बुधवार, १० जुलै, २०१९

इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी समुपदेशकांची नेमणूक


इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना
मार्गदर्शनासाठी समुपदेशकांची नेमणूक
                                                                             
अमरावती, दि. 10 : उच्च माध्यमिक व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षांच्या अनुषंगाने जुलै/ऑगस्ट मध्ये होणाऱ्या मंडळाच्या परीक्षाकरीता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अमरावती विभागीय मंडळस्तरावर पाच समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याव्दारे विद्यार्थ्यांना परीक्षेसंबंधी समस्याचे मार्गदर्शन व मदत होणार असून ते सकाळी 8 ते सायंकाळी 8 या वेळेत मार्गदर्शनासाठी कार्यान्वित राहणार आहे.  
उपरोक्त सुविधा दिनांक 17 जुलै ते 3 ऑगस्ट 2019 या कालावधीतपर्यंत सुरु राहील. भ्रमणध्वनीवरुन विद्यार्थ्यांचे समुपदेशन करणाऱ्या समुपदेशकांची जिल्हानिहाय नावे व त्यांची भ्रमणध्वनी पुढीलप्रमाणे आहे.
अकोलासाठी श्री. क्यु. झेड. खान (9422893320), अमरावतीसाठी एम. एम. हांडे (9766575182), अमरावती, बुलडाणाकरीता पी. के. खरात (9422725327), यवतमाळकरीता एस. एस. वर्मा (9922801045), तर वाशिम जिल्ह्यासाठी डी. एम. खोडके (7350004953) अशा प्रकारे भ्रमणध्वनी कार्यान्वित राहील. तसेच कार्यालयीन हेल्पलाईन दूरध्वनी क्रमांक 0721-2662608 हा आहे, असे विभागीय मंडळाचे विभागीय सचिव अनिल पारधी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा