गुरुवार, १८ जुलै, २०१९

नवीन परिक्षा केंद्राच्या मागणीसाठी 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज आमंत्रित


नवीन परिक्षा केंद्राच्या मागणीसाठी
31 ऑगस्ट पर्यंत अर्ज आमंत्रित

अमरावती, दि. 18 : शैक्षणिक वर्ष 2020 मध्ये फेब्रुवारी /मार्च महिन्यात होणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी नविन परिक्षा केंद्राच्या मागणीसाठी दि. 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2019 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. नविन प्रस्ताव अर्जाची रक्कम पाचशे रुपये आहे. 31 ऑगस्ट पर्यंत ज्या शाळा/कनिष्ठ महाविद्यालय प्रस्ताव सादर करु शकले नाही त्या शाळा/ महाविद्यालयांनी  दि. 1 ते 16 सप्टेंबर 2019 या कालावधीत प्रतिदिन शंभर रुपये विलंब शुल्कासह अर्ज सादर करावे असे विभागीय सचिव, अमरावती विभागीय मंडळ, अमरावती  यांनी कळविले आहे.
*****


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा