा दिवसात निकाली काढा

                                                                                                                   - डॉ. रणजित पाटील
Ø  मुख्याध्यापकांच्या वेतननिश्चिती प्रकरणांसाठी शिबिराचे आयोजन 

अमरावती, दि.31 : जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाशी निगडीत शिक्षकांच्या सेवाविषयक प्रलंबित असलेल्या समस्या येत्या पंधरा दिवसांत निकाली काढून अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आज शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सानप, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) निलीमा टाके, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रिया देशमुख, वेतन पथक अधिक्षक श्री. बिजवे यांचेसह शिक्षण विभागाचे अधिकारी व विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
शिक्षकांच्या सेवा विषयक समस्यांसंदर्भात शिक्षक संघटनांचा व वैयक्तिक प्रकरणांचा आढावा घेत असतांना डॉ. पाटील म्हणाले की, शिक्षकांच्या संदर्भातील सर्व सेवाविषयक व प्रलंबित प्रकरणांचा निपटारा तातडीने करावा. काही प्रकरणांत जाणीवपूर्वक दिरंगाई होत असल्यास संबंधितावर जबाबदारी निश्चित करुन  प्रलंबित प्रश्न निश्चित कालमर्यादेत निकाली काढावे.
सातव्या वेतन आयोगानुसार मुख्याध्यापकांची वेतननिश्चितीचा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व सेवारत, माजी व मयत मुख्याध्यापकांची प्रकरणे विशेष शिबिराचे आयोजन करुन येत्या सात दिवसात निकाली काढावेत, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. मुख्याध्यापकांसाठी बंधनकारक असलेल्या शाळा व्यवस्थापन पदविका (डिएसएम) उत्तीर्ण करण्याच्या निर्णयासंदर्भात वाढीव मुदत देण्याची मागणी सर्व मुख्याध्यापकांनी केली. यावर तोडगा काढून धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तासिका तत्वावर काम करणाऱ्यांचे मानधन वाढविण्याची मागणी संदर्भात डॉ. पाटील म्हणाले की, या संदर्भात शासन सकारात्मक आहे. मानधन वाढविण्याची कार्यवाही लवकर करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. जिल्ह्यातील सर्व शाळा सोबत संस्थांच्या उर्दु माध्यमांच्या शाळेत सुध्दा दुरुस्ती व इतर मुलभूत सुविधा पुरण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना डॉ. पाटील यांनी बैठकीत दिल्या.
जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.  प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत विषय शिक्षकांची पदस्थापना तातडीने करण्यात यावी, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन, चट्टोपाध्याय वेतनश्रेणी व निवडश्रेणीचे प्रस्ताव, अंशदायी पेन्शन योजनेत कपात करण्यात आलेल्या रकमेच्या पावत्या देणे, आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांच्या पदस्थानेसंदर्भात कार्यवाही तसेच माध्यमिक शिक्षण विभागांतर्गत अतिरिक्त शिक्षकांना रुजू करून घेतलेल्या शिक्षकांचे वेतन मूळ शाळेतून काढणे, माध्यमिक शाळांना ‘आरटीई’ची मान्यता, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समायोजनासंदर्भात कार्यवाही, वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके निश्चित कालमर्यादेत अदा करणे, यासह इतर प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.









निवृत्तीवेतन धारकांसाठी सातव्या वेतन आयोगासंदर्भात सूचना


निवृत्तीवेतन धारकांसाठी
सातव्या वेतन आयोगासंदर्भात सूचना

अमरावती, दि.31: महाराष्ट्र राज्य शासनाच्या ज्या निवृत्तीवेतन / कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना सातव्या  वेतन आयोगाचे थकबाकी प्रथम हप्त्याचे प्रदान झालेले नव्हते अश्या निवृत्तीवेतन/कुटूंबनिवृत्तीवेतन धारकांना माहे जुलै 2019 या महिन्याच्या निवृत्तीवेतना सोबत सदर हप्त्याचे प्रदान करण्याचे  नियोजित होते.
या संदर्भात सर्व निवृत्तीवेतनधारकांना सूचित करण्यात येते , काही तांत्रिक अडचणीमुळे सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकी हप्त्याची रक्कम जुलै महिन्याच्या मासिक निवृत्ती वेतनात प्रदान करता येणार नाही,
याबाबत कार्यवाहीकरुन थकबाकी हप्त्याची रक्कम संबंधितांना लवकरच अदा करण्यात येईल, असे उपसंचालक (निवृत्तीवेतन) मुंबई यांनी त्यांचे ई-मेल संदेशानुसार कळविले आहे. उपरोक्त बाब संदर्भात वरिष्ठ कोषागार अधिकारी अमरावती यांनी सूचना जारी केली आहे.
*****

10 वी व 12 वीच्या परिक्षेसाठी नविन परीक्षा केंद्राचे मागणी प्रस्ताव 31 ऑगस्ट पर्यंत आमंत्रित


10 वी व 12 वीच्या परिक्षेसाठी
नविन परीक्षा केंद्राचे मागणी प्रस्ताव
31 ऑगस्ट पर्यंत आमंत्रित

अमरावती, दि.31: इयत्ता 10 वी 12 वीच्या फेब्रुवारी/मार्च 2020 करीता नविन परीक्षा केंद्राच्या मागणीबाबतचे प्रस्ताव 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2019 या कालावधीत स्विकारण्यात येणार असून नविन प्रस्ताव अर्जाची किंमत एक हजार रुपये निधारित करण्यात आली आहे. शाळा, महाविद्यालयांनी आपले अर्ज 31 ऑगस्ट पर्यंत सादर करावे, असे अनिल पारधी, विभागीय सचिव, अमरावती विभागीय मंडळ, अमरावती यांनी कळविले आहे.

अमरावती,यवतमाळ,अकोला जिल्ह्यात जोरदार पाऊस


अमरावती,यवतमाळ,अकोला
जिल्ह्यात जोरदार पाऊस

अमरावती, दि.31: अमरावती विभागात आज सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात सर्व तालुक्यात पाऊस झाला. या कालावधीत अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे  येथे सर्वाधिक 140 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. विभागात नोंदला गेलेला तालुकानिहाय पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी यंदा 1 जून पासून आजवर झालेल्या पावसाची आहे. सर्व आकडेवारी मिलीमिटर परिमाणात आहे.
अमरावती जिल्हा : अमरावती 63.7 (391.8), भातकूली 34.2 (228.4), नांदगाव खंडेश्वर 110 (328.7), चांदूर रेल्वे 140 (432.6), धामणगाव रेल्वे 139.7 (447.1), तिवसा 71.3 (326.9), मोर्शी 20.9 (306.1), वरुड 25.3 (309.3), अचलपूर 28.2 (391.5), चांदूर बाजार 37.2 (421.1), दर्यापूर 53.9 (304), अंजनगाव 28.5 (293.3), धारणी 43.2 (607.8), चिखलदरा 57.4 (775.1), अमरावती जिल्ह्यात चोवीस तासात सरासरी 61 मि.मि पाऊस झाला. जिल्ह्यात यंदा आजवर सरासरी 397.4 मि.मि. पाऊस झाला. पावसाचे  हे प्रमाण 1  जून ते 31 जुलै या कालावधीत अपेक्षित पाऊसमानाच्या 94.4 टक्के तर वार्षिक सरासरीच्या 48.8 टक्के आहे.
अकोला जिल्हा :- अकोला 56.3 (295.2), बार्शी टाकळी 47.6 (373.7), अकोट 43.6 (397.7), तेल्हारा- 38.6 (408), बाळापूर 29 (406), पातूर 38.8 (389.5),मुर्तीजापूर 99.8 (299.4), जिल्ह्यात 24 तासात सरासरी 50.5 मि.मि तर आजवर 367.1 मि.मि पाऊस झाला आहे. पावसाचे हे प्रमाण 1  जून  ते 31 जुलै या कालावधीत अपेक्षित पावसाच्या 100.1 टक्के तर वार्षिक सरासरीच्या 52.6 टक्के आहे.
यवतमाळ जिल्हा : यवतमाळ 65.6 (227.8), बाभूळगाव 92.6 (291.4),कळंब 64.8 (241), आर्णी 65 (363.2), दारव्हा 42.7 (241.8), दिग्रस 52.3 (219.3), नेर 51.3 (229.7), पुसद 38.8 (257), उमरखेड 33.6 (237.5), महागाव 43.3 (233.7), केळापूर 58.9(313.4), घाटंजी 52.5 (293.1), राळेगाव 61.7 (309.3), वणी 30.2 (304.3), मारेगाव 56.2 (345.1), झरी जामणी 42 (271.2) जिल्ह्यात 24 तासात सरासरी 53.2 तर यंदाच्या हंगामात आजवर सरासरी 273.7 मि.मि पाऊस झाला आहे. पावसाचे हे प्रमाण 1 जून  ते 31 जुलै या कालावधीत अपेक्षित सरासरीच्या 56.6 टक्के तर वार्षिक सरासरीच्या तुलनेत 30 टक्के एवढे आहे.
बुलडाणा जिल्हा :- बुलडाणा 27 (497.6), चिखली 25 (355.1), देऊळगाव राजा 24.4 (211.8), मेहकर 30 (304.3), लोणार 21.2 (259.9), सिंदखेड राजा 27.4 (305.5), मलकापूर 27.4 (333.1), नांदूरा 28.2 (372.4), मोताळा 16.7 (321.6), खामगाव 19.6 (311.7), शेगाव 33.4 (420.4), जळगाव जामोद 27 (395.4) संग्रामपूर 49.8 (479.8)  जिल्ह्यात दिवसभरात 27.5 तर यंदाच्या हंगामात आजवर 351.4 मि.मि. पाऊस झाला. पावसाचे हे प्रमाण 1 जून  ते 31 जुलै कालावधीत अपेक्षित सरासरीच्या 101.8 टक्के तर वार्षिक सरासरीच्या 52.6 टक्के एवढे आहे.
वाशिम जिल्हा : - वाशिम 15.3 (298.6), मालेगाव 18.4 (286.6), रिसोड 8.5 (293.8), मंगरुळपिर 23.2 (263.5), मानोरा 18.2 (219.1), कारंजा 9.5 (204.8), जिल्ह्यात 24 तासात 15.5 तर 1 जून पासून आजवर 261.1 मि.मि. पाऊस झाला. पावसाचे हे प्रमाण 1 जून ते 31 जूलै या कालावधीतील अपेक्षित सरासरीच्या 61.9 टक्के तर वार्षिक सरासरीच्या 32.7  टक्के इतके आहे.
****

मंगळवार, ३० जुलै, २०१९

अमरावती विभागात सर्वदूर पाऊस !


अमरावती विभागात सर्वदूर पाऊस !
यवतमाळ जिल्ह्याला दिलासा

अमरावती, दि.30: अमरावती विभागात आज सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात सर्व तालुक्यात पाऊस झाला. या कालावधीत यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर  येथे सर्वाधिक 80.7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. विभागात नोंदला गेलेला तालुकानिहाय पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी यंदा 1 जून पासून आजवर झालेल्या पावसाची आहे. सर्व आकडेवारी मिलीमिटर परिमाणात आहे.
अमरावती जिल्हा : अमरावती 27.3 (328.1), भातकूली 10.8 (194.2), नांदगाव खंडेश्वर 16.8 (218.7), चांदूर रेल्वे 21.2 (292.6), धामणगाव रेल्वे 24.3 (307.4), तिवसा 20.9 (255.6), मोर्शी 24.9 (285.2), वरुड 26.3 (284), अचलपूर 19.6 (363.3), चांदूर बाजार 47.1 (383.9), दर्यापूर 9.9 (250.1), अंजनगाव 7.3 (264.8), धारणी 73 (564.6), चिखलदरा 51 (717.7), अमरावती जिल्ह्यात चोवीस तासात सरासरी 27.2 मि.मि पाऊस झाला. जिल्ह्यात यंदा आजवर सरासरी 336.4 मि.मि. पाऊस झाला. पावसाचे  हे प्रमाण 1  जून ते 30 जुलै या कालावधीत अपेक्षित पाऊसमानाच्या 81.4 टक्के तर वार्षिक सरासरीच्या 41.3 टक्के आहे.
अकोला जिल्हा :- अकोला 7.9 (238.9), बार्शी टाकळी 5 (326.1), अकोट 12.6 (354.1), तेल्हारा- 20.3 (369.4), बाळापूर 11 (377), पातूर 8 (350.7),मुर्तीजापूर 8.7 (199.6), जिल्ह्यात 24 तासात सरासरी 10.5 मि.मि तर आजवर 316.5 मि.मि पाऊस झाला आहे. पावसाचे हे प्रमाण 1  जून  ते 30 जुलै या कालावधीत अपेक्षित पावसाच्या 88.2 टक्के तर वार्षिक सरासरीच्या 45.4 टक्के आहे.
यवतमाळ जिल्हा : यवतमाळ 16 (162.1), बाभूळगाव 12.2 (198.8),कळंब 20.8 (176.2), आर्णी 59.8 (298.2), दारव्हा 16.3 (199.1), दिग्रस 27.3 (167), नेर 10.2 (178.4), पुसद 17.6 (218.3), उमरखेड 27.9 (203.9), महागाव 22.8 (190.4), केळापूर 80.7 (254.4), घाटंजी 52 (240.6), राळेगाव 41.4 (247.6), वणी 50.7 (274.1), मारेगाव 59.8 (288.9), झरी जामणी 56.2 (229.2) जिल्ह्यात 24 तासात सरासरी 35.7 तर यंदाच्या हंगामात आजवर सरासरी 220.5 मि.मि पाऊस झाला आहे. पावसाचे हे प्रमाण 1 जून  ते 30 जुलै या कालावधीत अपेक्षित सरासरीच्या 46.5 टक्के तर वार्षिक सरासरीच्या तुलनेत 24.2 टक्के एवढे आहे.
बुलडाणा जिल्हा :- बुलडाणा 7.4 (470.6), चिखली 4.8 (330.1), देऊळगाव राजा 6.2 (187.4), मेहकर 3.8 (274.3), लोणार 3.3 (238.7), सिंदखेड राजा 5.7 (278.1), मलकापूर 15 (305.7), नांदूरा 14.4 (344.2), मोताळा 16.4 (304.9), खामगाव 6.5 (292.1), शेगाव 11 (387), जळगाव जामोद 17.2 (368.4) संग्रामपूर 22 (430)  जिल्ह्यात दिवसभरात 10.3 तर यंदाच्या हंगामात आजवर 324 मि.मि. पाऊस झाला. पावसाचे हे प्रमाण 1 जून  ते 30 जुलै कालावधीत अपेक्षित सरासरीच्या 95.7 टक्के तर वार्षिक सरासरीच्या 48.5 टक्के एवढा आहे.
वाशिम जिल्हा : - वाशिम 6.4 (283.3), मालेगाव 14.3 (268.2), रिसोड 7.9 (285.3), मंगरुळपिर 9.8 (240.2), मानोरा 4.9 (200.9), कारंजा 10.8 (195.3), जिल्ह्यात 24 तासात 9 तर 1 जून पासून आजवर 245.5 मि.मि. पाऊस झाला. पावसाचे हे प्रमाण 1 जून ते 30 जूलै या कालावधीतील अपेक्षित सरासरीच्या 59.4 टक्के तर वार्षिक सरासरीच्या 30.7  टक्के इतके आहे.
****

सोमवार, २९ जुलै, २०१९

अमरावती विभागात सर्वदूर पाऊस !


अमरावती विभागात सर्वदूर पाऊस !

अमरावती, दि.29: अमरावती विभागात आज सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात सर्व तालुक्यात पाऊस झाला. या कालावधीत  चिखलदरा येथे सर्वाधिक 148.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. विभागात नोंदला गेलेला तालुकानिहाय पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी यंदा 1 जून पासून आजवर झालेल्या पावसाची आहे. सर्व आकडेवारी मिलीमिटर परिमाणात आहे.
अमरावती जिल्हा : अमरावती 21.8 (300.8), भातकूली 19 (183.4), नांदगाव खंडेश्वर 11 (201.9), चांदूर रेल्वे 4.9 (271.4), धामणगाव रेल्वे 8.4 (283.1), तिवसा 8.4 (234.7), मोर्शी 40.6 (260.3), वरुड 53.5 (257.7), अचलपूर 60.9 (343.7), चांदूर बाजार 62.1 (336.8), दर्यापूर 31.8 (240.2), अंजनगाव 42 (257.5), धारणी 85.5 (491.6), चिखलदरा 148.9 (666.7), अमरावती जिल्ह्यात चोवीस तासात सरासरी 42.8 मि.मि पाऊस झाला. जिल्ह्यात यंदा आजवर सरासरी 309.3 मि.मि. पाऊस झाला. पावसाचे  हे प्रमाण 1  जून ते 29 जुलै या कालावधीत अपेक्षित पाऊसमानाच्या 76.4 टक्के तर वार्षिक सरासरीच्या 38 टक्के आहे.
अकोला जिल्हा :- अकोला 20.2 (231), बार्शी टाकळी 44.5 (321.1), अकोट 55.8 (341.5), तेल्हारा- 39.1 (349.1), बाळापूर 24.2(366), पातूर 17 (342.7),मुर्तीजापूर 15.8 (190.9), जिल्ह्यात 24 तासात सरासरी 30.9 मि.मि तर आजवर 306 मि.मि पाऊस झाला आहे. पावसाचे हे प्रमाण 1  जून  ते 29 जुलै या कालावधीत अपेक्षित पावसाच्या 87 टक्के तर वार्षिक सरासरीच्या 43.9 टक्के आहे.
यवतमाळ जिल्हा : यवतमाळ 4.4 (146.1), बाभूळगाव 5 (186.6),कळंब 7.2 (155.3), आर्णी 7.5 (238.4), दारव्हा 5.7 (182.9), दिग्रस 3.8 (139.8), नेर 4 (168.2), पुसद 3.4 (200.7), उमरखेड 9.7 (176), महागाव 8.7 (167.6), केळापूर 11.8 (173.7), घाटंजी 10 (188.6), राळेगाव 4.3 (206.2), वणी 10.8 (223.4), मारेगाव 9.4 (229.1), झरी जामणी 6 (173) जिल्ह्यात 24 तासात सरासरी 7 तर यंदाच्या हंगामात आजवर सरासरी 184.7 मि.मि पाऊस झाला आहे. पावसाचे हे प्रमाण 1 जून  ते 29 जुलै या कालावधीत अपेक्षित सरासरीच्या 39.8 टक्के तर वार्षिक सरासरीच्या तुलनेत 20.3 टक्के एवढे आहे.
बुलडाणा जिल्हा :- बुलडाणा 22.7 (463.2), चिखली 13.9 (325.3), देऊळगाव राजा 11.2 (181.2), मेहकर 15.9 (270.5), लोणार 8 (235.4), सिंदखेड राजा 10.7 (272.4), मलकापूर 54.4 (290.7), नांदूरा 33.4 (329.8), मोताळा 26.3 (288.5), खामगाव 12.7 (285.6), शेगाव 26.6 (376), जळगाव जामोद 39 (351.2) संग्रामपूर 41.4 (408)  जिल्ह्यात दिवसभरात 24.3 तर यंदाच्या हंगामात आजवर 313.7 मि.मि. पाऊस झाला. पावसाचे हे प्रमाण 1 जून  ते 29 जुलै कालावधीत अपेक्षित सरासरीच्या 94.5 टक्के तर वार्षिक सरासरीच्या 47 टक्के एवढा आहे.
वाशिम जिल्हा : - वाशिम 12.6 (276.9), मालेगाव 14.7 (253.9), रिसोड 15.1 (277.4), मंगरुळपिर 17.3 (230.5), मानोरा 17.9 (196), कारंजा 20.4 (184.5), जिल्ह्यात 24 तासात 16.3 तर 1 जून पासून आजवर 236.5 मि.मि. पाऊस झाला. पावसाचे हे प्रमाण 1 जून ते 29 जूलै या कालावधीतील अपेक्षित सरासरीच्या 58.3 टक्के तर वार्षिक सरासरीच्या 29.6  टक्के इतके आहे.
****

शुक्रवार, २६ जुलै, २०१९

मक्यावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना करावी



मक्यावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी
शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना करावी
अमरावती, दि.26: पिक संरक्षण व सर्वेक्षण केंद्र, किटकशास्त्र विभाग, डॉ. पंदेकृवि, अकोला यांनी बुलडाणा जिल्ह्यात नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात मक्यावर नविन लष्करी अळीची मोताळा तालुक्यात पारडी गावात प्रादुर्भाव आढळून आलेला असून बुलढाणा तालुक्यात जनुना, पारडा, मड, पाडळी चौठा अद्याप सुरुवात झालेली नाही. परंतू सर्वेक्षणात तुरळक ठिकाणी नगन्य स्वरुपात खोड किडीचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे.
सद्यास्थितीत मका हे पिक सुरुवातीच्या पोंगे अवस्थेत असून या अवस्थेत प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते. ज्या भागात हंगामात नविन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झालेला असेल त्यांनी त्वरीत एकरी 05 फेरोमन सापळे लाऊन या किडीच्या पतंगावर नियमित पाळत ठेवावी व दर आठवड्याने फेरेामन सापळ्यामध्ये अडकणारे पंतग नष्ट करावे जसे जसे या पतंगाची संख्या वाढेल तसे तसे फेरोमन सापळ्यांची संख्या एकरी 15 सापळे पर्यंत करावी म्हणजे हे पतंग मोठ्या प्रमाणावर नष्ट करणे शक्य होईल व या किडीच्या पुढील पिढ्याची रोकथाम करता येईल. एक मादी 4 ते 5 दिवसात सर्वसाधारण 1500 ते 2000 पर्यंत अंडी देऊ शकते. जर प्रत्येक नर फेरोमन सापळ्यात अडकला तर त्याचे मादी सोबत मिलन होणार नाही. त्यामुळे ती अंडे देऊ शकणार नाही परिणामी किडीचे पुढील प्रजोत्पादन थांबून मोठ्या प्रमाणावर पिठ्यांची रोकथाम होऊन पिकांवर प्रादुर्भाव होणार नाही.
फेरोमोन सापळे पिकामध्ये समसमान अंतरावर लावावे त्याची खालील मेनकापडाचे खालील टोक किमान पिकाच्या 6 इंच वर राहिल या प्रमाणे लावावे. जशी जशी पिकांची उंची वाढेल तसे फेरोमोन सापळ्याची उंची वाढवावी. प्रत्येक सापळ्यामध्ये वडी (ल्यूर) लावावी व वडी वरील वेष्टनावर दिलेल्या अंतीम मुदतीत ती बदलून परत नविन वडी प्रत्येक फेरोमोन सापळ्यामध्ये लावावी. शेतकरी बंधुनी फवारणी सायंकाळी किंवा सकाळी करावी. तसेच जाडसर द्रावण थेंबारुपाने पोंग्यामध्ये पडेल अशा प्रकारे फवारणी करावी म्हणजे पोंग्यात लपलेल्या अळ्यांचे प्रभावी नियंत्रण करता येईल.
सर्वेक्षणामध्ये मका पिकावर खोड किडीचा सुध्दा प्रादुर्भाव दिसून आला असून अळी पिवळस तपकिरी व डोके तपकिरी रंगाचे असते. तर दुसऱ्या प्रकारच्या खोड किडयाही अळी गुलाबी रंगाची असते. त्यामुळे त्याली गुलाबी खोड किडा सुध्दा म्हणतात. मक्यावरील खोड किडीच्या प्रादुर्भाव 5 टक्के नुकसानग्रस्त झाडे या प्रमाणात आढळान आल्यास कार्बोफ्युरॉन 3 टक्के दाणेदार 33.33 किलो प्रती हेक्टर या प्रमाणात जमिनीत ओलाव असतांना मुळाचे बाजुला मिसळून द्यावे किंवा डायमेथोएट 30 टक्के प्रवाही 13 मिली/10 ली पाणी किंवा थायोमेथोक्झाम 12.6+लॅब्डा सायहॅलोथ्रीन 1.5 टक्के 2.50 मिली/ 10ली पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
नविन लष्करी अळीची ओळख पूढील प्रमाणे करावे :
खाद्य वनस्पती ही किड बहुभक्षीय असून 80 पेक्षा जास्त वनस्पतीवर आपली उपजिवकिा करते. परंतू गवतवर्गीय पिके हे या किडीचे सर्वात आवडते खाद्य आहे. ही कीडी सर्वात जास्त मका, मधू मका, ज्वारी यावर उपजिविका करतांना आढळून येते. हराळी, सिंगाडा, कापूस, रान मेथी, मका, ओट, बाजरी, वटाणा, धान ज्वारी, शुगरबीट, सुदान ग्रास, सोयाबीन, ऊस ,तंबाखु व गहू यांवर वारंवार प्रादुर्भाव होतो भाजीपाल्यामध्ये फक्त मधूमक्यावर नियमित प्रादुर्भाव असतो. परंतू इतर भाजीपाला, फळ पिकामध्ये सेप, अंगूर, संत्रा, पपई पीच, स्ट्रॉबेरी व इतर फलपिकाचे कधीकधी नुकसान करते.
जिवनचक्र व  ओळख : या अळीची उन्हाळयात 30 दिवसात एक पिढी पूर्ण होते असून अखंड खाद्य मिळालयास 3 ते 4 पिढ्या विविध वनस्पतीवर पूर्ण होऊ शकतात. अंडी अर्ध गोलाकार असून पानावर एका समुहात 100 ते 200 अंडी देते. एक मादी सरासरी 1500 तर महत्तम 2000 अंडी देऊ शकते. अंडी समुह केसाळ व राखडी/ भुऱ्या रंगाच्या लव किंवा मऊ केसाने झाकलेले असतात. अंडी देण्याचा कालावधी उन्हाळ्यात फक्त 2 ते 3 दिवासचा असतो. अळी पूर्ण वाढझालेल्या अळीचे तोंडावर पांढुरक्या रंगाचे उलट्या वाय आकारचे चिन्ह असते. तर पोटाच्या आठव्या सेगमेंटवर चौकोनात फुगीर गोल गडद किंवा हलक्या रंगाचे चार ठिपके असतात. दिवसा अळी लपून राहते. उन्हाळ्यात अळी अवस्था 14 दिवसाची तर हिवाळ्यात किंवा थंड वातावरणात ती 30 दिवसापर्यंत असु शकते. कोष: चकाकणाऱ्या तपकिरी रंगाचे कोष सामान्यत 2 ते 8 सेमी खोल जमिनीत असतात. अळी स्वत: भोवती अंडाकृती, मातीचे कण व रेशीत धागा एकत्र करुन सैल कोष तयार करते. उन्हाळ्यात कोषा अवस्था 8 ते 9 दिवसाची असून अती थंड वातावरणात ती 20 ते 30 दिवसाची सुध्दा राहू शकते. पौढ नरामध्ये समोरचे पंखावर राखडी तपकिरी रंगाचे छटा असून टोकाला व मध्य भागाजवळ त्रिकोणी पांढरे ठिपके असतात. मादीमध्ये समोरचे पंख नरापेक्षा कमी चिन्हांकीत असतात. ते एकसमान राखडी तपकिरी रंगाचे असून त्यावर राखडी व तपकिरी रंगाचे ठिपके असताता. मागील दोन्ही मोहक चंदेरी पांढरे असून त्यावर आखुड गडद रंगाची किनार असते. पतंग अवस्था सरासरी 10 दिवसाची असुन ती 7 ते 21 दिवसांपर्यंत असु शकते. पौढ निशाचर असून मादी सामान्यत बहुतांश अंडी पहिल्या चार ते पाच दिवसाच्या कालावधीत देते.
नुकसान : अळ्या पाने खाऊन पिकाचे नुकसान करतात. नुकत्याच अंड्यातुन बाहेर आलेल्या अळ्या पानाचा हिरवा पापूद्रा खातात. त्यामुळे पानाला पांढरे चट्टे पडताता. दुसऱ्या ते तिसऱ्या अवस्थेतील अळया पानाला छिद्र करतात. पानाच्या कडा खातात. अळया मक्याच्या पोंग्यामध्ये राहून पानाला छिद्र करतात. त्यामुळे पोंग्यातून बाहेर आलेल्या पानावर एका रेषेत एकसमान छिद्रे दिसतात. सर्वसाधारण एका झाडावर एक किंवा दोन अळया राहतात, कारण त्या जवळ आल्यास एकमेकांना खातात. जूनी पाने मोठ्या प्रमाणात पर्णहीन होऊन पानाच्या फक्त शिरा व झाडाचे मुख्य खोड शिल्लक राहते. झाड फाटल्यासारखे दिसते पोंगा धरण्याची सुरुवातीची अवस्था कमी बळी पडते, मध्यम पोंगे अवस्था त्यापेक्षा जास्त तर उशीरा पोंगे अवस्था अळीला सर्वात जास्त बळी पडते. अळी काही वेळा कणसाच्या बाजुने आवरणाला छिद्र करुन दाणे खाते.
व्यवस्थापन :
मशागतीय पध्दती : पिकाची काढणी वेळेवर करुन पिकाची नंतरच्या हंगामात मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भावतुन सुटका होऊ शकते. पिक काढणीला आल्यावर कणसे किापल्यानंतर धाडयाची गंजी शेतात न ठेवता योग्य विल्हेवाट लावावी. पिकाचे कायीक वाढीत अतोनात नुकसान झाले असल्यास धांडे कापून पोंग्यातील अळी सहित नष्ट करावे. स्वच्छता मोहीम राबवावी व नत्र खताचा अवास्तव वापर टाळावा, पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत एकरी 20 या प्रमाणे पक्षी थांबे उभारावे (30 दिवसापर्यंत).
यांत्रीक पदध्ती : पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत पानावरील समुहात दिलेली अंडी किंवा अळ्यांचा समुह असलेली प्रादुर्भाव ग्रस्तपाने (पाढरे चटृटे असलेली ) अंडी/ अळयांसहीत वाळू टाकावी. पतंग मोठ्या प्रमाणावर नष्ट करण्यासाठी कामगंध सापळयांचा एकरी पंधरा या प्रमाणे वापर करावा. सापळे पिकाच्या घेराच्या उंचीबरोबर प्राधान्याने सुरुवातीच्या पोंगे अवस्थेत लावावे.
जैविक नियंत्रण : जैवविवीधता वाढवने जसे आंतरपिके/इतर सजावटीच्या फुल वनस्पती घेऊन नैसर्गिक शत्रूंचे संवर्धन होण्यास मदत हाईल. पतंगाची संख्या 3 पंतग/ कामगंध सापळा या प्रमाणात आढळतात ट्रायकोग्रामा प्रेटीओसम, टेलेमोनस रेमंस या परोपजीवी किटकांचे दर आठवड्याने एकरी 50 हजार अंडी याप्रमाणे शेतात सोडोव. त्यांनतर 3 ते 4 दिवसापर्यंत रासायनिक किटकनारशकाची फवारणी करु नये. रोपे ते सुरुवातीची पोंगे अवस्थेत 5 टक्के पोंग्यामध्ये तसेच 10 टक्के कणसामध्ये प्रादुर्भाव आढळलयास जैविक किटकनाशकांची फवारणी करावी. मेटारायझीयम ॲनिसोप्ली पावडर (10X10 सिएफयू/ग्रॉम)/50 ग्रॅम किंवा नोमुरीया रीलै पावडर (10X10 सिएफयू/ग्रॅम)/ 30 ग्रॅम/10 ली या प्रमाणे उगवणी नंतर 15 ते 25 दिवसांनीपोंग्यात फवारावे त्यानंतर प्रादुर्भावानुसार 10 दिवसाच्या अंतराने 1 ते 2 फवारण्या कराव्या. बॅसीलस थूरीजींअसीस व कुर्सटाकी/20 ग्रॅम/10 किंवा 400 ग्रॅम/एकर या प्रमाणे फवारणी करावी.
रासायनिक किटकनाशकांचा वापर: (शिफारस 2018-19 वर्षासाठी)
अळी पोग्यामध्ये उपजिवीका करीत असल्यामुळे रासायनिक किटकनाशकाची जास्त घनफळाच्या फवारणी (नॅपसॅक) पंपाद्वारे फवारणी केल्यास फवारणीचे द्रावण पोंग्यात जाऊन नियंत्रण मिळते.

रोपे ते सुरुवातीची पोंगे अवस्था:
अंड्याची उबवण क्षमता कमी व सुक्ष्म अळ्यांचा नियंत्रणासाठी 5 टक्के प्रादुर्भाव असल्यास, 5 टक्के निबोंळी अर्क किंवा ॲझाडिरेक्टीन 1500 पीपीएम, 50 मिली प्रति 10 लिटर या प्रमाणे फवारणे.
मध्यम ते उशिरा पोंगे अवस्था:
दुसऱ्या ते तिस-या अवस्थेतील अळ्याच्या नियंत्रणासाठी, 10 ते 20 टक्के प्रादुर्भाव असल्यास स्पिनेटोराम 11.7 टक्के प्रवाही, 9 मिली किंवा थायोमेथोक्झाम 12.6 टक्के+ल्यॅब्डा सायहेलोथ्रिन 9.5 टक्के, 5 मिली किंवा क्लोरॅन्ट्रनिलीप्रोल 18.5 टक्के प्रवाही, 3 मिली 10 लिटर पाण्यात याप्रमाणे फवारणे.
गोंडा ते रेशीम अवस्था (उगवणी नंतर 8 आठवडे):
या अवस्थेत रासायनिक किटकनाशकांचा वापर किफायतशीर नाही. म्हणून मोठ्या अळ्या वेचाव्या. वरिल प्रमाणे उपाय योजना करुन मका पिकांवरील नवीन लष्करी अळीच्या बंदोबस्तासाठी शेतकरी बंधु-भगीनीनी एकात्मीक व्यवस्थापन पध्दीताचा अवलंब करण्याचे आवाहन सुभाष नागरे, विभागीय कृषि सहसंचालक, अमरावती विभाग अमरावती यांनी कळविले आहे.
0000000

4 News


वृत्त क्र. 147                                                                                                      दिनांक- 26 जूलै 2019

प्रधानमंत्री पीक विमा योजनेला 29 जुलै, 2019 पर्यंत मुदतवाढ

अमरावती, दि.26: खरीप हंगाम 2019 करीता अधिसूचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. शेतकरी बांधवांना पुरेसा कालावधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने प्रशानमंत्री पिक विमा योजनेला 29 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
दि. 25 जुलै ते 29 जुलै, 2019 या मुदतवाढीमध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होऊन प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा. यासंबंधीच्या अधिक माहितीकरीता जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सुभाष नागरे विभागीय कृषि सहसंचालक यांनी केलेले आहे.  
****

वृत्त क्र. 148                                                                                                      दिनांक- 26 जूलै 2019
सहकारी गृहनिर्माण संस्थावर नेमण्यात येणाऱ्या पॅनल करीता
10 ऑगस्ट पर्यंत अर्ज आमंत्रित

अमरावती, दि.26: महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम अंतर्गत नेमण्यात येणाऱ्या प्राधिकृत अधिकारी (प्रशासक) यांचे पॅनल तयार 10 ऑग्स्टपर्यंत करण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी व सहकार व लेखा पदविका (जी.डी.सी.ॲड.ए)/उच्चतम सहकार पदविका (एच.डी.सी.) धारक, चार्टर्ड अकाऊटंट (सी.ए)/इन्सिटटयुट ऑफ कॉस्ट अँड वर्कस अकाऊटंट (आय.सी.डल्ब्यू.ए)/कंपनी सेक्रेटरी (सी.ए), सहकार खात्यातील प्रशासक/लेखापरीक्षण विभागातील सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी, नागरी/कर्मचारी सहकारी बँकांमध्ये व्यवस्थापक यांनी आपले अर्ज दि. 10 ऑगस्ट पर्यंत कार्यालयात सादर करावे.
अर्जाचे विहीत नमुने विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था येथे प्राप्त होतील. अधिक माहितीकरीता कार्यालयाच्या 0721-2663246 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे, राजेंद्र दाभेराव, विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, अमरावती यांनी कळविले आहे.
*****

वृत्त क्र. 149                                                                                                      दिनांक- 26 जूलै 2019
जिल्‍ह्यात शांतता कलम लागू

अमरावती, दि. 30  : जिल्‍ह्यात शांतता व सुव्‍यवस्‍था अबाधित राहावी यासाठी अपर जिल्‍हा दंडाधिकारी यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.
हा प्रतिबंधात्मक आदेश जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता पोलीस आयुक्तयालय परिक्षेत्र वगळून जिल्ह्यात दि. 16 जुलै ते 30 जुलै, 2019 पर्यत लागू करण्यात आला आहे. या कलमांचा भंग करणा-या व्‍यक्‍तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्‍यात येईल, असेही अपर  जिल्हा दंडाधिकारी  यांनी कळविले आहे.
****
वृत्त क्र. 149                                                                                                      दिनांक- 26 जूलै 2019
इयत्ता 10 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांनी
24 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करावे

अमरावती, दि.26: इयत्तास 10 वी व 12 परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खाजगीरित्या फॉर्म नं. 17 भरुन परीक्षेस प्रविष्ट होता येईल. त्यानुसार फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये होणाऱ्या (इ.12 वी) परीक्षा व (इ. 10 वी) परीक्षेस खाजगीरित्या (फॉर्म नं. 17) प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नावनोंदणी अर्ज (फॉर्म नं. 17) ऑनलाईन प्रक्रियेद्वारे सादर करावे.
विद्यार्थ्यांनी दि. 29 जुलै ते 24 जुलै, 2019 विद्यार्थ्यांनी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन भरावी. दि. 30 जुलै ते 26 ऑगस्ट 2019 विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, विहित शुल्क व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्र शाळेत/कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जमा करावी. दि. 30 ऑगस्ट 2019 संपर्क केंद्र शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे अर्ज, विहित शुल्क, मूळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळाकडे जमा करावी.
विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज  http://form17.mh-ssc.ac.in आणि http://form17.mh-hsc.ac.in या वेबसाईटवर सादर करावे. विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्याकरीता शाळा सोडल्याचा दाखला (मुळ प्रत), नसल्यास द्वितीयप्रत व प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड, स्वत:चा पासपोर्ट आकारातील फोटो ऑनलाईन अर्ज भरताना सदर कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावयाची आहेत.  पात्र विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी परीक्षेची आवेदनपत्रे (examination form)मंडळाने विहित केलेल्या कालावधीत परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक आहे. असे डॉ, अशोक भोसले, सचिव, राज्यमंडळ, पुणे यांनी कळविले आहे.
*****

प्रधानमंत्री पीक विमा योजनेला 29 जुलै, 2019 पर्यंत मुदतवाढ


प्रधानमंत्री पीक विमा योजनेला 29 जुलै, 2019 पर्यंत मुदतवाढ

अमरावती, दि.26: खरीप हंगाम 2019 करीता अधिसूचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. शेतकरी बांधवांना पुरेसा कालावधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने प्रशानमंत्री पिक विमा योजनेला 29 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
दि. 25 जुलै ते 29 जुलै, 2019 या मुदतवाढीमध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होऊन प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा. यासंबंधीच्या अधिक माहितीकरीता जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सुभाष नागरे विभागीय कृषि सहसंचालक यांनी केलेले आहे.  
****

अमरावती विभागात सर्वदूर पाऊस !


अमरावती विभागात सर्वदूर पाऊस !

अमरावती, दि.26: अमरावती विभागात आज सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात 53 तालुक्यात पाऊस झाला. या कालावधीत  चिखलदरा येथे सर्वाधिक 44.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. विभागात नोंदला गेलेला तालुकानिहाय पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी यंदा 1 जून पासून आजवर झालेल्या पावसाची आहे. सर्व आकडेवारी मिलीमिटर परिमाणात आहे.
अमरावती जिल्हा : अमरावती 6.4 (220.7), भातकूली 5 (127.5), नांदगाव खंडेश्वर 5 (154.9), चांदूर रेल्वे 13.9 (228.8), धामणगाव रेल्वे 15.9 (215.3), तिवसा 4.5 (144.2), मोर्शी 5.3 (153), वरुड 8.1 (139), अचलपूर 19.4 (216.5), चांदूर बाजार 11.6 (197), दर्यापूर 2.8 (157.8), अंजनगाव 6.3 (143.5), धारणी 16 (346.3), चिखलदरा 44.8 (398.1), अमरावती जिल्ह्यात चोवीस तासात सरासरी 11.8 मि.मि पाऊस झाला. जिल्ह्यात यंदा आजवर सरासरी 203 मि.मि. पाऊस झाला. पावसाचे  हे प्रमाण 1  जून ते 26 जुलै या कालावधीत अपेक्षित पाऊसमानाच्या 53.7 टक्के तर वार्षिक सरासरीच्या 24.9 टक्के आहे.
अकोला जिल्हा :- अकोला 4.1 (183), बार्शी टाकळी 15.1 (255.5), अकोट 4.2 (220.9), तेल्हारा- निरंक (259), बाळापूर 6.8 (304.3), पातूर 5.2(270.1),मुर्तीजापूर 2.3 (136.4), जिल्ह्यात 24 तासात सरासरी 5.4 मि.मि तर आजवर 232.7 मि.मि पाऊस झाला आहे. पावसाचे हे प्रमाण 1  जून  ते 26 जुलै या कालावधीत अपेक्षित पावसाच्या 70.7 टक्के तर वार्षिक सरासरीच्या 33.4 टक्के आहे.
यवतमाळ जिल्हा : यवतमाळ 10.3 (122.8), बाभूळगाव 12.8 (157.4),कळंब 8.7 (123), आर्णी 12.7 (204.8), दारव्हा 17.3 (161.1), दिग्रस 11.8 (118.5), नेर 4.7 (145.9), पुसद 18.8 (167.4), उमरखेड 13.7 (126.6), महागाव 11 (125.1), केळापूर 10.1 (136.8), घाटंजी 16 (160.1), राळेगाव 9.9 (172.6), वणी 11.1(194.4), मारेगाव 12.8 (193.1), झरी जामणी 8.2 (146.2) जिल्ह्यात 24 तासात सरासरी 11.9 तर यंदाच्या हंगामात आजवर सरासरी 153.5 मि.मि पाऊस झाला आहे. पावसाचे हे प्रमाण 1 जून  ते 26 जुलै या कालावधीत अपेक्षित सरासरीच्या 35.3 टक्के तर वार्षिक सरासरीच्या तुलनेत 16.8 टक्के एवढे आहे.
बुलडाणा जिल्हा :- बुलडाणा 8.3 (411.5), चिखली 9.6 (294.3), देऊळगाव राजा 5.8 (142.4), मेहकर 8.1 (235.9), लोणार 13.3 (190.9), सिंदखेड राजा 10.4 (223.1), मलकापूर 10.2 (187.7), नांदूरा 2.6(256.9), मोताळा 2 (218.9), खामगाव 2.2 (234.6), शेगाव 1 (315), जळगाव जामोद 0.6 (262.4) संग्रामपूर 0.4 (295.8)  जिल्ह्यात दिवसभरात 5.7 तर यंदाच्या हंगामात आजवर 251.5 मि.मि. पाऊस झाला. पावसाचे हे प्रमाण 1 जून  ते 26 जुलै कालावधीत अपेक्षित सरासरीच्या 80.5 टक्के तर वार्षिक सरासरीच्या 37.7 टक्के एवढा आहे.
वाशिम जिल्हा : - वाशिम 1.8 (227.2), मालेगाव 0.2 (184.5), रिसोड 1.6 (216.1), मंगरुळपिर -निरंक (181.9), मानोरा -निरंक (147.6), कारंजा 0.4 (149.9), जिल्ह्यात 24 तासात 0.7 तर 1 जून पासून आजवर 184.5 मि.मि. पाऊस झाला. पावसाचे हे प्रमाण 1 जून ते 26 जूलै या कालावधीतील अपेक्षित सरासरीच्या 48.5 टक्के तर वार्षिक सरासरीच्या 23.1  टक्के इतके आहे.
****


गुरुवार, २५ जुलै, २०१९

शिष्यवृत्तीची प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत - सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे







शिष्यवृत्तीची प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत
            - सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे
Ø  बंद वसतिगृहांची उच्चस्तरीय चौकशी करणार
Ø  जात पडताळणीची प्रकरणे मुदती निकाली काढावी
अमरावती, दि. 25 : समाजातील सर्व घटकांपर्यंत शिक्षण पोहोचवून वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक न्याय विभागाद्वारे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. राज्यातील कुठलाही मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नये, यासाठी भारत सरकार शिष्यवृत्ती व मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्तीची प्रकरणे पंधरा दिवसांत निकाली काढावीत, असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले.
आज येथील समाज कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त कार्यालयात समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांचा आढावा डॉ. खाडे यांनी घेतला. यावेळी प्रधान सचिव दिनेश वाघमारे, बार्टीचे महासंचालक कैलास कणसे, समाज कल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर, अतिरिक्त आयुक्त बी. डी. खंडाते, सहआयुक्त माधव वैद्य, प्रादेशिक उपायुक्त विजय साळवे आदी उपस्थित होते.
डॉ. खाडे म्हणाले, मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची प्रकरणे पारदर्शक आणि गतीने निकाली काढण्यासाठी महाडीबीटी पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी पोर्टलवरद्वारे प्राप्त शिष्यवृत्ती प्रकरणाचा निपटारा पंधरा दिवसाच्या आत  करण्यात यावा. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती संदर्भातील तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. स्वाधार योजनेच्या अर्जांवर सप्टेंबरअखेरपर्यंत कार्यवाही व्हावी. शासकीय वसतीगृहातील प्रवेश पूर्ण करावेत. पाच टक्के रिक्त जागेवर खास बाब म्हणून त्या-त्या जिल्ह्यातील मुलांचे प्रवेश निश्चित करावेत.
समाजातील दुर्बल घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक न्याय विभाग कार्यरत आहे. समाजातील मागासवर्गीय मुला-मुलींना सुलभरित्या शिक्षण घेता यावे, यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतीगृहात प्रवेश दिला जातो. परंतु काही बंद अवस्थेतील वसतिगृहे, संस्थांना चालविण्यासाठी दिलेली वसतिगृहे तसेच भाड्याच्या इमारतीत कार्यरत वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या संख्येत तफावत असल्याचे आढळून आले आहे. याप्रकरणी वसतिगृहांची समिती स्थापन करुन उच्चस्तरीय चौकशी करुन अहवाल शासनास सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले. भाड्याच्या इमारतीत कार्यरत वसतिगृहांच्या बांधकामासाठी जागा उपलब्ध करुन घ्यावी, तसेच सुरु असलेली वसतिगृहांची बांधकामे तातडीने पूर्ण करुन हस्तांतरीत करण्याची कार्यवाही जलदगतीने करावी. विभागातील सर्व वसतिगृहांची, तेथील सुविधांची तपासणी जिल्हा परिषद आणि समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे करावी.
जात पडताळणी समितीकडे असलेली प्रलंबित प्रकरणांचा आढावा डॉ. खाडे यांनी घेतला. शैक्षणिक कार्यासाठी जात पडताळणीची प्राप्त प्रकरणे सात दिवसांच्या आत निकाली काढावीत, तर त्रुटीमध्ये आलेली व दक्षता पथकाकडे असलेली प्रकरणे पंधरा दिवसाच्या आत निकाली काढावीत. ग्राम पंचायत निवडणुकीतील उमेदवारांची प्रकरणे आवश्यक कागदपत्रे मागवून विहित मुदतीत निकाली काढावीत.
सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त असलेल्या महामंडळांनी कर्ज वसुलीसाठी नियमित पाठपुरावा करावा. विभागातील होतकरु मागासवर्गीयांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी कर्ज मंजूरी करीता बँकासोबत पाठपुरावा करावा. अपंग विकास महामंडळाने दिव्यांग व्यक्तींना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करावे. रमाई आवास योजना, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना, मिनी ट्रॅक्टर योजना, दलित वस्ती सुधार योजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात, असेही डॉ. खाडे यांनी आढावा बैठकीत सांगितले. सुमारे पाच तास चाललेल्या विभागाच्या बैठकीत डॉ. खाडे यांनी जिल्हानिहाय सर्व बाबींचा सविस्तर आढावा घेतला. मागासवर्गीयांच्या उद्धारासाठी व सामाजिक समतेसाठी शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
000000


मंगळवार, २३ जुलै, २०१९

लोकमान्य टिळक यांना अभिवादन



लोकमान्य टिळक यांना अभिवादन
अमरावती, दि.२३ : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक  यांच्या जयंती निमित्त विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयात लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी उपायुक्त प्रमोद देशमुख, श्री. मोहिते, संजय खडसे यांच्यासह वरीष्ठ अधिकारी-कर्मचारी  उपस्थित होते. उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
0000

सोमवार, २२ जुलै, २०१९

जलशक्ती अभियानातून जलसंवर्धन करावे - जिल्हाधिकारी शैलेश नवाल





जलशक्ती अभियानातून जलसंवर्धन करावे
                                                                                                                           - जिल्हाधिकारी शैलेश नवाल
Ø  शाळकरी मुलांच्या लिखीत पोस्टकार्डच्या संदेशातून जलजागृती
Ø  शालेय जीवनातच पाणी बचतीचे संस्कार
अमरावती, दि. 22 :  पृथ्वीतलावरील सर्व सजीवांसाठी पाणी ही गरज आहे. पाण्याचे महत्व सगळ्यांना माहित असून टंचाईची झळ लोक सोसत आहे. पाण्याची बचत हीच त्याची निर्मिती आहे. पाण्याचे महत्व ओळखून केंद्र शासनाने जलशक्ती मंत्रालयाची स्थापना करुन देशभरात जलशक्ती अभियान सुरु केले आहे. प्रत्येकाने पाण्याचे महत्व समजून जलसंवर्धन करण्यासाठी नवनवीन उपक्रम राबवून जाणीवपूर्वक जलजागृती करावी. तसेच जलशक्ती अभियान अंतर्गत पाणी बचतीच्या लोकचळवळीत सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज केले.
            जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे जलशक्ती अभियानांतर्गत एक दिवशीय जलजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. शिक्षणाधिकारी निलीमा टाके, भुजल सर्वेक्षण विभागाचे वरिष्ठ भुवैज्ञानिक अरविंद साळवे तसेच गटशिक्षणाधिकारी, जि.प.प्राथमिक शाळेचे शिक्षकवृंद, पाणी फाउंडेशनचे पदाधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.
            श्री. नवाल म्हणाले की, जलशक्ती अभियानांतर्गत जिल्ह्यातील अचलपूर, चांदुर बाजार, मोर्शी, वरुड या तालुक्यातील भूजलाची स्थिती लक्षात घेता त्याठिकाणी जोरकसपणे मोहिम राबविण्यात येणार आहे. देशभरात अभियानाचा शुभारंभ 1 जुलैला झाला असून 15 सप्टेंबर पर्यंत मोहिम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील निवड झालेल्या तालुक्यातील सर्व यंत्रणांनी जलसंवर्धन मोहिमेची जनजागृती व लोकशिक्षणासाठी मनापासून प्रयत्न करावे. जिल्हा परिषद, शिक्षण विभागाने शाळा व महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन, पथनाट्ये, घराच्या भिंती व फलक रंगाई, पावोळा, भारुड आदींच्या माध्यमातून मोठया प्रमाणात जलसंवर्धनाबाबत जनजागृती करावी.
            भुजलाची पातळी खालवलेल्या भागात अधिक प्रमाणात लक्ष केंद्रीत करुन ‘ रेन वॉटर हार्वेस्टींग,’ करावे. पारंपारिक जलस्त्रोतांचे नुतणीकरण व पुनर्भरण, पुनर्वापर व वनीकरण, शाळेत, घरासमोर, पाण्याच्या टाकीपाशी व सार्वजनिक ठिकाणी शोषखड्ड्यांची निर्मिती करावी. मोहिमेच्या अनुषंगाने जलबचतीचे काम लोकसहभागाच्या माध्यमातून करावे त्यामुळे ही बाब सर्वांच्या लक्षात येईल. जलसंवर्धनाच्या या मोहिमेत शाळकरी मुलांना सहभागी करुन घ्यावे. त्यांच्याकडून पोस्ट कार्डवर त्यांचे पाण्या संदर्भातील अनुभव लिहीण्याच्या किंवा चित्र रंगविण्याच्या स्पर्धा घ्याव्यात. त्यांनी लिहीलेल्या संदेशाचे ग्रामसभेमध्ये किंवा चावडीवर वाचन करुन इतरांना त्याचे महत्व पटवून द्यावे. यामुळे लहान मुलांनी निरागस मनाने केलेली कृती इतरांना दिशादर्शक ठरेल व ते सुध्दा जलसंवर्धनाच्या कामात मनापासून सहभागी होईल, असे श्री. नवाल यांनी यावेळी सांगितले.
            शाळासिध्दी उपक्रम तसेच शाळा समितीच्या बैठकीतून पाण्याच्या बचतीविषयी जनजागृती करावी. प्रत्येक शाळेत जलशक्ती अभियान तसेच जलसंवर्धनाचे आकर्षक मॉडेल तयार करुन त्यामाध्यमातून पाण्याचे महत्व पटवून द्यावेत. नागरिकांना पाण्याचे महत्व पटवून देण्यासाठी जलसाक्षरता महत्वाची आहे. पाण्याचा काटकसरीने वापर करावा. पाण्याची बचत हा संस्कार झाला पाहिजे. लहान मुलांवर शालेय जीवनापासून हा संस्कार रूजविला पाहिजे. शिक्षकांनी शालेय अभ्यासक्रमासोबतच मुलांना पाण्याचे महत्व आणि आत्मविश्वासाने जीवन जगण्याचे संस्कार मुलांमध्ये रुजवावे. रक्षाबंधन व मित्र दिवस यासारख्या दिवशी जलमित्र, जलबंधन राखीतून पाण्याविषयी जनजागृतीपर संदेशाचे आदानप्रदान करावे.  
            जलशक्ती कार्यशाळेत रहाटगाव प्रगती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पाणी हरवलं, कोणी ग ते चोरलं.. हे जलसाक्षरता गित सादर केले. याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांच्याहस्ते सादरकर्त्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन कौतूक करण्यात आले.