वृत्त क्र. 147 दिनांक- 26 जूलै 2019
प्रधानमंत्री पीक विमा योजनेला 29 जुलै, 2019
पर्यंत मुदतवाढ
अमरावती, दि.26: खरीप हंगाम 2019 करीता अधिसूचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांसाठी प्रधानमंत्री
पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. शेतकरी बांधवांना पुरेसा कालावधी उपलब्ध करुन देण्याच्या
उद्देशाने प्रशानमंत्री पिक विमा योजनेला 29 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
दि. 25 जुलै ते 29 जुलै,
2019 या मुदतवाढीमध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी
होऊन प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा. यासंबंधीच्या अधिक माहितीकरीता जिल्हा
अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी
या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सुभाष नागरे विभागीय कृषि सहसंचालक यांनी
केलेले आहे.
****
वृत्त क्र. 148 दिनांक- 26 जूलै 2019
सहकारी गृहनिर्माण संस्थावर नेमण्यात येणाऱ्या
पॅनल करीता
10 ऑगस्ट पर्यंत अर्ज आमंत्रित
अमरावती, दि.26: महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम अंतर्गत नेमण्यात येणाऱ्या प्राधिकृत
अधिकारी (प्रशासक) यांचे पॅनल तयार 10 ऑग्स्टपर्यंत करण्यासाठी अर्ज मागविण्यात येत
आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी व सहकार व लेखा पदविका (जी.डी.सी.ॲड.ए)/उच्चतम
सहकार पदविका (एच.डी.सी.) धारक, चार्टर्ड अकाऊटंट (सी.ए)/इन्सिटटयुट ऑफ कॉस्ट अँड वर्कस
अकाऊटंट (आय.सी.डल्ब्यू.ए)/कंपनी सेक्रेटरी (सी.ए), सहकार खात्यातील प्रशासक/लेखापरीक्षण
विभागातील सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी, नागरी/कर्मचारी सहकारी बँकांमध्ये व्यवस्थापक
यांनी आपले अर्ज दि. 10 ऑगस्ट पर्यंत कार्यालयात सादर करावे.
अर्जाचे विहीत नमुने विभागीय
सहनिबंधक सहकारी संस्था येथे प्राप्त होतील. अधिक माहितीकरीता कार्यालयाच्या
0721-2663246 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे, राजेंद्र दाभेराव, विभागीय
सहनिबंधक, सहकारी संस्था, अमरावती यांनी कळविले आहे.
*****
वृत्त क्र. 149 दिनांक- 26 जूलै 2019
जिल्ह्यात शांतता कलम
लागू
अमरावती, दि.
30 : जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित
राहावी यासाठी अपर जिल्हा दंडाधिकारी यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37
(1) (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.
हा
प्रतिबंधात्मक आदेश जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता पोलीस
आयुक्तयालय परिक्षेत्र वगळून जिल्ह्यात दि. 16 जुलै ते 30 जुलै, 2019 पर्यत लागू
करण्यात आला आहे. या कलमांचा भंग करणा-या व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात
येईल, असेही अपर जिल्हा दंडाधिकारी यांनी कळविले आहे.
****
वृत्त क्र. 149 दिनांक- 26 जूलै 2019
इयत्ता 10 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांनी
24 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करावे
अमरावती, दि.26: इयत्तास 10 वी व 12 परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खाजगीरित्या फॉर्म
नं. 17 भरुन परीक्षेस प्रविष्ट होता येईल. त्यानुसार फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये होणाऱ्या
(इ.12 वी) परीक्षा व (इ. 10 वी) परीक्षेस खाजगीरित्या (फॉर्म नं. 17) प्रविष्ट होणाऱ्या
विद्यार्थ्यांसाठी नावनोंदणी अर्ज (फॉर्म नं. 17) ऑनलाईन प्रक्रियेद्वारे सादर करावे.
विद्यार्थ्यांनी दि. 29 जुलै
ते 24 जुलै, 2019 विद्यार्थ्यांनी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन भरावी. दि. 30 जुलै ते 26
ऑगस्ट 2019 विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, विहित शुल्क व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या
संपर्क केंद्र शाळेत/कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जमा करावी. दि. 30 ऑगस्ट 2019 संपर्क
केंद्र शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे अर्ज, विहित शुल्क, मूळ कागदपत्रे
व यादी विभागीय मंडळाकडे जमा करावी.
विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज http://form17.mh-ssc.ac.in आणि http://form17.mh-hsc.ac.in या वेबसाईटवर सादर करावे.
विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्याकरीता शाळा सोडल्याचा दाखला (मुळ प्रत), नसल्यास द्वितीयप्रत
व प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड, स्वत:चा पासपोर्ट आकारातील फोटो ऑनलाईन अर्ज भरताना सदर
कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावयाची आहेत. पात्र विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त
झाल्यानंतर त्यांनी परीक्षेची आवेदनपत्रे (examination form)मंडळाने विहित केलेल्या
कालावधीत परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक आहे. असे डॉ, अशोक भोसले, सचिव, राज्यमंडळ,
पुणे यांनी कळविले आहे.
*****
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा