बेलोरा विमानतळ विस्तारीकरणाचे
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज भूमिपूजन
*पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण
अमरावती, दि. 12 : पर्यटन, शैक्षणिक आणि औद्योगिक दृष्टीने विकसित होत असलेल्या अमरावती येथील बेलोरा विमानतळाच्या विस्तारीकरणांतर्गत विविध विकासकामांचे भूमिपूजन शनिवारी, दि. 13 जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सकाळी 10.30 वाजता विमानतळ परिसरात होणार आहे.
या भूमिपूजन सोहळ्याला पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहतील. उर्जा, पर्यटन, अन्न व औषधी प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार, गृह (शहरे), कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, विदर्भ विकास महामंडळाचे उपाध्यक्ष डॉ. सुनील देशमुख, राज्य सल्लागार परिषदेचे उपाध्यक्ष श्रीकांत देशपांडे, जिल्हा परिषद अध्यक्ष नितिन गोंडाणे, महापौर संजय नरवणे, खासदार रामदास तडस, नवनीत रवी राणा, विधान परिषदेचे सदस्य प्रविण पोटे-पाटील, अरुण अडसड, विधान सभेचे सदस्य विरेंद्र जगताप, ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू, ॲड. यशोमती ठाकूर, रवी राणा, रमेश बुंदिले, प्रभूदास भिलावेकर, विभागीय आयुक्त पियूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा खत्री आदी उपस्थित राहतील.
यावेळी पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सामान्य प्रशासन, उत्पादन शुल्क आणि नागरी विमान वाहतूक विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंग आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी यांनी केले आहे.
****
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा