राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत
वन शेती उप अभियान
अमरावती,
दि.4 : राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत
वनशेती उप अभियान या योजने अंतर्गत तालुका फळ रोपवाटीका चांदुर रेल्वे येथे वन रोपे
पिशवी मध्ये तयार केलेली असुन तालुका फळ रोपवाटीका चांदूर रेल्वे येथे 32553 रोपे पिकनिहाय
विक्रीस उपलब्ध आहे. ही रोपे कृषि विभागाच्या निर्धारीत दरप्रमाणे वितरीत करण्यात येत
आहे.
रोपवाटीकेत
सिताफळ रोपे 11,195, बांबु रोपे 12,070, साग 9,288 रोपे शिल्लक आहेत. अधिक माहिती करीता
शेतकरी बंधूनी संबधीत रोपवाटीका प्रमुख कृषि पर्यवेक्षक सिनकर यांच्या मो. नं.
7030472087/9022630324 क्रमांकावर संपर्क करावा, असे प्रि. वि. रोडगे, उपविभागीय कृषि
अधिकारी, अमरावती यांनी सांगितले आहे.
****
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा